मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 19 April 2023 : महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले
Live News

Live News Updates 19 April 2023 : महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले

Apr 19, 2023, 11:16 PMIST

mahabaleshwar cloudburst rain : महाबळेश्वरमध्ये बुधवारी दुपारपासून सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Apr 19, 2023, 11:16 PMIST

राज्यात कोरोनाचा कहर! एकाच दिवशी आढळले ११०० नवे रुग्ण

राज्यभरात व मुंबईत  वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. आज राज्यात कोरोनाचे ११०० नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे

 

 

Apr 19, 2023, 10:28 PMIST

मॅनफोर्स कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा आयपीओ बाजारात, २५ एप्रिल रोजी होणार खुला

कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मॅनफोर्सची मूळ कंपनी मॅनकाइंड फार्माचा आयपीओ बाजारात येत आहे. पुढच्या आठवड्यात 25 एप्रिलला मॅनकाइंड या कंपनीचा आयपीओ खुला होईल. याची प्राइस बँडदेखील निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीला शेअर बाजारातून  ४ हजार ३२६ कोटी गुंतवणूक अपेक्षित असून यासाठी आयपीओसाठी २०१६-१०८० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. 

Apr 19, 2023, 08:01 PMIST

नवी मुंबईतील वीज पुरवठा खंडीत, सुरुळीत होण्यास तीन ते चार तास लागणार

नवी मुंबईतील बहुतेक भागातील बत्ती गुल झाली आहे. तळेगाव ते खारखर या विजेच्या मार्गात बिघाड झाल्याने नवी मुंबईत लाईट गेली आहे. शहरात सध्या ७५० मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे शहरात लोडशेडींग सुरू आहे.

Apr 19, 2023, 05:49 PMIST

महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले

महाबळेश्वरमध्ये बुधवारी दुपारपासून सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे.  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना  मोठा फटका बसला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Apr 19, 2023, 05:19 PMIST

Maharashtra Cabinet Decision : साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Apr 19, 2023, 04:04 PMIST

Pune Property Tax : पुणेकरांना दिलासा! मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू होणार

पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू होणार आहे. १ एप्रिला २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसंच, ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 19, 2023, 04:02 PMIST

पुण्यात आगाखान पॅलेससमोर उभ्या डंपरला कार धडकून पेटली, चालक महिलेला वाचवले

आगाखा पॅलेस समोर उभे असलेल्या डंपरला मागून चार चाकी ची धडक धडक दिली व गाडीने पेट घेतला. नगर पुणे रोडवर आगाखा पॅलेस समोर एम एच १४ HU ८५८५ मालवाहू डंपरला MH १२ QF५१८८ क्रमांकाच्या फोर्ड इकोस्पोर्ट या वाहनाने मागून धडक दिली व त्याला आग लागली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका प्रशिक्षित फायरमन जवानाने आपल्या हेल्मेट ने गाडीची काच फोडून वाहन चालक महिला  सविता (वय ३५ ते ३७ रा.वडगाव शेरी) यांना बाहेर काढले. समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब असलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीचे अग्निशमन यंत्रणा वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग पूर्णपणे विझवली. 

pune accident
pune accident

Apr 19, 2023, 02:36 PMIST

Sanjay Rathod : संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या; राष्ट्रवादीची मागणी

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारला घेरलं आहे. अशा भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणार्‍या मंत्र्यांला पाठीशी घालणार की त्याची मंत्री पदावरून हकालपट्टी करणार हे जनतेसमोर जाहीर करा आणि हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडं द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Apr 19, 2023, 01:57 PMIST

ठाणे: ओरिऑन बिझनेस पार्कला लागलेली आग आटोक्यात

ठाणे: येथील ओरिऑन बिझनेस पार्कला लागलेली आग तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली १० ते १२ वाहने जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (फोटोः प्रफुल्ल गांगुर्डे)

ठाणे: ओरिऑन बिझनेस पार्कला लागलेली आग आटोक्यात
ठाणे: ओरिऑन बिझनेस पार्कला लागलेली आग आटोक्यात

Apr 19, 2023, 01:12 PMIST

Maharashtra Bhushan Event Tragedy : राज्यभर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेचं सत्य मांडणार - काँग्रेस

काँग्रेस पक्षातर्फे २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात घडलेल्या दुर्घटनेच सत्य जनतेसमोर मांडणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळं घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 19, 2023, 01:03 PMIST

कर्नाटकः जगदिश शेट्टर यांनी कॉंग्रेसकडून भरला उमेदवारी अर्ज 

जगदिश शेट्टर यांनी कॉंग्रेसकडून भरला उमेदवारी अर्ज. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेले शेट्टर यांनी नुकताच भाजपला सोडचिट्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हुबळी-धारवाड (मध्य) मतदारसंघात शेट्टर यांची लढत भाजप उमेदवार महेश टेंगिनकाई यांच्यासोबत होणार आहे.

