मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 27 August 2023 : अमेरिका पुन्हा हादरली, फ्लोरिडातील गोळीबारात तिघांचा मृत्यू
Live News Updates 27 August 2023 (HT)

Live News Updates 27 August 2023 : अमेरिका पुन्हा हादरली, फ्लोरिडातील गोळीबारात तिघांचा मृत्यू

Aug 27, 2023, 12:45 PMIST

Live News Updates 27 August 2023 : अमेरिकेतील फ्लोरिडा या शहरात अज्ञात आरोपीने तुफान गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 27, 2023, 12:45 PMIST

Beed News : अजित पवार गटाची आज बीडमध्ये जाहीर सभा

Ajit Pawar LIVE In Beed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून आज बीडमध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आजच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना आज अजित पवारांकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

Aug 27, 2023, 07:11 AMIST

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Rain Update : विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि गोव्यातील पणजीसह घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Aug 27, 2023, 06:18 AMIST

Florida Firing : अमेरिकेत पुन्हा तुफान गोळीबार, तिघांचा मृत्यू, आरोपीला अटक

Florida Firing : अमेरिकेतील फ्लोरिडा या शहरात अज्ञात आरोपीने तुफान गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    शेअर करा