मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aus vs Afg: ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही, कारण ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल

Aus vs Afg: ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही, कारण ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल

Jan 12, 2023, 12:27 PM IST

    • Australia vs Afghanistan Series: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. त्यांनी त्यांच्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) याविरोधात मोहीम सुरू केली असून अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका रद्द केली आहे.
australia vs afghanistan odi series cancelled

Australia vs Afghanistan Series: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. त्यांनी त्यांच्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) याविरोधात मोहीम सुरू केली असून अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका रद्द केली आहे.

    • Australia vs Afghanistan Series: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. त्यांनी त्यांच्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) याविरोधात मोहीम सुरू केली असून अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका रद्द केली आहे.

australia vs afghanistan odi series cancelled: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ही मालिका मार्च महिन्याच्या अखेरीस UAE मध्ये खेळवली जाणार होती. मात्र तालिबानच्या काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले असून मालिका खेळण्यास नकार दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाला फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर यूएईमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही नियोजित होती. पण ऑस्ट्रेलियन संघ यापुढे ही मालिका खेळणार नाही.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. त्यांना शिक्षणासोबतच घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाही. मुलींना खेळात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या या निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन बोर्डाने आपल्या निवेदनात याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "अफगाणिस्तानसह जगभरातील महिला आणि पुरुषांना खेळात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सीए कटिबद्ध आहे. तसेच त्यांच्या देशातील महिला आणि मुलींची स्थिती सुधारण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहे".

अफगाणिस्तान हा आयसीसीचा एकमेव पूर्ण सदस्य आहे, ज्यांचा महिला संघ नाही. १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-१९ महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचा समावेश करण्यात आलेला नाही.

अफगाणिस्तान संघाला ODI सुपर लीग अंतर्गत गुण मिळणार

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर ही मालिका आयसीसी एकदिवसीय सुपर लीग अंतर्गत खेळली जाणार होती.

म्हणजेच, विजेत्या संघाला एकदिवसीय विश्वचषक अंतर्गत होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय सुपर लीगचे गुण मिळणार होते. पण आता ऑस्ट्रेलियाने मालिका रद्द केल्याने अफगाणिस्तानच्या खात्यात मालिकेतील ३० टक्के गुण जमा होतील.

पुढील बातम्या