मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup: IPL न खेळलेला खेळाडू आशिया कप खेळणार, 'या' बेस्ट गोलंदाजांवर अन्याय?

Asia Cup: IPL न खेळलेला खेळाडू आशिया कप खेळणार, 'या' बेस्ट गोलंदाजांवर अन्याय?

Aug 10, 2022, 08:27 PM IST

    • ndia squad for asia cup t20: आयपीएल २०२२ मध्ये चहल २७ विकेट्ससह अव्वल स्थानी होता आणि त्याने पर्पल कॅप जिंकली होती. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज उमरान मलिक होता, त्याने २२ बळी घेतले होते. तसेच, कुलदीप यादवने २१ आणि मोहम्मद शमीने २० विकेट घेतल्या होत्या. दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. मात्र, त्याला राखीवमध्ये ठेवण्यात आले आहे.
Asia Cup

ndia squad for asia cup t20: आयपीएल २०२२ मध्ये चहल २७ विकेट्ससह अव्वल स्थानी होता आणि त्याने पर्पल कॅप जिंकली होती. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज उमरान मलिक होता, त्याने २२ बळी घेतले होते. तसेच, कुलदीप यादवने २१ आणि मोहम्मद शमीने २० विकेट घेतल्या होत्या. दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. मात्र, त्याला राखीवमध्ये ठेवण्यात आले आहे.

    • ndia squad for asia cup t20: आयपीएल २०२२ मध्ये चहल २७ विकेट्ससह अव्वल स्थानी होता आणि त्याने पर्पल कॅप जिंकली होती. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज उमरान मलिक होता, त्याने २२ बळी घेतले होते. तसेच, कुलदीप यादवने २१ आणि मोहम्मद शमीने २० विकेट घेतल्या होत्या. दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. मात्र, त्याला राखीवमध्ये ठेवण्यात आले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २००८ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून या लीगने भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलून टाकले आहे. भारतीय टी-२० संघात आयपीएलमधूनच आक्रमक फलंदाज आले आणि गोलंदाजीची धारही आयपीएलमुळेच मजबूत झाली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आयपीएलने भारताला जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, दीपक चहर, हर्षल पटेल, टी नटराजन, आवेश खान आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू दिले आहेत. बुमराह, भुवी आणि चहल हे तर आज जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजांच्या गिणतीत येतात.

दरम्यान, बीसीसीआयने या महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात ३ वेगवान गोलंदाज आणि ४ फिरकीपटूंचा समावेश आहेत. हार्दिक पांड्या हा वेगवान गोलंदाजी करु शकतो. तर वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांना राखीव ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत यूएईच्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

उमरान-शमीला संधी नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टॉप-१० पैकी फक्त चहल आणि आवेश खान या दोनच गोलंदाजांना या संघात स्थान मिळाले आहे. तर स्पीड सेन्सेशन उमरान मलिक, मोहम्मद शमी, उमेश यादव या स्टार गोलंदाजांना राखीवमध्येही स्थान मिळाले नाही. 

आयपीएल न खेळलेल्या दीपक चहरचा संघात समावेश

या आयपीएलमध्ये चहलने सर्वाधिक २७ विकेट घेतल्या होत्या. त्याने पर्पल कॅप आपल्या नावावर केली. त्याच्यानंतर दुसरा भारतीय गोलंदाज उमरान मलिक होता, त्याने २२ बळी घेतले. कुलदीप यादवने २१ आणि मोहम्मद शमीने २० विकेट घेतल्या होत्या. दीपक चहर दुखापतीमुळे यावेळी आयपीएल खेळू शकला नाही. मात्र, शमी, उमरानऐवजी त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.

IPL 2022 मधील टॉप १० भारतीय गोलंदाज

युझवेंद्र चहल - २७ (पर्पल कॅप)

उमरान मलिक - २२

कुलदीप यादव - २१

मोहम्मद शमी - २०

हर्षल पटेल - १९

प्रसिद्ध कृष्ण - १९

आवेश खान - १८

टी नटराजन - १८

उमेश यादव - १६

खलील अहमद - १६

पुढील बातम्या