मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Fan: शौक बडी चीज होती है… विराटला भेटण्यासाठी चाहत्यानं खर्च केले २३ हजार रुपये

Virat Kohli Fan: शौक बडी चीज होती है… विराटला भेटण्यासाठी चाहत्यानं खर्च केले २३ हजार रुपये

Oct 02, 2022, 07:06 PM IST

    • assam boy spends over 23k to meet virat kohli: विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये राहुलने रूम बुक केली. यासाठी राहुलला जवळपास २३ हजार रुपये खर्च करावे लागले.
virat kohli with fan

assam boy spends over 23k to meet virat kohli: विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये राहुलने रूम बुक केली. यासाठी राहुलला जवळपास २३ हजार रुपये खर्च करावे लागले.

    • assam boy spends over 23k to meet virat kohli: विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये राहुलने रूम बुक केली. यासाठी राहुलला जवळपास २३ हजार रुपये खर्च करावे लागले.

शौक बडी चीज होती है.. आणि ती पूर्ण करण्यासाठी लोक पैशाचीही पर्वा करत नाहीत. असेच काहीसे गुवाहाटीत घडले आहे. जेव्हा विराट कोहलीच्या एका कट्टर चाहत्याने त्याला भेटण्यासाठी २३ हजार रुपये खर्च केले. होय, गुवाहाटीच्या शांतीपूरमध्ये राहणाऱ्या राहुल रायने हे करुन दाखवले आहे. राहुल गेल्या ११ वर्षांपासून त्याचा आवडता क्रिकेटर विराट कोहलीला भेटण्याचे स्वप्न पाहत होता. अखेर त्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये राहुलने रूम बुक केली. यासाठी राहुलला जवळपास २३ हजार रुपये खर्च करावे लागले. मात्र, त्याने विराटला भेटण्याचे स्वप्नही पूर्ण केले. एवढेच नाही तर त्याने विराटसोबत सेल्फीही काढला.

राहुल म्हणाला, 'मी विमानतळावर होतो. मला विराट कोहली बाहेर येताना आणि बसमध्ये बसताना दिसत होता. सिक्युरिटीने मला त्यांच्या जवळ जाऊ दिले नाही. पण पुढील चार दिवस कोहली याच शहरात राहणार हे मला माहीत होतं. सराव सत्रादरम्यान मी त्याला एसीए बारसापारा स्टेडियममध्ये भेटण्याचा विचार केला. मात्र तेथेही कडक सुरक्षा होती. त्यामुळे मला विराटला भेटता आले नाही. पण शेवटी हॉटेलमध्येच मला माझ्या हिरोला भेटण्याची आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळालाच.

पुढील बातम्या