मराठी बातम्या  /  क्रीडा  /  लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या... विनेश फोगट-साक्षी मलिकचे कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षांवर आरोप

लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या... विनेश फोगट-साक्षी मलिकचे कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षांवर आरोप

Jan 18, 2023, 06:45 PM IST

    • Brij Bhushan Sharan Singh, vinesh phogat sakshi malik : भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी आज दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शने केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपही विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.
vinesh phogat sakshi malik

Brij Bhushan Sharan Singh, vinesh phogat sakshi malik : भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी आज दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शने केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपही विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.

    • Brij Bhushan Sharan Singh, vinesh phogat sakshi malik : भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी आज दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शने केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपही विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.

भारतीय कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर भारतीय कुस्ती महासंघाविरोधात निदर्शने करत आहेत. या आंदोलनात एकूण ३० कुस्तीपटूंचा सहभाग आहे. ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदके जिंकणारे कुस्तीपटूही या आंदोलनाचा भाग आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या निदर्शनात सहभागी कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि प्रशिक्षकांवर महिलांचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बजरंग पुनियाला शिविगाळ

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या काही धोरणांना आम्ही विरोध करत असल्याचे कुस्तीपटूंनी सांगितले. यावेळी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर शिविगाळ केल्याचाही आरोप केला आहे.

महिला कोच आणि कुस्तीपटूंचा लैंगिक छळ

तर विनेशने सांगितले की, “कोच महिला खेळाडूंना त्रास देत आहेत आणि फेडरेशनचे काही आवडते प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तन करतात. ते मुलींवर लैंगिक अत्याचार करतात. WFI अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे. यासोबतच पुरुष प्रशिक्षक मुलींचे आणि महिला प्रशिक्षकांचे लैंगिक शोषण करत असल्याचे विनेशने सांगितले.

फेडरेशनकडून धमक्या दिल्या जातात

यासोबतच, जंतरमंतरवर उपस्थित इतर कुस्तीपटूंनी फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “ते (कुस्ती फेडरेशन) आमच्या वैयक्तिक आयुष्यातही हस्तक्षेप करतात आणि आम्हाला त्रास देतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. आम्ही आवाज उठवल्यापासून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत.

आत्महत्येचे विचार यायचे- विनेश फोगाट

विनेश फोगट म्हणाली "टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर WFI अध्यक्षांनी मला 'खोटा सिक्का' म्हटले होते. WFIने माझा मानसिक छळ केला. मी रोज माझे जीवन संपवण्याचा विचार करायचे. जर एखाद्या कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी असेल. WFI अध्यक्षांची असेल."

सर्व आरोप निराधार- ब्रिजभूषण शरण सिंह

कुस्तीपटूंनी केलेल्या या आरोपांनंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

ब्रिजभूषण सिंग भाजपचे खासदार

कुस्तीपटूंच्या नाराजीनंतर ब्रिजभूषण सिंग भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ज्या पद्धतीने चालवत आहेत, त्यामुळे कुस्तीपटू वैतागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिजभूषण सिंह हे यूपीच्या कैसरगंज मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.

 

विभाग

पुढील बातम्या