मराठी बातम्या  /  क्रीडा  /  तुम्ही देशसेवेत बिझी असाल, पण... बजरंग पुनियानं पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आहे काय?

तुम्ही देशसेवेत बिझी असाल, पण... बजरंग पुनियानं पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आहे काय?

Dec 22, 2023, 07:49 PM IST

    • Bajrang Punia letter to pm modi : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. बजरंगने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे, त्या पत्रात नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.
Bajrang Punia (Sanjay Sharma)

Bajrang Punia letter to pm modi : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. बजरंगने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे, त्या पत्रात नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

    • Bajrang Punia letter to pm modi : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. बजरंगने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे, त्या पत्रात नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर त्याने ही माहिती दिली. बजरंगला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच बजरंग खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बजरंगने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना बजरंगने लिहिले की, "मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हे माझे पत्र असून हेच माझे स्टेटमेंट आहे.

बजरंग पुनियाच्या पत्रात नेमकं काय?

बजरंग पुनिया याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आह की "माननीय पंतप्रधान, मला आशा आहे की तुम्ही ठीक असाल. तुम्ही देशसेवेत प्रचंड व्यस्त आहात. पण या व्यस्ततेतही मला तुमचे लक्ष आमच्या कुस्तीकडे वेधायचे आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते, तेव्हा त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलनही सुरू केले होते. त्या आंदोलनात मीही सामील झालो.

सरकारने काहीच केलं नाही

सरकारने ठोस कारवाई करू, असे सांगितल्यावर आम्ही आमच्या घरी परतलो. पण ३ महिने उलटूनही ब्रिजभूषण विरोधात एफआयआर दाखल झाला नाही. यानंतर आम्ही सर्व कुस्तीपटू एप्रिल महिन्यात पुन्हा रस्त्यावर उतरलो. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर नोंदवावा म्हणून आंदोलन केले, पण तरीही या प्रकरणात काहीच काम झाले नाही.

यानंतर आम्हाला FIR साठी कोर्टात जावे लागले.  जानेवारीमध्ये तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या १९ होती, ती एप्रिलपर्यंत ७ वर आली, म्हणजेच या ३ महिन्यांत आपल्या ताकदीच्या जोरावर ब्रिजभूषण सिंह यांनी १२ महिला कुस्तीपटूंना आमच्यापासून दूर केले.

हे आंदोलन ४० दिवस चालले. या ४० दिवसांत आणखी एक महिला कुस्तीपटू आमच्यापासून दूर गेली. आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमच्या आंदोलन स्थळाची तोडफोड करण्यात आली आणि आम्हाला दिल्लीतून हाकलून देण्यात आले. आमच्या आदोलनांवर बंदी घालण्यात आली. 

आम्हाला काहीच सुचत नव्हतं

जेव्हा हे घडत होते, तेव्हा आम्हाला काय करावे हे सुचत नव्हते. त्यामुळे आम्ही आमची पदके गंगेत विसर्जित करण्याचा विचार केला. तिथे गेल्यावर आमचे प्रशिक्षक आणि शेतकऱ्यांनी आम्हाला तसे करू दिले नाही. त्याचवेळी आम्हाला तुमच्याच एका जबाबदार मंत्र्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितले परत या, तुम्हाला न्याय दिला जाईल. आम्ही परत आलो.

या दरम्यान, आम्ही आपल्या गृहमंत्र्यांचीही भेट घेतली, या भेटीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील आणि ब्रिजभूषण, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या कुस्तीपटूंना कुस्ती महासंघातून काढून टाकतील. यानंतर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून आमचे आंदोलन संपवले.

सम्मानाच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?

मात्र आता २१ डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या विजयानंतर त्यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'दबदबा होता आणि दबदबा राहणार.

 महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला माणूस पुन्हा मॅनेजमेंटमध्ये आला आहे. आणि उघडपणेतो आपला दबदबा, वर्चस्व असल्याचा दावा करत आहे. याच मानसिक दडपणाखाली ऑलिम्पिक पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे.

कालची रात्र रडत घालवली

आम्ही सर्वांनी कालची रात्र रडत घालवली. कुठे जायचं, काय करायचं, कसं जगायचं हे समजत नव्हतं. सरकार आणि जनतेने खूप आधार आणि हिम्मत दिली. पण याच मान सम्मानाच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?

२०१ मध्ये मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारही दिला गेला. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. असे वाटत होते की जीवन यशस्वी झाले आहे. पण आज मी त्याहून अधिक दु:खी आहे आणि हे सन्मान मला वेदना देत आहेत. 

एकच कारण आहे, ज्या कुस्तीसाठी आम्हाला हा मान मिळाला, आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना त्यांच्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागते आहे. खेळामुळे आपल्या महिला खेळाडूंच्या जीवनात प्रचंड बदल घडून आला. पूर्वी खेड्यापाड्यात ग्रामीण शेतात मुलं-मुली एकत्र खेळताना दिसू शकतात, याची कल्पनाही करता येत नव्हती. पण आधीच्या पिढीतील महिला खेळाडूंच्या धाडसामुळे हे घडू शकले. तुम्हाला प्रत्येक गावात मुली खेळताना दिसतील आणि त्या खेळण्यासाठी देश-विदेशातही जात आहेत.

त्यांची सावलीही महिला खेळाडूंना घाबरवते

पण या कुस्तीत ज्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे किंवा ते कायम राहणार आहे, त्यांची सावलीदेखील महिला खेळाडूंना घाबरवते आहे. आता त्यांनी कुस्ती संघावर पुन्हा पूर्ण ताबा मिळवला आहे, त्यांच्या गळ्यात हार तुरे घातलेला त्यांचा फोटोही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. 

बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणाऱ्या मुलींना अशा अंधाऱ्या स्थितीत टाकण्यात आले आहे की, त्यांना त्यांच्या खेळापासून मागे हटावे लागत आहे. 

महिला कुस्तीपटूंचा अपमान झाल्यानंतर मी माझे जीवन सन्मानाने जगू शकणार नाही. असे जीवन मला आयुष्यभर त्रास देईल. म्हणूनच हा "सन्मान" मी तुम्हाला परत करत आहे".

पुढील बातम्या