मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 : सामन्याच्या दोन दिवसआधीच भारताचे २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

CWG 2022 : सामन्याच्या दोन दिवसआधीच भारताचे २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

Jul 26, 2022, 07:58 PM IST

    • कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेट सामने २९ जुलैपासून सुरू होत आहेत. भारतीय संघ पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मात्र, संघाचे २ खेळाडू अद्याप बर्मिंगहॅमला पोहोचलेले नाहीत. ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत.
cwg

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेट सामने २९ जुलैपासून सुरू होत आहेत. भारतीय संघ पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मात्र, संघाचे २ खेळाडू अद्याप बर्मिंगहॅमला पोहोचलेले नाहीत. ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत.

    • कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेट सामने २९ जुलैपासून सुरू होत आहेत. भारतीय संघ पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. मात्र, संघाचे २ खेळाडू अद्याप बर्मिंगहॅमला पोहोचलेले नाहीत. ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत.

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघातील आणखी एक सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.आता क्रिकेट संघातील कोरोना संक्रमित खेळाडूंची संख्या दोन झाली आहे.  भारताचा पहिला सामना शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होणार आहे. दरम्यान कोरोना संक्रमित दोन खळाडूंना भारतातच सोडून संघ रविवारी बर्मिंगहॅमला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी संघातील एक सदस्य कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी केली होती. बर्मिंघमला रवाना होण्यापूर्वी संघाने एनसीएमध्ये सराव केला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) मध्ये महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत टी-२० सामने होणार आहेत.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'दुसरा खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. भारतीय संघ बर्मिंघमला   रवाना होण्यापूर्वी ही घटना घडली आहे. दोन्ही खेळाडू भारतातच थांबले आहेत. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, नियमानुसार दोन्ही खेळाडू निगेटिव्ह आले तरच संघात सामील होऊ शकतात. सध्याची परिस्थिती पाहता हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता नाहीच आहे. 

भारताला ३१ जुलै रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे आणि संघ ३ ऑगस्ट रोजी बार्बाडोस विरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळेल. अंतिम फेरीसह सर्व सामने एजबॅस्टन येथे खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीची तिकिटे आधीच विकली गेल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच, संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळण्याबाबत सांगितले की, 'आम्हाला नवा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला याबद्दल उत्सुकता आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांसाठी एक खास अनुभव असेल. टी-२० मध्ये भारतीय संघाची कामगिरी आहे'.

८ महिला क्रिकेट संघांचा समावेश-

राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटच्या ८ महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. हे संघ दोन गटात विभागलेले आहेत. या दोन्ही गटातील अव्वल २ संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.

अ गट : भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस

ब गट: इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका

७ ऑगस्ट रोजी सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. हरमनप्रीत कौरकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेतील क्रिकेट खेळांचा पहिला सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. तर ७ ऑगस्ट रोजी क्रिकेटसाठी सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने खेळवला जाणार आहे.

पुढील बातम्या