मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 09 June 2023 : नीलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादीचा जेलभरो
Live News Updates 09 June 2023 (HT)

Live News Updates 09 June 2023 : नीलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादीचा जेलभरो

Jun 09, 2023, 03:11 PMIST

NCP Protest : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आज जेलभरो आंदोलन करणार आहे.

Jun 09, 2023, 03:10 PMIST

मुंबईतील डबेवाल्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबईतील डबेवाल्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'सागर' या निवासस्थानी भेट घेतली. डबेवाल्यांनी त्यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या.

Mumbai's Dabbawala met DCM Devendra Fadnavis
Mumbai's Dabbawala met DCM Devendra Fadnavis

Jun 09, 2023, 01:22 PMIST

Sharad Pawar : धमकीनंतर शरद पवारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर जीवे मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केली आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

Jun 09, 2023, 12:48 PMIST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले.

Jun 09, 2023, 12:31 PMIST

MST CET 2023 Result : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर होणार

MHT CET 2023 Result : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय पद्धतीनं प्रवेश फेऱ्या होतील.

Jun 09, 2023, 11:14 AMIST

Stock Market Update : शेअर बाजारात नकारात्मक वातावरण, सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स घसरला

मागील काही दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजारात कालपासून नकारात्मक वातावरण आहे. सेन्सेक्स ८० अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही २० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. बँक निफ्टी मात्र सकारात्मक वाटचाल करत आहे.

Jun 09, 2023, 10:41 AMIST

मुंबईः वाघाच्या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २५ मार्च रोजी जन्मलेल्या वाघाच्या चार बछड्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला होता. तर चौथ्यावर उपचार सुरू होते. या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

Jun 09, 2023, 09:38 AMIST

NCP Protest : नीलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं आज जेलभरो आंदोलन

NCP Protest against Nilesh Rane : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल माजी खासदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आज जेलभरो आंदोलन करणार आहे.

Jun 09, 2023, 06:52 AMIST

कोल्हापुरातील हिंसाचारानंतर संभाजीनगरात पोलिसांचा मोठा निर्णय

कोल्हापुरात दोन गटात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर आता पुणे आणि संभाजीनगर या शहरांमध्ये गृहखात्याने अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर आता संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी रात्री ११ नंतर शहर बंद करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यासाठी सात पथकं एकाचवेळी रस्त्यावर उतरून दुकानं बंद करण्याचं आवाहन करणार आहे. जिथे विरोध होईल तिथे कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 09, 2023, 06:21 AMIST

Kolhapur Violence : कोल्हापुरात वाहतूक सुरळीत, पोलिसांचा शहरात मोठा बंदोबस्त

Kolhapur Violence : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्यानंतर कोल्हापुरात दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. याशिवाय शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या दोन दिवसांनंतर आज कोल्हापुरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Jun 09, 2023, 06:20 AMIST

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : यंदाच्या हंगामातील मान्सून केरळात दाखल झाला आहे. त्यानंतर आता येत्या ४८ तासांत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Jun 09, 2023, 06:19 AMIST

Zaveri Bazaar Fire Incident : मुंबईतील झवेरी बाजारातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Zaveri Bazaar Fire Incident : मुंबईतील झवेरी बाजारातील पाचमजली इमारतीला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या आहे. स्थानिकांसह जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे.

    शेअर करा