मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Eng VS Aus Test : ज्या गोलंदाजाला टीम इंडियानं सहज विकेट दिल्या, त्याच बोलँडसोबत जो रूटनं हे काय केलं? पाहा

Eng VS Aus Test : ज्या गोलंदाजाला टीम इंडियानं सहज विकेट दिल्या, त्याच बोलँडसोबत जो रूटनं हे काय केलं? पाहा

Jun 17, 2023, 10:23 AM IST

    • joe root reverse sweep six scott boland : या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ८ बाद ३९३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
joe root reverse sweep six

joe root reverse sweep six scott boland : या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ८ बाद ३९३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

    • joe root reverse sweep six scott boland : या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ८ बाद ३९३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

joe root reverse sweep six : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2023 चा थरार सुरू झाला आहे. मालिकेतील पहिली .कसोटी बर्मिंगहॅम येथे सुरू आहे या कसोटी मालिकेसोबतच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा हंगामही सुरू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ८ बाद ३९३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. तत्पूर्वी, या कसोटी सामन्यातील एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. हा व्हिडीओ इंग्लंडच्या पहिल्या डावातील आहे. या व्हिडीओत जो रूट फलंदाजी करताना दिसत आहे.

जो रूटने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपद्वारे षटकार ठोकला. ज्याची कणी कल्पनाही केली नसेल. ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात रुटने बोलँडला हा षटकार ठोकला.

बोलंडने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेन्थ बॉल टाकला. रूटने बॉलची लाईन खूप लवकर ओळखली आणि पोझिशनमध्ये आला. यानंतर त्याने शानदार शॉट खेळला. रूटने रिव्हर्स स्वीपद्वारे चेंडू थर्ड-मॅनच्या दिशेने ६ धावांसाठी पाठवला. आता या षटकाराची चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी स्कॉट बोलँडला सहज विकेट दिल्या होत्या. बोलँडने wtc फायनलमध्ये ५ विकेट घेतल्या होत्या.

जो रूटच्या ११८ धावा

या डावात स्टार फलंदाज जो रूटने १५२ चेंडूत ११८ धावांची नाबाद शतकी खेळी केली. रूटचे हे ३० वे कसोटी शतक आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता १४ धावा केल्या आहेत. स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ८ धावांवर तर उस्मान ख्वाजा ४ धावांवर नाबाद आहे. पहिल्या डावात इंग्लंडकडे अजूनही ३७९ धावांची आघाडी आहे. जो रूट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. रूटने आधी ७४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने सहज करिअरचे ३० वे शतक गाठले.

 

 

पुढील बातम्या