मराठी बातम्या  /  क्रीडा  /  'पद्मश्री' परत स्वीकारणार, कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया

'पद्मश्री' परत स्वीकारणार, कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया

Dec 24, 2023, 12:08 PM IST

    • Wrestling Federation Suspends by Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
Wrestling Federation Suspends by Sports Ministry

Wrestling Federation Suspends by Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

    • Wrestling Federation Suspends by Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (२४ डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

यंदा कुस्तीपटूंच्या विरोधानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ब्रिजभूषण शरण यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांनी निवडणूक जिंकली.

संजय सिंग अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषदेत रडत कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. 

साक्षीनंतर बजरंग पुनिया यानेदेखील पद्मश्री परत केला. त्याच्याशिवाय हरियाणाचा पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंग यानेही पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.

क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे बजरंग पुनियाकडून स्वागत

कुस्ती महासंघ बरखास्त केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणुकीनंतर अध्यक्ष झालेल्या संजय सिंह यांच्या निषेधार्थ बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत केला होता. कुस्ती संघटनेच्या निलंबनानंतर बजरंगने हा सन्मान परत घेणार असल्याचे सांगितले.

बजरंग म्हणाला, हा योग्य निर्णय आहे. आमच्या बहिणींवर आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पूर्णपणे हटवले पाहिजे. आमच्यावर अनेक आरोप झाले. आमच्याविरुद्ध राजकारण केले गेले. जेव्हा आपण पदके जिंकतो तेव्हा आपण देशाचे असतो. आम्ही खेळाडू कधीच भेदभाव करत नाही. आम्ही एकाच थाळीत एकत्र जेवतो.”

बजरंग पुढे म्हणाला, “आम्ही आमच्या तिरंग्यासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. सैनिक आणि खेळाडूंपेक्षा कोणीही कठोर परिश्रम करत नाही. आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. आम्ही कधीच देशद्रोही नव्हतो. आम्ही बक्षीस जिंकून मिळवले. आम्ही ते परत घेऊ शकतो. आम्ही सन्मान परत घेऊ. साक्षी निवृत्ती मागे घेईल की नाही याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही'.

पुढील बातम्या