मराठी बातम्या  /  क्रीडा  /  AUS vs SA T20 WC Final : आज वर्ल्डकप फायनल! ऑस्ट्रेलियासमोर आफ्रिका किती मजबूत? पाहा

AUS vs SA T20 WC Final : आज वर्ल्डकप फायनल! ऑस्ट्रेलियासमोर आफ्रिका किती मजबूत? पाहा

Feb 26, 2023, 10:50 AM IST

    • womens t20 world cup final : महिला T20 विश्वचषक २०२३चा अंतिम सामना आज रविवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
AUS vs SA T20 WC Final

womens t20 world cup final : महिला T20 विश्वचषक २०२३चा अंतिम सामना आज रविवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

    • womens t20 world cup final : महिला T20 विश्वचषक २०२३चा अंतिम सामना आज रविवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

australia vs south africa womens t20 world cup 2023 final : महिला T20 विश्वचषक २०२३ (Aus Vs Sa T20 WC ) चा अंतिम सामना आज रविवारी होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली आहे. फायनलमध्ये आज त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलिया-आफ्रिका फायनल संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल, हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाईल.

यजमान दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच वर्ल्डकप फायनल गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा ५ धावांनी पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी टप्प्यातील दोन सामने गमावून फायनलपर्यंत पोहोचला आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू शानदार फॉर्मात

ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिसा हीली ११९च्या स्ट्राईक रेटने १७१ धावा करत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तर कर्णधार मेग लॅनिंगनेही ११५ च्या स्ट्राईक रेटने १३९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत मेगन शुट ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे. तिने ९ विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेसाठी तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक १७६ धावा केल्या आहेत. सोबतच लॉरा वोल्वार्डने देखील १६९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत मारिजेन कॅप ही दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे. तिने ७ बळी घेतले आहेत.

दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका:

सुने लुउस (कर्णधार), अॅनेरी डर्कसेन, मारिजन कॅप, लारा गुडॉल, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, शबनीम इस्माईल, तझमिन ब्रिट्स, मसाबता क्लास, लॉरा वोल्वार्ड, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, डेल्मी बोस्च, अॅनी. टकर.

ऑस्ट्रेलिया:

मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

 

पुढील बातम्या