मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 7 June 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसदेला संबोधणार
Live News Updates (HT)

Live News Updates 7 June 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसदेला संबोधणार

Jun 07, 2023, 07:14 PMIST

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २२ तारखेला अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सत्रात भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. संसदेला संबोधित करण्याचा सन्मान हा केवळ दोस्त राष्ट्रांनाच दिला जातो.

Jun 07, 2023, 07:14 PMIST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सर्बियाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सर्बिया दौरा आजपासून सुरू झाला आहे. ४-६ जूनदरम्यान सुरीनाम देशाचा शासकीय दौरा संपवून राष्ट्रपती मुर्मू आज सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे दाखल झाल्या. सर्बियाचे कामगार मंत्री निकोल सेलाकोविक यांनी विमानतळावर स्वागत केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सर्बियाच्या दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सर्बियाच्या दौऱ्यावर

Jun 07, 2023, 04:33 PMIST

कोल्हापुरातील  परिस्थिती नियंत्रणात: शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Jun 07, 2023, 04:24 PMIST

Closing bell : सेन्सेक्समध्ये तब्बल ३५० अंशांची तेजी, सेन्सेक्स ६३ हजार पार

विकली एक्सपायरीपूर्वीच शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे. बुधवारच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ६ महिन्यांच्या वरच्या पातळीवर बंद झाला. रियल्टी, मेटल आणि पीएसईच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तर एफएसीजी, एनर्जी आणि आयटी शेअर्समध्ये वाढ झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ३५०.०८ अंकांनी किंवा ०.५६ टक्क्यांनी वाढून ६३,१४२.९६ वर बंद झाला, तर निफ्टी १३१.५० अंकांनी किंवा ०.७१ टक्क्यांनी वाढून १८,७३०.६० अंशांवर बंद झाला.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, बीपीसीएल, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी लाईफ हे स्टाॅक्स टाॅप गेनर्समध्ये राहिले. तर सिप्ला, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, एम अँड एम आणि मारुती सुझुकी हे टाॅप लूजर्सच्या यादीत होते.

Jun 07, 2023, 01:12 PMIST

डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी घेतली माजी पंतप्रधान देवगौडा यांची भेट

डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी घेतली माजी पंतप्रधान देवगौडा यांची भेट

Jun 07, 2023, 11:39 AMIST

Sardar Khan : मनी लाँड्रिंग, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी सरदार खानला मुंबई न्यायालयाने मंजूर केला जामीन

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या सरदार खानला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Jun 07, 2023, 09:55 AMIST

Kolhapur Bandh: आक्षेपार्ह स्टेट्समुळे कोल्हापुरात आज बंदची हाक

शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या वादग्रस्त प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.  

Jun 07, 2023, 09:34 AMIST

Opening Bell :  सेन्सेक्सची धडाकेबाज सुरुवात, ६३हजारांच्या नव्या अंश पातळीला स्पर्श 

रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या तिमाही पतधोरणासोबतच आज शेअर बाजाराची सुरुवात धडाकेबाज झाली आहे. सेन्सेक्सने दिवसाच्या सुरुवातीलाच ६३००० च्या अंश पातळीला स्पर्श केला. बाजार ६२९१७ अंश पातळीला खुला झाला. सुरुवातीलाच १२४ अंशांची वाढ होत त्याने नवी ऐतिहासिक पातळी गाठली. तर नॅशनल स्टाॅक एक्सेंजच्या निफ्टीने १८६६५ च्या अंश पातळीला स्पर्श करत दिवसाची सुरुवात केली. सुरुवातीच्या सत्रात त्यात ७४ अंशांची वाढ झाली.

निफ्टी टाॅप गेनर्सच्या यादीत ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाईफ, पावर ग्रीड आणि इन्फोसिस या शेअर्सचा समावेश आहे. टाॅप लूजर्समध्ये आज केवळ ग्रासिमच्या स्टाॅक्सचा समावेश आहे.

Jun 07, 2023, 09:24 AMIST

Pune : शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

 माहे जूनमध्ये शाळा सुरु होत असून सर्व शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे. स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाचे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची व शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करुनच वाहन मालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक आहे.

Jun 07, 2023, 09:06 AMIST

Pune : आजी, माजी सैनिकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने वेल्हे येथे ७ जून रोजी तालुकास्तरीय बैठक

आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वेल्हा तालुकास्तरीय समितीची बैठक वेल्हे तहसील कार्यालय येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. आजी, माजी सैनिकांनी तालुकापातळीवरील अडीअडचणी असल्यास वेल्हे तहसिलदार कार्यालयामध्ये बैठकीच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे यांनी केले आहे.

Jun 07, 2023, 08:21 AMIST

Pune : इंद्रायणीतील जलप्रदुषण रोखण्यासाठीच्या उपायोजना कालबद्धरित्या पूर्ण कराव्यात- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध रितीने पूर्ण कराव्यात. या उपाययोजनांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Jun 07, 2023, 08:20 AMIST

Pune : नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमास प्रशासनाचे पूर्ण सहकार्य-: ज्योती कदम

नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमास जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले. नेहरु युवा केंद्र पूणे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, नेहरू युवा केंद्राचे विभागीय संचालक कार्तिकेयन, नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक तथा जिल्हा सल्लागार समितीचे सचिव यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या डॉ. संपदा बांगर आदी उपस्थित होते.

Jun 07, 2023, 06:54 AMIST

jejuri : जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी  

जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज १३  वा दिवस आहे. जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत.

Jun 07, 2023, 06:54 AMIST

PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 

 केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता बैठक होणार

Jun 07, 2023, 06:53 AMIST

Delhi : फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत

फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार आहेत. 

Jun 07, 2023, 06:52 AMIST

WTC चा  आज रंगणार अंतिम महासामना

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे.  

Jun 07, 2023, 06:08 AMIST

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसदेला संबोधणार; दोस्त राष्ट्रांनाच मिळाला आहे हा सन्मान

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २२ तारखेला अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सत्रात भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. संसदेला संबोधित करण्याचा सन्मान हा केवळ दोस्त राष्ट्रांनाच दिला जातो.

    शेअर करा