मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parliament Special Session Live Updates : लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
Parliament Special Session Live Updates (HT_PRINT)

Parliament Special Session Live Updates : लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Sep 19, 2023, 03:56 PMIST

Parliament Special Session : विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे.

Sep 19, 2023, 03:56 PMIST

महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती विधेयक आणणार, मोदींची घोषणा

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आजपासून अधिवेशनाचे कामकाज नवीन संसद भवनात सुरू करण्यात आले आहे. आज नव्या संसदेच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयक (नारीशक्ती वंदन अधिनियम) पटलावर मांडला गेला. त्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक लवकरच मांडणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. 

Sep 19, 2023, 03:07 PMIST

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाचं विधेयक सादर केलं आहे. आता त्यावर उद्या सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे.

Sep 19, 2023, 02:34 PMIST

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत, थोड्याच वेळात होणार मतदान

केंद्रातील मोदी सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षणास मंजुरी देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला आहे. त्यानंतर यासंर्भातील विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. विधेयकावर चर्चा सुरू झाली असून थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Sep 19, 2023, 12:17 PMIST

नव्या संसदेत पीएम मोदींच्या भाषणाला सुरुवात

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेतील खासदारांना संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. महिला सबलीकरण, कलम ३७०, जुनी व नवी विधेयकं आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांवर पीएम मोदी यांनी भाष्य केलं आहे.

Sep 19, 2023, 10:42 AMIST

संसदेत भाजपा खासदार अचानक बेशूद्ध, प्रकृती स्थिर, अनर्थ टळला

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी एकत्र येत फोटोसेशन केल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्याचवेळी भाजपा खासदार भाजपा नरहरी अमीन हे अचानक बेशूद्ध झाले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी त्यानंतरच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

Sep 19, 2023, 10:41 AMIST

लोकसभा-राज्यसभेच्या खासदारांचं एकत्र फोटोसेशन

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी एकत्र फोटोसेशन केलं आहे. त्यातून संसदेतील नेत्यांची एकी दिसून आली आहे. सर्वपक्षीय खासदारांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचं दिसून आलं.

Sep 19, 2023, 09:37 AMIST

संसदेत आज मनमोहन सिंग भाषण करणार

केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भाषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या कामकाजात सिंग सहभागी होणार असून ते विविध विषयांवर संसदेत व्यक्त होणार असल्याची माहिती आहे.

Sep 19, 2023, 09:37 AMIST

खासदारांना नवा ड्रेसकोड मिळणार?, आजच्या अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता

संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात आज संसदेच्या नव्या इमारतीत होणार आहे. यावेळी केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील सर्व खासदारांसाठी नवा ड्रेसकोड जारी केला जाण्याची शक्यता आहे. आजच्या कामकाजा दरम्यान याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

Sep 18, 2023, 01:11 PMIST

एका मतासाठी संसदेत वाजपेयींचं सरकार पडलं- मोदी

संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. संसद ही लोकशाहीची ताकद असते, अनेक ऐतिहासिक प्रश्नांवर याच संसदेत तोडगा काढण्यात आला आहे. कलम ३७०, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी, वन रँक वन पेन्शन, गरीबांना १० टक्के आरक्षण देण्याचे असे अनेक निर्णय या संसदेतच घेण्यात आल्याचं पीएम मोदी यांनी सांगितलं आहे.

Sep 18, 2023, 10:48 AMIST

खासदारांनी काढली जून्या संसदेची आठवण; महिला खासदार भावूक

दिल्लीतील जून्या संसदेच्या इमारतीत आज अखेरचं कामकाज होणार आहे. त्यामुळं अनेक खासदारांनी जून्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अकाली दलाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी संसदेच्या जून्या आठवणी ताज्या केल्या आहे. त्यांनी आतापर्यंतच्या अनेक घटना सांगत जून्या संसदेशी कशी नाळ जुळलेली होती, याबाबतची एक पोस्ट शेयर केली आहे.

Sep 18, 2023, 10:23 AMIST

अधिवेशनाचा अजेंडा का दिला नाही?, विरोधकांचा मोदी सरकारला सवाल

संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होवूनही विरोधी पक्षांना अधिवेशनाचा अजेंडा मिळालेला नाही. संसद बुलेटिनमध्ये सूचक विधानं केलेली असून सरकार ऐनवेळी आणखी विधेयक चर्चेला आणणार असल्याचा दावा करत तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

Sep 18, 2023, 09:46 AMIST

parliament session agenda 2023 : संसदेच्या अधिवेशनात कोणत्या विधेयकांवर होणार चर्चा?

parliament special session agenda 2023 : संसदेच्या या अधिवेशनात चार विधेयकं पटलावर ठेवली जाणार आहे. त्यामध्ये अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, माध्यमं आणि नियतकालिके नोंदणी विधेयक २०२३, पोस्ट ऑफिस विधेयक आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयकांचा समावेश आहे. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर ही सर्व विधेयकं मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवली जाणार आहे.

Sep 18, 2023, 09:45 AMIST

parliament session time today : सकाळी ११ वाजेपासून होणार कामकाजाला सुरुवात

parliament session time today : संसदेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तरांचा तास नसेल. तसेच अशासकीय कामकाजही होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sep 18, 2023, 09:44 AMIST

parliament session today : विरोधकांची बैठक, संसदेच्या आवारात मोठी सुरक्षाव्यवस्था

parliament session today : केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये संभावित कामकाजावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर संसदेच्या आवारात मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Sep 18, 2023, 09:43 AMIST

parliament session live : आजचं कामकाज जुन्या संसदेतूनच, नव्या संसदेत उद्या होणार कामकाज

parliament session live : आजपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संसदेच्या नव्या इमारतीत होणार आहे. केवळ आजचं म्हणजेच सोमवारचं कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Sep 18, 2023, 09:42 AMIST

Parliament Special Session : अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशना जी २० शिखर परिषद, चांद्रयान ३, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, वन नेशन-वन इलेक्शन आणि समान नागरी कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशाचं नाव इंडिया की भारत?, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sep 18, 2023, 09:40 AMIST

parliament special session : आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार

parliament special session live updates : केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

    शेअर करा