मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ऑलिम्पिक पदक विजेत्याला आपण न्याय देऊ शकत नाही, इतरांची काय स्थिती असेल? बॉक्सर विजेंदर सिंग संतापला

ऑलिम्पिक पदक विजेत्याला आपण न्याय देऊ शकत नाही, इतरांची काय स्थिती असेल? बॉक्सर विजेंदर सिंग संतापला

Dec 22, 2023, 08:15 PM IST

  • साक्षीच्या निवृत्तीनंतर विजेंदरने या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्वांनीच लक्ष घालायची गरज आहे, असे सांगितले.

Vijender Singh

साक्षीच्या निवृत्तीनंतर विजेंदरने या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्वांनीच लक्ष घालायची गरज आहे, असे सांगितले.

  • साक्षीच्या निवृत्तीनंतर विजेंदरने या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्वांनीच लक्ष घालायची गरज आहे, असे सांगितले.

काँग्रेस नेता आणि बॉक्सर विजेंदर सिंग हा कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर निराश झाला आहे. WFI च्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झाल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने गुरुवारी (२१ डिसेंबर) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

साक्षीच्या निवृत्तीनंतर विजेंदरने या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्वांनीच लक्ष घालायची गरज आहे, असे सांगितले.

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक आज गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. या निवडणूकीत संजय सिंह निवडून आले आणि नवे अध्यक्ष झाले. 

नवे अध्यक्ष संजय सिंग हे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे साक्षी मलिकने संतप्त होत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.

ब्रिजभूषण शरण यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. त्यांच्याविरोधात वर्षभरापासून आंदोलने सुरू आहेत. या आंदोनलाचा चेहर साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे आहेत.

विजेंदर सिंग काय म्हणाला?

एएनआयशी बोलताना विजेंदर म्हणालाकी, “खेळाडू असल्यामुळे मी तिची वेदना समजू शकतो. कुस्तीत ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या एकमेव महिला खेळाडूने न्याय मागितला. पण तिला तो मिळाला नाही. यामुळे तिने निराश होऊन निवृत्तीचा मार्ग स्विकारला. या सर्व घटनांमुळे जगात देशाची प्रतिमा सुधारेल की कमी होईल. 

विजेंदर पुढे म्हणाला, आधीच हरियाणावर हा आरोप होतो की, येथे मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो आणि मुलींची संख्या कमी आहे. आता या अशा घटनानंतर कोणते आई-वडील आपल्या मुलींना खेळात येऊ देतील.

ऑलिम्पिक पदक विजेत्याला आपण न्याय देऊ शकत नाही तर इतर मुलींची काय स्थिती होईल. पालकांना हे प्रश्न पडणार नाहीत का? या घटनेत पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्वांनीच लक्ष घालायची गरज आहे, असेही विजेंदर सिंगने सांगितले.

दरम्यान, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. या निवडणूकीत संजय सिंह निवडून आले आणि नवे अध्यक्ष झाले. या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान हिचा पराभव केला. 

या निवडणूकीच्या निकालानंतर निराश होऊन साक्षी मलिकने निवृत्तीचा मार्ग स्विकारला.

पुढील बातम्या