मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Ban ODI: हरमनप्रीतच्या संघाची लाजिरवाणी कामगिरी, भारत प्रथमच बांगलादेशकडून पराभूत

Ind vs Ban ODI: हरमनप्रीतच्या संघाची लाजिरवाणी कामगिरी, भारत प्रथमच बांगलादेशकडून पराभूत

Jul 16, 2023, 05:44 PM IST

    • IND W vs BAN W highlights : १५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ११३ धावांत गारद झाला. या विजयासह बांगलादेश महिला संघाने इतिहास रचला आहे. वनडे सामन्यात बांगलादेशने प्रथमच भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे.
IND W vs BAN W highlights

IND W vs BAN W highlights : १५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ११३ धावांत गारद झाला. या विजयासह बांगलादेश महिला संघाने इतिहास रचला आहे. वनडे सामन्यात बांगलादेशने प्रथमच भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे.

    • IND W vs BAN W highlights : १५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ११३ धावांत गारद झाला. या विजयासह बांगलादेश महिला संघाने इतिहास रचला आहे. वनडे सामन्यात बांगलादेशने प्रथमच भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे.

BAN W vs IND W Match Report : बांगलादेशने एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाचा पराभव केला आहे. बांगलादेशने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा ९ विकेट्सनी पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पहिल्या वनडेची सुरुवात पावसाने झाली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ ४३ षटकांत १५२ धावांवर गारद झाला. यानंतर सुमारे तासभर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर तो ४४-४४ षटकांचा करण्यात आला. बांगलादेशचा संघ ४४ षटकात १५३ धावांवर गारद झाला. भारतीय संघाची गोलंदाजी अप्रतिम होती, त्यात डेब्यू करणारी अमनजोत कौरने ४, दीप्तीला १ आणि देविकाला २ विकेट्स मिळाल्या.

भारत वनडेत प्रथमच बांगलादेशकडून पराभूत

१५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ११३ धावांत गारद झाला. या विजयासह बांगलादेश महिला संघाने इतिहास रचला आहे. वनडे सामन्यात बांगलादेशने प्रथमच भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे.

निगार सुलतानाने सर्वाधिक ३९ धावा केल्या

तत्पूर्वी, या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला (BAN vs IND). यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या महिला संघाने ४४ षटकात १५२ धावा केल्या.

बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक ३९ धावा केल्या. दुसरीकडे, पदार्पणाच्या सामन्यातच भारतीय संघाकडून अमनजोत कौरने इतिहास रचला. पदार्पणाच्या सामन्यात अमनजोतने ४ बळी घेत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली.

भारताची फलंदाजी सुपर फ्लॉप

प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा टॉप आणि मध्यम क्रम फ्लॉप झाला. प्रिया पुनिया १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली, तर स्मृती मानधनाने ११ धावांत तिची विकेट गमावली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ती ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्जने १० धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडिया ३५.५ षटकात ११३ धावांवर गारद झाला आणि भारतीय संघाला ४० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

पुढील बातम्या