मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 13 August 2023 : ठाणे मनपाच्या रुग्णालयात १२ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू
Live News Updates 13 August 2023 (HT)

Live News Updates 13 August 2023 : ठाणे मनपाच्या रुग्णालयात १२ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू

Aug 13, 2023, 05:06 PMIST

Live News Updates 13 August 2023 : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Aug 13, 2023, 05:06 PMIST

कळवा रुग्णालयात १२ तासात १७ मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे सरकारही हादरले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. 

Aug 13, 2023, 04:29 PMIST

५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही

ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. ’ असं आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Aug 13, 2023, 12:31 PMIST

Free Treatment : रूग्णांना शासनातर्फे मोफत उपचार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Free Treatment In Government Hospital : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील गरजू तसेच गरीब रुग्णांना शासकीय खर्चाने उपचार देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळं आता ऐन महागाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Aug 13, 2023, 11:29 AMIST

Thane News : ठाणे मनपाच्या रुग्णालयात १२ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू

Thane City News : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर्सची कमतरता असताना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळं ठाण्यात ही स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Aug 13, 2023, 06:15 AMIST

Solapur News : फडणवीस-पवार एकाच मंचावर; सोलापुरातील कार्यक्रमात येणार एकत्र

Solapur News : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मारक अनावरण कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर येणार आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर दोन्ही नेते आमने-सामने येणार आहे. त्यामुळं सभेतून कोण काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Aug 13, 2023, 06:15 AMIST

Gujarat Crime News : गुजरातच्या बँक ऑफ महाराष्ट्रात दरोडा, १४ लाखांची रक्कम लंपास

Gujarat Crime News : गुजरातमधील सूरत शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. डोक्यात हेल्मेट घालून बँकेत आलेल्या चोरट्यांनी १४ लाख रुपयांचा दरोडा टाकला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस बँकेत दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींनी रक्कम लंपास झाले असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर त्यांचा शोध घेतला जात आहे.

Aug 13, 2023, 06:14 AMIST

Municipal Elections : लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुका होणार- रामदास आठवले

Municipal Elections : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकात लोकसभेपूर्वी म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहे. परिणामी सर्वच मनपांमध्ये प्रशासकराज सुरू आहे.

    शेअर करा