मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बॉर्डर-गावस्कर मालिका, मोहम्मद सिराजला शिविगाळ! नेमकं काय घडलं? रहाणेचा खुलासा..

बॉर्डर-गावस्कर मालिका, मोहम्मद सिराजला शिविगाळ! नेमकं काय घडलं? रहाणेचा खुलासा..

Jun 02, 2022, 03:55 PM IST

    • बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून विराट कोहली (virat kohli) पॅटर्निटी रजा घेवून भारतात परतला होता.
सिराज

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून विराट कोहली (virat kohli) पॅटर्निटी रजा घेवून भारतात परतला होता.

    • बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून विराट कोहली (virat kohli) पॅटर्निटी रजा घेवून भारतात परतला होता.

ऑस्ट्रेलियात (austrelia) गेल्या वर्षी झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या (border gavaskar test series) आठवणी भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात आजही ताज्या असतील. टीम इंडियाचे (team india)चाहते ती मालिका कधीच विसरु शकणार नाहीत. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने ती चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली होती. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांची गाब्बामधील खेळीही सर्वांना आठवत असेल. पण या मालिकेत आणखी एक घटना घडली होती, ज्याची बरीच चर्चा देखील झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सिडनी कसोटीदरम्यान मैदानावर उपस्थित काही प्रेक्षकांनी भारताच्या मोहम्मद सिराजला (mohammad siraj) शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर खेळ काहीवेळ थांबवण्यातही आला होता, तसेच त्या प्रेक्षकांना बाहेर काढेपर्यंत सामना होऊ देणार नाही, असे टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्ट सांगितले होते.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून विराट कोहली (virat kohli) पॅटर्निटी रजा घेवून भारतात परतला होता. यानंतर उरलेल्या तीन कसोटी सामन्यांचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे (ajinkya rahane)आले होते.

दरम्यान, रहाणेने नुकतेच मोहम्मद सिराजसोबत घडलेल्या त्या घटनेबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी अम्पायरसोबत काय संभाषण झाले होते, ते रहाणेनं पहिल्यांदाच सांगितले आहे.

इएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, " प्रेक्षकांनी अपशब्द वापरल्यानंतर जेव्हा सिराज माझ्याकडे आला, तेव्हा मी अम्पायर्सना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले. तो पर्यंत आम्ही सामना खेळणार नाही असेही बजावले. यावर अम्पायर्सनी 'तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मैदानाबाहेर जावू शकता, तुम्ही सामना असा थांबवू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर "आम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत ना की, ड्रेसिंग रुमध्ये बसण्यासाठी", असे रहाणे म्हणाला.

तसेच, तो पुढे म्हणाला की, त्या प्रेक्षकांना बाहेर काढण्याकरिता आम्ही अम्पायर्सवर पूर्णपणे दबाव आणला, कारण आमचा सहकारी खेळाडू ज्या परिस्थितीतून गेला होता, त्याला त्यावेळी पूर्णपणे पाठिंबा देणे गरजेचे होते. सिडनीत जे काही घडले ते पूर्ण चुकीचे होते,' असे रहाणे म्हणाला. या घटनेदरम्यान १० मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. त्या प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला.

पुढील बातम्या