मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI Contracts : महिला क्रिकेटपटूंना किती पैसे मिळतात, खेळाडूंचा ग्रेड आणि वार्षिक मानधन, पाहा संपूर्ण माहिती

BCCI Contracts : महिला क्रिकेटपटूंना किती पैसे मिळतात, खेळाडूंचा ग्रेड आणि वार्षिक मानधन, पाहा संपूर्ण माहिती

Apr 27, 2023, 03:25 PM IST

    • BCCI Central Contract Woman Cricket: महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त बीसीसीआयने स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना केंद्रीय करारामध्ये ए ग्रेडमध्ये स्थान दिले आहे 
BCCI Central Contract Woman Cricket

BCCI Central Contract Woman Cricket: महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त बीसीसीआयने स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना केंद्रीय करारामध्ये ए ग्रेडमध्ये स्थान दिले आहे

    • BCCI Central Contract Woman Cricket: महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त बीसीसीआयने स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना केंद्रीय करारामध्ये ए ग्रेडमध्ये स्थान दिले आहे 

BCCI Central Contract Woman Cricket : BCCI ने २०२२-२३ या वर्षासाठी महिला क्रिकेटपटूंचा केंद्रीय करार जाहीर केला आहे. केंद्रीय करारामध्ये एकूण १७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त सलामीवीर स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना ए ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बी ग्रेडमध्ये ५ आणि सी ग्रेडमध्ये ९ खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड ए ग्रेडमध्ये असलेल्या महिला खेळाडूंना दरवर्षी ५० लाख रुपये देते. बी श्रेणीतील खेळाडूंना ३० लाख रुपये आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रुपये मिळतात.

७ खेळाडू केंद्रिय करारातून मुक्त

बीसीसीआयने २०२१-२२ या वर्षाच्या वार्षिक करारामध्येही १७ खेळाडूंचा समावेश केला होता, परंतु मागील कराराचा भाग असलेल्या ७ खेळाडूंचा यावेळी समावेश करण्यात आलेला नाही. या खेळाडूंच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रेणुका ठाकूर, मेघना सिंह, देविका वैद्य, सबिनेनी मेघना, अंजली सरवानी, राधा यादव आणि यास्तिका भाटिया यांचा करारात समाविष्ट करण्यात आले आहे. हे खेळाडू आधी केंद्रीय कराराचा भाग नव्हते.

रेणुका ही एकमेव खेळाडू आहे जिला थेट बी ग्रेड करार देण्यात आला आहे, तर बाकीच्यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय करारातून हे खेळाडू बाहेर

पूनम यादव, मिताली राज, झुलन गोस्वामी, तानिया भाटिया, पूनम राऊत, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी.

जेमिमाला फायदा, पूजाचे नुकसान

जेमिमाह रॉड्रिग्स आणि रिचा घोष या आधी सी ग्रेडमध्ये होत्या, त्यांना आता बी ग्रेड कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर राजेश्वरी गायकवाड हिला अ श्रेणीतून ब श्रेणीत पाठवण्यात आले आहे. पूजा वस्त्राकरचीही बी वरून C श्रेणीत घसरण झाली आहे. माजी कर्णधार मिताली राज आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी निवृत्ती घेतली आहे. यामुळे, हे दोन दिग्गज कराराचा भाग नाहीत.

श्रेणी-अ (५० लाख रुपये) : हरमनप्रीत कौर, स्मृती मंधा आणि दीप्ती शर्मा.

श्रेणी-ब (३० लाख रुपये) : रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड.

श्रेणी-सी (१० लाख रुपये) : मेघना सिंग, देविका वैद्य, एस मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया.

पुढील बातम्या