मराठी बातम्या  /  क्रीडा  /  शाळकरी मुलांसमोर अभिनव बिंद्रा भावूक; म्हणाला, प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीचा लाभ मिळावा

शाळकरी मुलांसमोर अभिनव बिंद्रा भावूक; म्हणाला, प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीचा लाभ मिळावा

Apr 07, 2023, 03:18 PM IST

    • Abhinav Bindra : देशातील प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे अभिनव बिंद्राने ((Abhinav Bindra)) म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तो बोलत होता. 
Abhinav Bindra

Abhinav Bindra : देशातील प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे अभिनव बिंद्राने ((Abhinav Bindra)) म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तो बोलत होता.

    • Abhinav Bindra : देशातील प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे अभिनव बिंद्राने ((Abhinav Bindra)) म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तो बोलत होता. 

इंटरनेशनल डे ऑफ स्पोर्ट्स फॉर डेवलपमेंट अँड पीस (IDSDP) ६ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रीडा गुरुवारी (६ एप्रिल) पार पडला. या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज आणि IOC ऍथलीट्स कमिशनचा सदस्य (International Olympic Committee) अभिनव बिंद्रा याने देशातील शाळकरी मुलांना खेळाचे फायदे सांगितले. सोबतच, एक ऑलिम्पियन म्हणून खेळाडूने काय केले पाहिजे, त्याचे कर्तव्य आहे, हे सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तो म्हणाला, की भारतातील प्रत्येक मुलाला खेळ आणि ऑलिम्पिक चळवळीचा फायदा झाला पाहिजे. अभिनव बिंद्रा हा IOC अॅथलीट्स कमिशनचा सदस्य देखील आहे. बिंद्राने पुढे सांगितले की, एक ऑलिम्पियन म्हणून तो आयुष्यभर ऑलिम्पिक मूल्यांसाठी वचनबद्ध झाला आहे. ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम (OVEP) च्या मदतीने तो ही मुल्य भारतातील शाळकरी मुलांसोबत शेअर करत असतो.

Abhinav Bindra

कारकिर्दीतील शेवटचा प्रसंग आठवून अभिनव बिंद्रा भावूक

यावेळी अभिनव बिंद्रा आपल्या नेमबाजी कारकिर्दीतील शेवटचा प्रसंग आठवून भावूकदेखील झाला. तो म्हणाला की, “ २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक गेम्सने माझ्या दोन दशकांच्या क्रीडा कारकिर्दीचा शेवट झाला. मी चौथ्या स्थानावर होतो. मी कांस्यपदक गमावले होते. मात्र, त्यावेळी माझे प्रतिस्पर्धी खेळाडू आणि माझे सहकारी माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझे आभार मानले, माझ्या कारकिर्दीसाठी माझे अभिनंदन केले. मला खूप सन्मान आणि आदर दिला. यामुळे चौथ्या क्रमांकावर माझ्या करिअरचा अंत झाल्याचे अपयश पचवणे माझ्यासाठी सोपे झाले. तेव्हा मला जाणवले की मी कदाचित येत्या काही दिवसांत नेमबाज राहणार नाही, पण खेळ आणि ऑलिम्पिक मूल्ये मला कधीही सोडणार नाहीत”.

सोबतच, योग्य खेळ, प्रामाणिकपणा आणि सचोटी, ही मूल्ये जगाला प्रत्येकासाठी एक चांगले स्थान बनवू शकतात," असेही बिंद्रा म्हणाला.

ओडिशा सरकार आणि अभिनव बिंद्राच्या भागीदारीतून OVEP लाँच

माझा ठाम विश्वास आहे की एक ऑलिम्पियन म्हणून आपण ऑलिम्पिक मूल्यांसाठी वचनबद्ध असले पाहिजे. आपण तरुणांना शक्य तितकी मदत केली पाहिजे जेणेकरून ते त्यांच्यातील कलागुणांना वाव देतील. हेच ध्येय लक्षात घेऊन, अभिनव बिंद्रा फाऊंडेशनने IOC आणि ओडिशा सरकारच्या शालेय व जनशिक्षण विभागाच्या भागीदारीत एक वर्षापूर्वी भारतात OVEP म्हणजेच ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम (ऑलिम्पिक व्हॅल्यू एजुकेशन प्रोग्राम) लाँच केले. ओडिशातील ९० सरकारी शाळांमधील सुमारे ५० हजार मुलांना याचा लाभ मिळत आहे.

OVEP नंतर शाळांमध्ये फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढल्या

हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या शाळांमध्ये शारीरिक हालचालींमध्ये (फिजीलकल अॅक्टिव्हिटी) ५० टक्के वाढ झाली आहे. कमी उपस्थिती असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेत OVEP सत्र सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत विद्यार्थी संख्येत १२ टक्के वाढ झाली. जेव्हा मिक्स जेंडर, आंतर-शालेय ओवीईपी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, तेव्हा संघाच्या जवळपास ६० टक्के कर्णधार मुली होत्या".

विशेष म्हणजे, एका शाळेत OVEP ने एका अपंग विद्यार्थ्याला सॉकर मैदानात आणले. आज तो मुलगा आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो आहे. तो आता म्हणतो आहे की तो जिथे जाईल तिथे ऑलिम्पिक मूल्याचा प्रसार करू इच्छितो".

अभिनव बिंद्रा पुढे म्हणाला, “ओडिशामध्ये सादर होणारा शालेय क्रीडा कार्यक्रम ऑलिम्पिकशी संबंधित असू शकतो की नाही याबद्दल तुम्हाला शंका असेल. माझा विश्वास आहे की भारतातील प्रत्येक मुलाकडे खेळ आणि ऑलिम्पिक चळवळीतून काहीतरी मिळवण्यासारखे आहे. याद्वारे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल. ते संघकार्य, बंधुता आणि भागीदारीचे महत्त्व जाणून घेऊ शकतील”.

पुढील बातम्या