मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : बेन स्टोक्सचा Bazball गेम ऑस्ट्रेलियावर भारी, पाऊस आला नसता तर इंग्लंडनं मालिका जिंकली असती

Ashes 2023 : बेन स्टोक्सचा Bazball गेम ऑस्ट्रेलियावर भारी, पाऊस आला नसता तर इंग्लंडनं मालिका जिंकली असती

Aug 01, 2023, 10:39 AM IST

    • ashes 2023 : सुरुवातीला सलग दोन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने मालिकेत शानदार पुनरागमन केले आणि एक सामना अनिर्णित राहिल्यानंतरही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. दरम्यान मँचेस्टर कसोटीत पावसाने व्यत्यय आणला नसता तर इंग्लंडने ही मालिका खिशात घातली असती.
ashes 2023

ashes 2023 : सुरुवातीला सलग दोन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने मालिकेत शानदार पुनरागमन केले आणि एक सामना अनिर्णित राहिल्यानंतरही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. दरम्यान मँचेस्टर कसोटीत पावसाने व्यत्यय आणला नसता तर इंग्लंडने ही मालिका खिशात घातली असती.

    • ashes 2023 : सुरुवातीला सलग दोन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने मालिकेत शानदार पुनरागमन केले आणि एक सामना अनिर्णित राहिल्यानंतरही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. दरम्यान मँचेस्टर कसोटीत पावसाने व्यत्यय आणला नसता तर इंग्लंडने ही मालिका खिशात घातली असती.

eng vs aus 5th test day 5 highlights : अ‍ॅशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४९ धावांनी पराभव केला. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ३८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव ३३४ धावांवर आटोपला. हा सामना जिंकून इंग्लिश संघाने आपला अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संस्मरणीय निरोप दिला. विशेष म्हणजे शेवटच्या दोन विकेट ब्रॉडने (टॉड मर्फी आणि अॅलेक्स केरी) घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सामन्याच्या शेवटच्या दिवशी (३१ जुलै) ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या एकावेळी ३ बाद २६३ अशी होती आणि ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते, पण ट्रॅव्हिस हेड (४३) बाद होताच कांगारू संघाचा डाव फसला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नर (६०) आणि स्टीव्ह स्मिथ (५४) यांनीही उपयुक्त धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ४ तर मोईन अलीने दुसऱ्या डावात ३ खेळाडूंना बाद केले. ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क यांची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

पाचव्या कसोटीचा संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया - पहिला डाव : २९५ आणि दुसरा डाव : ३३४

लक्ष्य : ३८४ धावा

इंग्लंड - पहिला डाव : २८३ धावा आणि दुसरा डाव : ३९५

अ‍ॅशेस 2023 ची पहिली कसोटी बर्मिंगहॅममध्ये झाली. या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने विजय मिळवला होता. त्याचवेळी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान संघाचा ४३ धावांनी पराभव केला. त्यानंतर लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ३ गडी राखून विजय मिळवला.

पाऊस आला नसता तर इंग्लंडनं मालिका जिंकली असती

यानंतर मँचेस्टरमध्ये उभय संघांमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या कसोटीत पाऊस पडला नसता तर इंग्लंडला चौथी कसोटी सहज जिंकता आली असती आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधता आली असती. यानंतर पाचवी कसोटी जिंकून मालिका इंग्लंडच्या नावावर झाली असती. पण पावसामुळे तसे होऊ शकले नाही.

सुरुवातीला सलग दोन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने मालिकेत शानदार पुनरागमन केले आणि एक सामना अनिर्णित राहिल्यानंतरही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

अ‍ॅशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडेच राहणार

अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत असतानाही ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस ट्रॉफीवर कब्जा केला आहे. कारण उभय देशांमधील मागील अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० ने विजय मिळवला होता. अशा स्थितीत गतविजेता असल्याने ऍशेस ट्रॉफी आता कांगारू संघाकडेच राहणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलग चौथ्यांदा अ‍ॅशेस ट्रॉफी रिटेन केली आहे. २०१७-१८ च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० ने अ‍ॅशेस जिंकली होती. त्यानंतर २०१९ ची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली, त्यामुळे ऍशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडेच राहिली. यानंतर २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका ४-० ने जिंकली.

पुढील बातम्या