मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 22 May 2023: ‘हा’ प्रकार सुरु राहिल्यास महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, राष्ट्रवादीचा इशारा
Live News Updates 22 May 2023 (HT)

Live News Updates 22 May 2023: ‘हा’ प्रकार सुरु राहिल्यास महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, राष्ट्रवादीचा इशारा

May 22, 2023, 07:30 PMIST

NCP Protest against ED : ईडीचा गैरवापर असाच सुरु राहिल्यास येत्या काळात आम्हीसंपूर्ण महाराष्ट्रभररस्त्यावर उतरु असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

May 22, 2023, 07:30 PMIST

रांगा टाळा, वीजबिल ऑनलाईन भरा अन् 0.25 टक्के सवलत मिळवा महावितरणचे ग्राहकांना आवाहन

वीजबिलात मिळणारी सवलत आणि बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने ग्राहकांनी वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील अडीच लाखांहून अधिक ग्राहकांनी ६२ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास सेवा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

May 22, 2023, 05:07 PMIST

Closing bell :  सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम, अदानी स्टाॅक्स वधारले

देशांतर्गत शेअर बाजारांनी सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदवली आणि बीएसई सेन्सेक्स २३४ अंकांनी वर गेला. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या आणि निर्देशांकात मजबूत वाटा असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील खरेदीने आशियाई बाजारातील सकारात्मक कल दरम्यान बाजाराला आधार दिला.

बीएसईचा तीस शेअर्सचा सेन्सेक्स २३४ अंकांच्या म्हणजेच ०.३८ टक्क्यांच्या वाढीसह ६१,९६३.६८ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान एका क्षणी, तो ३१४.७८ अंकांवर गेला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही १११ अंकांच्या म्हणजेच ०.६१ टक्क्यांच्या वाढीसह १८,३१४.४० अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स पॅकमध्ये टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, सन फार्मा, एनटीपीसी आणि टायटन हे प्रमुख वधारले.

दुसरीकडे, नुकसान झालेल्यांमध्ये नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.

May 22, 2023, 04:49 PMIST

..तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, राष्ट्रवादीचा इशारा

नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्याविरोधात ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून 'भाजपचा रखवालदार ईडीचे रक्षण करतो, भाजप हटाओ लोकशाही बचाओ, ५० खोके, ईडी ओके' अशी घोषणाबाजी करण्यात आली. ईडीचा गैरवापर असाच सुरु राहिल्यास येत्या काळात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरु असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

May 22, 2023, 03:12 PMIST

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे 'एसएमएस' मिळवा! छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात ९५ टक्के ग्राहकांची नोंदणी

वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती 'एसएमएस'द्वारे मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १२ लाख३४ हजार ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

May 22, 2023, 02:47 PMIST

Nissan Magnite Geza : जबरदस्त सेफ्टी फिचर्ससहित निस्सान मॅग्नाईट गेझा दाखल, बुकिंग सुरु

निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनची प्रतीक्षा आता संपत आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बी-एसयूव्हीच्या मॅग्नाईट गेजाचे स्पेशल एडिशन सादर केले आहे. यासोबतच स्पेशल एडिशनचे बुकिंगही सुरू झाले आहे. ग्राहक ही कार कंपनीच्या अधिकृत डिलर शोरूममधून फक्त ११,००० रुपये भरून बुक करू शकतात.

May 22, 2023, 01:37 PMIST

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने सीबीआयला दिला आहे. दरम्यान, ३ जूनपर्यंत समीर वानखेडे यांच्याबाबतचा चौकशी अहवाल कोर्टात सादर करण्याचे सीबीआयला आदेश देण्यात आले आहे. 

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण
माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

May 22, 2023, 12:26 PMIST

Buldhana Accident : पंढरपूरवरून येणाऱ्या भविकांवर काळाचा घाला; शेगांवजवळ क्रूझर स्वागत कमानीला धडकली; तीन ठार

Buldhana Accident : पंढरपूरवरून घरी परत येत असलेल्या भाविकांची क्रूझर गाडी ही शेगांव जवळील स्वागत कमानीला धडकुण झालेल्या अपघातात ३ भाविक ठार तर ७ जण जखमी झाले आहे. घर अवघ्या दोन किलोमीटरवर असताना ही दुर्घटना घडली.

May 22, 2023, 11:55 AMIST

Jayant Patil : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीच्या कार्यालयात दाखल 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ईडीचे अधिकारी त्यांच्या चौकशीला सुरुवात करणार आहेत.

May 22, 2023, 10:50 AMIST

Salvador Stampede : साल्वाडोरमध्ये फुटबॉलच्या सामण्या दरम्यान चेंगराचेंगरी; १२ ठार, ५०० जखमी

Football Stampede At least 12 Dead : साल्वाडोरमधील एका फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. सामन्यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ जण ठार तर तब्बल ५०० प्रेक्षक जखमी झाले.

May 22, 2023, 09:26 AMIST

Opening Bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक

शुक्रवारच्या सत्रात अमेरिकन शेअर बाजार लाल रंगात तर आशियाई बाजारपेठ हिरव्या रंगात बंद झाले. त्याचा परिणाम म्हणून आज मुंबई शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सेन्सेक्समध्ये २६ अंशांची घसरण नोंदवत तो ६१६७२ अंशपातळीवर खुला झाला. तर निफ्टीत ४१ अंशांची घट झाली असून तो अंदाजे १८,१९६.२५ अंशपातळीवर खुला झाला. आज बँक स्टाॅक्समध्ये घसरण दिसत आहे. झोमॅटोच्या शेअर्समध्ये १ टक्का वाढ झाली आहे.

May 22, 2023, 08:54 AMIST

बंगळुरूमध्ये वळीव पावसाचा धुमाकूळ; झाडे उन्मळून पडली, बहुमजली इमारत कोसळली

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये  दोन तास पावसाने घातलेल्या धुमशानात भुयारी मार्गात पाणी साचून कार बुडाल्याने इन्फोसिसमधील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. भानू रेखा असे त्या महिलेचे नाव आहे. 

May 22, 2023, 08:35 AMIST

Election Commission Of India : बोगस मतदान रोखण्यासाठी आता बोटावर शाईऐवजी लेझर मार्क; निवडणूक आयोगचा निर्णय

बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगकडून आता बोटावर शाईऐवजी लेझर मार्क लावला जाणार आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.

May 22, 2023, 08:06 AMIST

आदित्य ठाकरे यांचा आज नागपूर दौरा 

आदित्य ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर असून ते जिल्ह्यातील दोन गावांना भेटी देणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या स्वगतासाठी पोस्टर लावण्यात आले असून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. 

May 22, 2023, 08:05 AMIST

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी 

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ते आज ईडीच्या अधिकाऱ्यांपूढे हजर राहणार आहे. त्यांच्या चौकशी विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राज्य भरात आंदोलन केले जाणार आहे. 

May 22, 2023, 06:58 AMIST

Pune : जी-२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

  जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देवून स्वत: जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

May 22, 2023, 06:57 AMIST

Pune : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

  राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून एकाच दिवशी ८ तालुक्यातील ११ कामे हाती घेण्यात आली. शनिवारी पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल नावळी गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

May 22, 2023, 06:47 AMIST

G 20 meeting in Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये आज पासून जी २० बैठकीला होणार सुरुवात; चोख बंदोबस्त

G 20 meeting in Jammu Kashmir : जम्मू काश्मीर येथे आज पासून जी २० परिषदेची बैठक होणार आहे. श्रीनगर येथे ही बैठक पार पडणार आहे. जगभरातील विविध देशांचे तब्बल ६०हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    शेअर करा