मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : बेन स्टोक्सला चेंडू समजलाच नाही! वेग आणि स्विंगच्या जोरावर स्टार्कनं अशा उडवल्या दांड्या

Ashes 2023 : बेन स्टोक्सला चेंडू समजलाच नाही! वेग आणि स्विंगच्या जोरावर स्टार्कनं अशा उडवल्या दांड्या

Jul 28, 2023, 02:10 PM IST

    • eng vs aus 5th test day 1 highlights : स्टार्कच्या वेगवान आणि स्विंग झालेल्या चेंडूने स्टोक्सला असे काही चकवले की, स्टोक्सला काही सेकंद काय झाले समजलेच नाही. स्टार्कच्या या अप्रतिम चेंडूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि स्टार्कच्या स्विंग आणि वेगाचे कौतुक होत आहे.
Ashes 2023

eng vs aus 5th test day 1 highlights : स्टार्कच्या वेगवान आणि स्विंग झालेल्या चेंडूने स्टोक्सला असे काही चकवले की, स्टोक्सला काही सेकंद काय झाले समजलेच नाही. स्टार्कच्या या अप्रतिम चेंडूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि स्टार्कच्या स्विंग आणि वेगाचे कौतुक होत आहे.

    • eng vs aus 5th test day 1 highlights : स्टार्कच्या वेगवान आणि स्विंग झालेल्या चेंडूने स्टोक्सला असे काही चकवले की, स्टोक्सला काही सेकंद काय झाले समजलेच नाही. स्टार्कच्या या अप्रतिम चेंडूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि स्टार्कच्या स्विंग आणि वेगाचे कौतुक होत आहे.

Ben Stokes clean Bowled By Mitchell Starc : अ‍ॅशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना (२७ जुलै) सुरू झाला आहे. मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली पण मिचेल स्टार्कने डकेटला ६२ धावांवर बाद करून इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मग काय, यानंतर यजमान इंग्लंडने नियमित अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

हॅरी ब्रूकने मधल्या काळात डाव सांभाळण्याचे काम नक्कीच केले, त्याने ९१ चेंडूत ८५ धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांनी निराश केली. कर्णधार बेन स्टोक्स मिचेल स्टार्कच्या एक अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. स्टोक्सला केवळ ३ धावा करता आल्या. स्टार्कच्या वेगवान आणि स्विंग झालेल्या चेंडूने स्टोक्सला असे काही चकवले की, स्टोक्सला काही सेकंद काय झाले समजलेच नाही. स्टार्कच्या या अप्रतिम चेंडूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि स्टार्कच्या स्विंग आणि वेगाचे कौतुक होत आहे.

स्टोक्स बाद झाल्याने इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे कमकुवत झाली. स्टोक्स बाद झाल्यानंतर ख्रिस वोक्स (३६) आणि मार्क वूड (२८) यांनी खालच्या फळीत नक्कीच महत्त्वाची भागीदारी केली पण तेही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. अशाप्रकारे लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा संपूर्ण संघ ५४.४ षटकांत २८३ धावांवर गारद झाला.

त्याचबरोबर मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी यांनाही प्रत्येकी दोन, तर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अॅशेस मालिका २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने २-१ अशी आघाडी घेत ट्रॉफी कायम ठेवली आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर एक सामना इंग्लंडच्या नावावर राहिला. त्याचवेळी एका सामन्यात पावसाने अडथळा आणल्याने ऑस्ट्रेलियाचा फायदा झाला आणि त्यांनी अ‍ॅशेस ट्रॉफी रिटेन केली.

पुढील बातम्या