मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये सुनील छेत्रीला प्रवेश नाही, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये सुनील छेत्रीला प्रवेश नाही, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Jul 29, 2023, 10:12 PM IST

    • Asiad Games 2023 : आशियाई खेळ 2023 चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. या खेळांमध्ये भारताचा फुटबॉल संघही सहभागी होणार आहे. पण भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू आणि संदेश झिंगन यांना प्रवेश मिळालेला नाही. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घ्या.
asian games 2023

Asiad Games 2023 : आशियाई खेळ 2023 चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. या खेळांमध्ये भारताचा फुटबॉल संघही सहभागी होणार आहे. पण भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू आणि संदेश झिंगन यांना प्रवेश मिळालेला नाही. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घ्या.

    • Asiad Games 2023 : आशियाई खेळ 2023 चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. या खेळांमध्ये भारताचा फुटबॉल संघही सहभागी होणार आहे. पण भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू आणि संदेश झिंगन यांना प्रवेश मिळालेला नाही. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घ्या.

Indian Football Team for Asiad Games 2023 : भारतीय फुटबॉल संघाचे अव्वल खेळाडू सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर) आणि संदेश झिंगन यांना चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी संघात स्थान मिळालेले नाही. खरं तर, एशियन गेम्सच्या फुटबॉल संघामध्ये प्रामुख्याने २३ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असणे आवश्यक आहे, परंतु २३ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ३ खेळाडूंचा संघात समावेश करण्याची परवानगी आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना स्थान मिळालेले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पण नियमांवर नजर टाकली तर २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत केवळ २३ वर्षांखालील खेळाडूच फुटबॉल खेळत आहेत. याशिवाय यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तीन खेळाडूंनाच संघात परवानगी आहे. अशा परिस्थितीत या तीन स्टार खेळाडूंचा समावेश का करण्यात आला नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आता एआयएफएफने (AIFF) याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

वास्तविक, आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघात एकूण २२  खेळाडूंचा समावेश आहे. "IOA आणि AIFF ने वैयक्तिकरित्या एशियन गेम्स आयोजकांना या ३ खेळाडूंचा समावेश करण्यासाठी सूट देण्यास सांगितले आहे. जेव्हा ३ खेळाडू २३ वर्षांच्या वर जाऊ शकतात, तेव्हा हा गोंधळ का, हा प्रश्न कायम आहे. त्याचवेळी AIFF सचिव शाजी प्रभाकरन म्हणाले की आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला लवकरच मान्यता मिळेल".

एशियन गेम्ससाठी भारतीय फुटबॉल संघ

अन्वर अली, गुरमीत, लालेंगमाविया, नरेंद्र, रहीम अली, लालनंतलुंगा बावितलुंग, रोहित दानू, प्रभसुखान सिंग गिल, अनिकेत अनिल जाधव, राहुल कन्नोली प्रवीण, अमरजीत सिंग कियाम, आकाश मिश्रा, धीरज सिंग मोइरांगथेम, थोइबा सिंग, महेश सिंह, रोहीत सिंग, रोहीत सिंग. सिंग नौरेम, शिवशक्ती नारायणन, आशिष राय, विक्रम प्रताप सिंग, दीपक टांगरी, जॅक्सन सिंग थौनाओजम, सुरेश सिंग वांगजाम

पुढील बातम्या