मराठी बातम्या  /  क्रीडा  /  AUS vs SA Final : ऑस्ट्रेलियानं ६व्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एकटीच लढली

AUS vs SA Final : ऑस्ट्रेलियानं ६व्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एकटीच लढली

Feb 26, 2023, 09:49 PM IST

    • AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.
SA W vs AUS W T20, Women's WC Final Highlights

AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.

    • AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.

australia vs south africa womens t20 world cup 2023 final : महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. या सोबतच ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ सातव्यांदा टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत होता आणि त्यांनी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा करता आल्या. लॉरा वोल्वार्डने ४८ चेंडूत ६१ धावा केल्या. १७व्या षटकात ती बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या.

आफ्रिकेची संथ सुरुवात

१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाची सुरुवात संथ झाली. पहिल्या ६ षटकात संघाला केवळ २२ धावाच करता आल्या आणि ताजमीन ब्रिट्सच्या रूपाने संघाने महत्त्वाची विकेटही गमावली. यानंतर एका टोकाकडून आक्रमक भूमिका घेत लॉरा वोल्वार्डने वेगाने धावा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, लॉरा ६१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशाही तिच्यासोबत संपुष्टात आल्या. शेवटी २० षटकांत आफ्रिकेला केवळ १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.

मेगन शुटने वोल्वर्डला  एलबीडब्ल्यू आऊट बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत मेगन शुट, जेस जोनासेन, ऍशले गार्डनर आणि डार्सी ब्राउन यांनी १-१ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. १८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर हीलीने मारिजाने कॅपला आपली विकेट दिली. यानंतर मैदानात आलेल्या अॅशले गार्डनरने आक्रमक भूमिका घेत २१ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली.

त्याचवेळी दुस-या टोकाकडून बेथ मुनी संघाची धुरा सांभाळण्यासोबतच धावसंख्या वाढवण्याचे काम करत होती. या सामन्यात बेथ मुनीने ५३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने २० षटकात ६ विकेट गमावून १५६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम इस्माईल आणि मारिजाने कॅपने गोलंदाजीत २-२ बळी घेतले.

पुढील बातम्या