मराठी बातम्या  /  क्रीडा  /  हाशिम आमला-मोईन अली ते मोहम्मद शमीपर्यंत ‘हे’ क्रिकेटपटू धर्मामुळे झाले ट्रोल

हाशिम आमला-मोईन अली ते मोहम्मद शमीपर्यंत ‘हे’ क्रिकेटपटू धर्मामुळे झाले ट्रोल

Jul 02, 2022, 08:34 PM IST

    • क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू त्यांच्या धर्मावरुन वादात सापडले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, हाशिम आमला आणि मोईन अली यांच्या नावाचा समावेश आहे.
cricketers

क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू त्यांच्या धर्मावरुन वादात सापडले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, हाशिम आमला आणि मोईन अली यांच्या नावाचा समावेश आहे.

    • क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू त्यांच्या धर्मावरुन वादात सापडले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, हाशिम आमला आणि मोईन अली यांच्या नावाचा समावेश आहे.

नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला विरोध झाला असून त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्तीची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टानेही नुपूर यांना फटकारले आहे. मात्र, धार्मिक वक्तव्यांवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. क्रिकेट विश्वातही अनेक खेळाडू अशा वादामुळे चर्चेत आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताच्या मोहम्मद शमीपासून ते दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला तसेच, इंग्लंडचा मोईन अलीपर्यंत हे खेळाडू त्यांच्या धर्मामुळे वादात सापडले आहेत.

डीन जोन्सने हाशिमा आमलावर केली होती वादग्रस्त टिप्पणी-

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्सने ऑगस्ट २००६ मध्ये कॉमेंट्री करताना हाशिम आमला याच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान हाशिम आमला याला विकेट मिळाल्यानंतर कॉमेंट्री करत असलेला डीन जोन्स म्हणाला होता की, "दहशतवाद्याला आणखी एक विकेट मिळाली आहे." लाखो क्रिकेट चाहत्यांनी ही कॉमेंट्री ऐकली. यानंतर या प्रकरणी स्पष्टीकरण देताना डीन जोन्स म्हणाला होता की, "त्यावेळी जाहिराती चालू होत्या, अन्यथा असे बोलून सर्वांना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता". मात्र, त्यानंतर ब्रॉडकास्टरने डीन जोन्सचा करार तात्काळ रद्द केला. यानंतर डीन जोन्सने अनेकवेळा हाशिम आमलाची माफीही मागितली.

तस्लिमा नसरीन यांचे मोईन अलीबाबत वादग्रस्त ट्वीट-

२०२१ मध्ये लेखिका तस्लिमा नसरीन यांनी इंग्लंडचा क्रिकेटर मोईन अलीबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते. मोईन अलीच्या एका व्हिडीओवरुन नसरीन म्हणाल्या होत्या की, "जर मोईन अली हा खेळाडू नसता तर तो दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा सदस्य झाला असता". त्यांच्या या ट्विटवरून बराच वाद झाला होता. इंग्लंड संघानेही मोईन अलीचा बचाव करताना तस्लिमा नसरीन यांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

हे प्रकरण वाढल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, "मोईन अलीवर माझे ट्विट हे विनोदी अंगाने करण्यात आले होते, हे द्वेष करणाऱ्यांना चांगलेच माहित आहे. पण मी मुस्लिम समाजातील असल्याने त्या लोकांनी माझा अपमान करण्यासाठी हे प्रकरण वाढवले. तसेच, मी मुस्लिम समाजाला धर्मनिरपेक्ष बनवण्याचा प्रयत्न करते आणि कट्टरतेला विरोध करते. त्यामुळे मुद्दामहून या प्रकरणाला हवा देण्यात आली".

या सोबतच, मोईन अलीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जर्सीवरील दारूच्या जाहिरातीचा लोगो हटवण्याचे आवाहन केले होते.

वर्ल्डकपमधील पराभवानंतर मोहम्मद शमी भारतीयांंकडूनच ट्रोल-

२०२१ च्या टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर, भारताच्या मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन ट्रोल करण्यात आले होते. फेसबुकवरील अनेक कट्टरतावाद्यांनी शमी आपल्या देशाशी एकनिष्ठ नसून त्याने भारताला जाणूनबुजून हरवले आहे, असे म्हटले होते. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. भारताने हा सामना १० विकेट्सने गमावला. मात्र, या प्रकरणी भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि माजी क्रिकेटपटूंनी शमीला पाठिंबा दिला होता.

पुढील बातम्या