कर्नाटकः जगदिश शेट्टर यांनी कॉंग्रेसकडून भरला उमेदवारी अर्ज
कर्नाटकः जगदिश शेट्टर यांनी कॉंग्रेसकडून भरला उमेदवारी अर्ज

Apr 19, 2023, 12:42 PMIST

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आज दुपारी १ वाजता होणार आहे. मुंबईतील रस्त्याच्या कामावरून ते महापालिका प्रशासन व राज्य सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे. 

Apr 19, 2023, 10:20 AMIST

Pune : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

पुणे  : चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २० एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.

Apr 19, 2023, 09:18 AMIST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टीमध्ये संमिश्र स्थिती, सेन्सेक्समध्ये वाढ तर निफ्टी घसरला 

आज बुधवारी १९ एप्रिल रोजी शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र स्थितीत झाली आहे. सेन्सेक्समध्ये वाढ झाली आहे. तर निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली आहे. सेन्सेक्स  १८.८८ अंश म्हणजेच ०.०३२ टक्के वाढीसह ५९,७४५.८९ अंशावर खुला झाला.  निफ्टी ६.८० अंश म्हणजे ०.०३९ टक्के घसरणीसह १७,५६३.३५ अंशांवर खुला झाला.

Apr 19, 2023, 08:13 AMIST

Pune : संभाजी उद्यान येथे 'चला बोलूया' फलकाचे उद्घाटन

पुणे : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी उद्यान येथे 'चला बोलूया' या वादपूर्व समुपदेशन केंद्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले.  उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जेष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांपर्यंत या केंद्राची माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने महानगरपालिका विभागाच्या ६१ उद्यानांची निवड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार संभाजी उद्यान येथे २ फलक लावण्यात आले. या फलकांवर 'चला बोलूया' या वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती देण्यात आली आहे.

Apr 19, 2023, 06:43 AMIST

Pune  : होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

 कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Apr 19, 2023, 06:43 AMIST

Pune : देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पर्यटनक्षम गावांनी ५ मे पर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Apr 19, 2023, 06:42 AMIST

Washim : शहीद अमोल गोरेच्या पार्थिवावर आज वाशिममध्ये अंतिम संस्कार

भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील सोनखास गावातील अमोल गोरे या ३३  वर्षीय जवानाला वीरमरण आलंय. अरुणाचल प्रदेशातील वापरी यांग बुल नाला येथे १४  एप्रिल रोजी हिमसख्खलन झाल्याने काही जवान बेपत्ता झाले होते. याच दुर्घटनेत अमोल गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी  सोनखास येथे आणण्यात येणार असून त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Apr 19, 2023, 06:41 AMIST

SC : समलैंगिक विवाह संबंधाबाबत आज सुनावणी

समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुप्रिम कोर्टात सुरू असलेली सुनाणी आज सुद्धा होणार आहे. कालच्या सुनावणी दरम्यान समानता आणि सन्मानाने जगण्यासाठी समलौंगिक वावाहाला मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.

Apr 19, 2023, 06:41 AMIST

Mumbai : नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी

वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिकांच्या वतीनं त्यांचे वकील आज कोर्टात बाजू मांडणार आहेत.

Apr 19, 2023, 06:40 AMIST

washim : वाशिमच्या जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथ मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरुवात

जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिममधील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरूवात झाली आहे. पहिली लेपन प्रक्रिया कोणत्याही वादविवाद शिवाय पूर्ण होऊन जवळपास २५   दिवस पूर्ण झाली. आता दुसरी लेपन प्रक्रिया सात दिवस चालणार आहे. 

Apr 19, 2023, 06:39 AMIST

Weather update : आज राज्यात काही ठिकाणी गारपिठीची शक्यता

देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे.  

 

Apr 19, 2023, 06:35 AMIST

cabinet meeting : आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक, अवकळीच्या नुकसानीचा घेणार आढावा

 आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अवकाळी पावसाने राज्याचं किती नुकसान झाले आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. या सोबतच करोना परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे.

    शेअर करा