मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI Contract : रहाणे-भुवीचं करिअर संपलं! राहुलला इशारा, वार्षिक करारातून बीसीसीआयनं काय सांगितलं?

BCCI Contract : रहाणे-भुवीचं करिअर संपलं! राहुलला इशारा, वार्षिक करारातून बीसीसीआयनं काय सांगितलं?

Mar 27, 2023, 01:16 PM IST

  •  BCCI Annual Contracts : बीसीसीआयने २०२२-२३ हंगामासाठी भारतीय खेळाडूंची करार यादी जाहीर केली आहे. या नव्या करार यादीत काही खेळाडूंना बढती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंची पदावनतीही करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane BCCI Annual Contracts) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

ajinkya rahane BCCI Annual Contracts

BCCI Annual Contracts : बीसीसीआयने २०२२-२३ हंगामासाठी भारतीय खेळाडूंची करार यादी जाहीर केली आहे. या नव्या करार यादीत काही खेळाडूंना बढती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंची पदावनतीही करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane BCCI Annual Contracts) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

  •  BCCI Annual Contracts : बीसीसीआयने २०२२-२३ हंगामासाठी भारतीय खेळाडूंची करार यादी जाहीर केली आहे. या नव्या करार यादीत काही खेळाडूंना बढती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंची पदावनतीही करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane BCCI Annual Contracts) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

BCCI Annual Contract List : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२२-२३ हंगामासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने एकूण २६ खेळाडूंना करार यादीत स्थान दिले आहे. ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत खेळाडूंसोबत करार करण्यात आला आहे. यावेळी, A+ श्रेणीमध्ये ४, A मध्ये ५, B श्रेणीमध्ये ६ आणि C श्रेणीमध्ये ११ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या नव्या करार यादीत काही खेळाडूंना बढती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंची पदावनतीही करण्यात आली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आता A+ ग्रेडमध्ये सामील झाला आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत चांगला खेळ दाखवला आणि गेल्या वर्षीही त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. याउलट केएल राहुल, शार्दुल ठाकूर या खेळाडूंना यावेळी धक्का बसला असून त्यांची पदावनती झाली आहे.

रहाणे, इशांतची कारकीर्द संपली!

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांना करार यादीतून वगळण्यात आले आहे. दोघांनाही वगळून बीसीसीआयने त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे दरवाजे बंद झाल्याचे संकेत दिले आहेत. ३४ वर्षीय इशांत शर्माने २०२१ साली न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, तर ३४ वर्षीय अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून संघाबाहेर आहे. भुवनेश्वर कुमार, हनुमा विहारी, दीपक चहर आणि रिद्धिमान साहा या खेळाडूंनाही करार यादीत स्थान मिळालेले नाही.

भुवीला का वगळले?

ऋद्धिमान आणि हनुमा विहारी समजण्यासारखे आहेत, परंतु भुवनेश्वर आणि दीपक चहर यांना यादीतून वगळणे आश्चर्यकारक आहे. ३३ वर्षीय भुवनेश्वरने गतवर्षी विश्वचषकातही भाग घेतला होता, तर दीपक चहर दुखापतीमुळे बराच काळ बाहेर आहे. भुवीला कराराच्या यादीतून वगळण्याचा अर्थ बीसीसीआयला आता युवा वेगवान गोलंदाजांना आजमावायचे आहे.

केएल राहुलला स्पष्ट संदेश मिळाला!

स्टार फलंदाज केएल राहुलची ए ग्रेडमधून बी श्रेणीत पदावनत करून बीसीसीआयने भविष्याचे संकेत दिले आहेत. केएल राहुल चांगली कामगिरी करू शकला नाही, तर रहाणे, इशांत आणि भुवीप्रमाणे त्यालाही संघासह केंद्रीय करारातून मुक्त केले जाऊ शकते. केएल राहुल ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघर्ष करताना दिसला, तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म खूपच घसरला आहे.

बुमराह खेळणार नाही तरी पुन्हा A+ ग्रेडमध्ये का?

कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि दुखापतीने त्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी A+ श्रेणीत आपली जागा कायम ठेवली आहे. ग्रेड A+ मध्ये बुमराहचे असणे आश्चर्यकारक आहे कारण तो अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळापासून दूर आहे आणि येत्या काही महिन्यांतही तो मैदानात परतण्याची शक्यता नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपक चहर दुखापतीमुळे कराराच्या यादीतून बाहेर आहे, बुमराहला कोणत्या आधारावर A+ मध्ये ठेवण्यात आले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनीही प्रगती केली आहे. या चार खेळाडूंनी गेल्या १२ महिन्यांत चमकदार कामगिरी केली होती, ज्याचे त्यांना फळ मिळाले आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, ईशान किशन आणि केएस भरत हे देखील प्रथमच या करार यादीत सामील झाले आहेत.

पुढील बातम्या