मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : कॅच नाही सीरीज सोडली! झेल पकडल्यावर अतिउत्साह नडला, स्टोक्सने केली हर्शल गिब्ससारखी चूक

Ashes 2023 : कॅच नाही सीरीज सोडली! झेल पकडल्यावर अतिउत्साह नडला, स्टोक्सने केली हर्शल गिब्ससारखी चूक

Jul 31, 2023, 07:43 PM IST

    • Ben Stokes Drop Steve Smitn Catch : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील ५वी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य आहे.
Ashes 2023

Ben Stokes Drop Steve Smitn Catch : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील ५वी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य आहे.

    • Ben Stokes Drop Steve Smitn Catch : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील ५वी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य आहे.

eng vs aus ashes 2023 test : तुम्हाला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हर्शल गिब्स आठवत असेलच. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गिब्सची गणना केली जाते. १९९९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होता. त्या साामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉने एक शॉट खेळला, पण हा शॉट थेट गिब्सच्या हातात गेला. गिब्सने झेल पकडला पण अतिउत्साहाच्या भरात चेंडू वर फेकत असताना तो त्याच्या हातातून खाली पडला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्षेत्ररक्षकाचा चेंडूवर पूर्ण ताबा नसल्याचे विचारात घेत अंपायरने स्टीव्ह वॉला नॉट आऊट दिले. यानंतर आता आता अगदी तशीच चूक इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीत घडली आहे.

स्टोक्सने केली गिब्ससारखी चूक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील ५वी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी (३१ जुले) ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर उभा आहे. ६६व्या षटकात मोईन अलीचा एक चेंडू स्मिथच्या ग्लोव्हजवर लागून हवेत गेला. चेंडू लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे गेला, स्टोक्सने हवेत उडी घेत एका हातात झेल पकडला. पण अपील करण्याच्या नादात आणि चेंडू हवेत उडवण्याच्या प्रयत्नात तो स्टोक्सचा पायाला लागला. यामुळे चेंडू खाली पडला.

इंग्लंडने रिव्ह्यूदेखील गमावला

चेंडू खाली पडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अपील केले नाही. चूक झाली हे त्याला माहीत होते. पण सहकारी खेळाडूंच्या दबावामुळे त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. रिप्ले पाहिल्यानंतर तिसरे पंच नितीन मेनन यांना स्टोक्सचे चेंडूवर पूर्ण नियंत्रण नसल्याचे दिसून आले. यामुळे स्टीव्ह स्मिथला नाबाद घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य

५ सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने पुढे आहे. इंग्लंडने हा सामना आपल्या नावावर केला, तर मालिका अनिर्णित राहील. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३८४ धावांचे लक्ष्य आहे. संघाने ३ बाद २३८ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड ३१ आणि स्टीव्ह स्मिथ ४० धावांवर खेळत आहे. पावसामुळे खेळ थांबला आहे.

पुढील बातम्या