मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘आशिष नेहराच्या कोचिंगनंतर गुजरातचे बॉलर म्हणायचे आता मिडल स्टम्पच उडवणार’

‘आशिष नेहराच्या कोचिंगनंतर गुजरातचे बॉलर म्हणायचे आता मिडल स्टम्पच उडवणार’

May 30, 2022, 01:43 PM IST

    • गॅरी कर्स्टन यांनी गुजरातची फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला तर आशिष नेहराने संघाची गोलंदाजी भक्कम केली. दोघांनी गुजरातच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करवून घेतले.
गॅरी कर्स्टन आणि आशिष नेहरा

गॅरी कर्स्टन यांनी गुजरातची फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला तर आशिष नेहराने संघाची गोलंदाजी भक्कम केली. दोघांनी गुजरातच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करवून घेतले.

    • गॅरी कर्स्टन यांनी गुजरातची फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला तर आशिष नेहराने संघाची गोलंदाजी भक्कम केली. दोघांनी गुजरातच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करवून घेतले.

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत आपयीएल २०२२ ची ट्रॉफी आपल्या नावे केली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानचा ७ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यानंतर गुजरात संघाचे कोच आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पांड्या हे खूप आनंदात होते. दोघांनी सामन्यानंतर एकमेकांची मुलाखतही घेतली आहे. यात हार्दिकने नेहराचं प्रचंड कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच आयपीएलसारख्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सीझनमध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यामुळे तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे या स्पर्धेवर वर्चस्व होते.

आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपद पटकावण्यात गुजरातच्या दोन्ही प्रशिक्षकांचाही सिंहाचा वाटा आहे. गॅरी कर्स्टन यांनी गुजरातची फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला तर आशिष नेहराने संघाची गोलंदाजी भक्कम केली. दोघांनी गुजरातच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करवून घेतले.

आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यानंतर गुजरातचा गोलंदाजी कोच आशिष नेहरा आणि संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या खूपच खूश दिसत होते. त्यांनी फायनल सामना जिंकल्यानंतर एकमेकांचा इंटरव्ह्युव घेतला. यावेळी हार्दिकने नेहराचे भरपूर कौतुक केले आहे.

हार्दिक नेहराबाबत म्हणाला की, 'याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. की, आशिष नेहरा हा पहिलाच कोच आहे, जो सरावाला येतो, तसेच, कोणत्याही प्रत्येक कोचचा प्रश्न असतो की, सर्वांची फलंदाजी झाली असेल तर आता आपण निघू. मात्र, नेहरा हे एक मात्र कोच आहेत जे म्हणतात की, अजून २० मिनिटांचा वेळ आहे. चला परत फलंदाजी सुरु करा. आमच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व श्रेय हे आशिष नेहरा यांना जाते, कारण त्यांनी प्रत्येक खेळाडूकडून कठोर परिश्रम करवून घेतले आहेत. तेव्हा मैदानात उतरताना गुजरातचा प्रत्येक गोलंदाज म्हणायचा की, आता मिडल स्टम्पच उडवतो', मात्र, हे ऐकताच नेहरा म्हणाला 'असं काही नाही, हा खोटं बोलतोय. '

दरम्यान, आयपीएल २०२२ च्या फायनल सामन्यात राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते, ते गुजरातने १८.१ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

विभाग

पुढील बातम्या