मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 20 June 2023 : गृहमंत्री अमित शहा गुरुवारी नागपुरात, कसा असेल कार्यक्रम?
Live News Updates (HT)

Live News Updates 20 June 2023 : गृहमंत्री अमित शहा गुरुवारी नागपुरात, कसा असेल कार्यक्रम?

Jun 20, 2023, 08:09 PMIST

Amit Shah Nagpur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २२ तारखेला नागपुरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 20, 2023, 08:09 PMIST

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासह इतर अवैध व्यवसायांच्या विरोधात तक्रारी देणा-या एका ग्रामपंचायत सदस्य तथा माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यावर वाळू माफियांच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी गावाजवळ हा प्रकार घडला.

Jun 20, 2023, 06:16 PMIST

नवी मुंबईः खारघरमध्ये भाविकांनी काढली भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली

आज भगवान जगन्नाथाचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र भगवान जगन्नाथाच्या मिरवणुका पाहायला मिळत असून नवी मुंबईतील खारघर येथे भाविकांनी रथयात्रा काढली होती.

Jun 20, 2023, 05:23 PMIST

Talegaon : तळेगाव येथे विकसकाची २७५ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्लीस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर-आशियाना हाउसिंग आणि उद्योगातील अग्रगण्य नावांपैकी एक असलेल्या वेकफिल्ड यांनी पुण्यात आशियाना अमोध सिनियर लिव्हिंग प्रोजेक्ट हा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. तळेगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले असून ११.९३ एकरांवर पसरलेले आहे. २७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने हा प्रकल्प चार टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे वितरण ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार आहे.

Jun 20, 2023, 05:06 PMIST

Closing bell :  निर्देशांक वाढीसह बंद, अदानी एंटरप्राईजेस घसरला 

सुरुवातीच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजारात दिवसअखेर सुधारणेसह बंद झाला. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी झाली तर पीएसई, एनर्जी आणि इन्फ्रा निर्देशांकात किंचित वाढ झाली. फार्मा समभागात विक्री झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १५९.४० अंकांनी किंवा ०.२५ टक्क्यांनी वाढून ६३,३२७.७० अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ६१.२५ अंकांनी किंवा ०.३३ टक्क्यांनी वाढून १८८१६.७० अंशांवर बंद झाला.

अदानी एंटरप्रायझेस, कोटक महिंद्रा बँक, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक आणि अदानी पोर्ट्स मंगळवारी निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. तर एचडीएफसी लाइफ, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि टीसीएस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

Jun 20, 2023, 04:12 PMIST

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, तळजाई पठार परिसरात वाहनांची तोडफोड

Pune Crime News Marathi : पुण्यात कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. तळजाई पठार परिसरात १० ते १२ गुंडांनी कोयते हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आरोपींनी २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

Jun 20, 2023, 04:10 PMIST

Amit Shah In Nagpur : गृहमंत्री अमित शहा गुरुवारी नागपुरात, कसा असेल कार्यक्रम?

Amit Shah Nagpur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २२ तारखेला नागपुरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शहा नागपुरात येणार असले तरी ते शहरात येणार नाही. नागपुरातील विमानतळावरूनच ते बालाघाटसाठी रवाना होणार आहे. दिल्लीहून नागपूर, बालाघाट आणि भोपाळ असा अमित शहांचा दौरा असणार आहे. त्यामुळं अमित शहा हे काही मिनिटांसाठीच नागपुरात असतील.

Jun 20, 2023, 04:03 PMIST

ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा

ठाणे शहरात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करत 'जागतिक गद्दार दिवस' साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी 'चले जाव-चले जाव-गद्दार गुवाहाटी चले जाव' अशा घोषणा दिल्या.

Jun 20, 2023, 03:32 PMIST

शिवसेना (शिंदे गट) वर्धापनदिनासाठी अमरावतीहून आलेल्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

काल, सोमवारी अमरावती येथून शिवसेना (शिंदे गट) च्या वर्धापनदिनासाठी मुंबईत आलेले तिवसा तालुक्याचे तालुकाप्रमुख अंबादास राजूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काल कार्यक्रम संपल्यावर पुन्हा लॉजवर गेल्यानंतर अचानक ते कोसळले. दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Jun 20, 2023, 01:52 PMIST

Maha Vikas Aghadi : आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल - राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियानं केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असंही तपासे म्हणाले.

Jun 20, 2023, 12:54 PMIST

Castrol - Mahindra deal  : वाहन विम्यासाठी कॅस्ट्राॅल एमआयबीएलमध्ये करार

कॅस्‍ट्रॉल इंडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या ल्‍युब्रिकण्‍ट कंपनीने प्रमुख विमा ब्रोकरेज कंपनी महिंद्रा इन्‍शुरन्‍स ब्रोकर्स लिमिटेड (एमआयबीएल) सोबत करारावर स्‍वाक्षरी केली आहे. कॅस्‍ट्रॉल ऑटो सर्विस (सीएएस) वर्कशॉप्‍सना आता एमआयबीएलच्‍या माध्‍यमातून भारतातील आघाडीच्‍या मोटर विमा प्रदात्‍यांकडून पात्र विमा पॉलिसींच्‍या वितरणासाठी पीओएसपी (पॉइण्‍ट ऑफ सेल परसन्‍स) म्‍हणून स्‍वत:ला सूचीबद्ध करण्‍याचा पर्याय असेल.

