मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arshdeep Singh: ट्रोलिंगवर अर्शदीपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ट्वीट आणि मॅसेज पाहून…

Arshdeep Singh: ट्रोलिंगवर अर्शदीपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ट्वीट आणि मॅसेज पाहून…

Sep 06, 2022, 07:12 PM IST

    • टीम इंडियाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला. सामन्यानंतर अर्शदीपच्या कॅचचा मुद्दा खूप मोठा झाला. कारण अर्शदीपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता अर्शदीपने या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Arshdeep Singh

टीम इंडियाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला. सामन्यानंतर अर्शदीपच्या कॅचचा मुद्दा खूप मोठा झाला. कारण अर्शदीपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता अर्शदीपने या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    • टीम इंडियाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला. सामन्यानंतर अर्शदीपच्या कॅचचा मुद्दा खूप मोठा झाला. कारण अर्शदीपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता अर्शदीपने या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाने भारतावर पाच गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून आणि एक चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या सामन्यात या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला. १८ व्या षटकात रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर अर्षदीपकडूनआसीफ अलीचा सोपा झेल सुटला. हा झेल सोडणे खूपच भारताला महागात पडले. कारण नंतरच्या १९ व्या षटकात पाकिस्तानने १९ धावा वसूल केल्या. आसीफ अलीने सामन्यात ८ चेंडूत १६ धावा केल्या. शेवटी भारताने हा सामना पाच विकेट्सनी गमावला.

सामन्यानंतर अर्शदीपच्या कॅचचा मुद्दा खूप मोठा झाला. कारण अर्शदीपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण टीम इंडियाचे खेळाडू अर्शदीपच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले. अर्शदीपनेही या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

अर्शदीप वडिलांना काय म्हणाला

आशिया कपच्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी अर्शदीप सिंगचे आई-वडीलही आले होते. अर्शदीपचे वडील दर्शन सिंग यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की, “या प्रकारचे ट्विट आणि मॅसेज पाहून अर्शदीपला हसू येत होते. अर्शदीपने सांगितले की, तो या सर्व गोष्टी सकारात्मक पद्धतीने घेत आहे. या गोष्टींमुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.” अर्शदीपने वडिलांना सांगितले की, संपूर्ण भारतीय संघ त्याच्या पाठिशी उभा आहे.

अर्शदीपने सामना २० व्या षटकातील ५ व्या चेंडूपर्यंत नेला

दरम्यान, तो एकमेव ड्रॉप कॅच सोडला तर अर्शदीप सिंगने टीम इंडियासाठी या सामन्यात खूपच चांगली कामगिरी केली. अर्शदीपने ३.५ षटकात २७ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला ७ धावांची गरज होती, त्यावेळी अर्शदीपने पाकिस्तानच्या गोटात खळबळ माजवली होती. अर्शदीपने सामना ५ व्या चेंडूपर्यंत ताणला होता.

 

पुढील बातम्या