Jun 20, 2023, 12:19 PMIST

Pune : भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' प्रारंभ ' या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मधुरा कापशीकर आणि वेदश्री पुणतांबेकर हे प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम शनीवार, २४ जून २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

Jun 20, 2023, 10:58 AMIST

Assam Floods: आसाममध्ये अतिवृष्टीचा ३५ हजार नागरिकांना फटका; पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान

Assam Floods: आसाममध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या मुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली असून तब्बल ३० ते ३५ हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे.

Jun 20, 2023, 09:37 AMIST

Opening Bell : सेन्सेक्स  निफ्टीची सावध सुरुवात 

मंगळवारी २० जून रोजी शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली आहे. सेन्सेक्स ८ अंकांनी वाढून ६३,१७६ अंकांवर उघडला. त्याच वेळी, निफ्टी ३ अंकांनी घसरला आणि तो १८,७५२ अंकांच्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान, सेन्सेक्सच्या ३० पैकी १६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ आणि १४ कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घट झाली.

Jun 20, 2023, 08:25 AMIST

mumbai : शिवसेना ठाकरे गट 'खोके दिन' म्हणून साजरा करणार,

शिवसेना ठाकरे गट 'खोके दिन' म्हणून साजरा करणार, राष्ट्रवादीकडून गद्दार दिन; शिंदे गटाकडून स्वाभिमान दिनाची हाक आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. पोलीसही अलर्ट मोडवर आहेत.

Jun 20, 2023, 08:25 AMIST

Ashadhi wari : संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार

 ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून तरडगाव मुक्कामी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.  संत तुकाराम यांची पालखी आज सणसर येथून आंथुर्णे मुक्कामी जाणार आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात दुसरं रिंगण गोल रिंगण आज बेलवंडी येथे होणार आहे.

Jun 20, 2023, 07:13 AMIST

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर

  पंतप्रधान मोदींनी २०१४ मे रोजी म्हणून शपथ घेतली आणि सप्टेंबर २०१४ ला मोदींनी पहिला अमेरिका  दौरा केला. त्यानंतर आजवर मोदींनी अनेकदा अमेरिका दौरा केला. या आठ वर्षाच्या काळात भारतात जरी मोदी लाट कायम राहिली तरी अमेरिकेत या काळात सत्तांतर झालं. मात्र मोदींचे अमेरिकेशी असलेले संबंध कायम चांगलेचं राहिले.  आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत हा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे.

Jun 20, 2023, 06:51 AMIST

G 20 Summit :  विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आवश्यक-केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

Jun 20, 2023, 06:50 AMIST

Pune : खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

खेड तालुक्यात चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इयता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित टक्केवारीप्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

Jun 20, 2023, 06:49 AMIST

Pune : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत अनुदानासाठी गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्ह्यात सन २०२३ - २४ मध्ये सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यामधून एका गोशाळेस अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव १९ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेवून एकरकमी १५ लक्ष ते २५ लक्ष रुपये मर्यादेत अनुदान देय असणार आहे. योजनेचा मुलभूत उद्देश, देय अनुदान व अर्जाचा विहीत नमुना व अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालय यांचेकडे उपलब्ध आहे.

Jun 20, 2023, 06:49 AMIST

Pune : दिव्यांग विद्यार्थ्याना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन

 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी नवीन अर्ज डिबीटी पोर्टलवर सादर करण्याची तसेच सन २०२१ - २२ या वर्षासाठी पुन्हा अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून असून जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

Jun 20, 2023, 06:48 AMIST

Pune :  जी-२० बैठकीच्या धर्तीवर शाळांमध्ये अभिरुप परिषद संपन्न

 विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुणे येथे होणाऱ्या जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीच्या धर्तीवर विविध शाळांमध्ये अभिरुप परिषदेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी वीस देशांचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर आपले म्हणणे मांडण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

Jun 20, 2023, 06:45 AMIST

Puri Rath Yatra : पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरुवात

Jagannath Puri Rath Yatra 2023 : जगन्नाथ पुरीची ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे.

Jun 20, 2023, 06:03 AMIST

Pakistan : पाकिस्तान भिकेला; पैसे नसल्याने कराचीत बंद होणार खाद्यान्नाची आयात

Pakistan : पाकिस्तानवर आर्थिक संकट गहिरे झाले आहे. परकीय चलनाची गंगाजळी संपत आल्याने पाकिस्तानच्या कराची शहरात खाद्यान्नाची आयात बंद करण्यात येणार आहे. २५ जून पासून ही आयात बंद केली जाणार आहे. कराची होलसेल ग्रोसर्स असोसिएशनचे सचिव फरकत सिद्दीकी यांनी सांगितले की सर्व बँकानी खाद्य पदार्थ आयात करण्यासाठी डॉलर्स देण्यास मनाई केली आहे.

    शेअर करा