मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 15 June 2023 : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले; सोसाट्याचा वारा, झाडे उन्मळून पडली, लँडफॉल सुरू
Live News Updates

Live News Updates 15 June 2023 : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले; सोसाट्याचा वारा, झाडे उन्मळून पडली, लँडफॉल सुरू

Jun 16, 2023, 04:05 PMIST

BiparjoyCyclone : बिपरजॉयचक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झाले आहे.सौराष्ट्रकिनारपट्टीवर लँडफॉलसुरू झाले आहे.मागील ६० वर्षातील हे तिसरे चक्रीवादळ आहे जे पश्चिम किनारपट्टीला धडकले आहे.

Jun 16, 2023, 04:05 PMIST

Closing bell : आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद 

फायनान्शिअल सेक्टर, कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी मोठ्या वाढीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ४६६.९५ अंकांच्या म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह ६३,३८३.५८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी निफ्टी १३७.९० अंकांच्या किंवा ०.७४% च्या वाढीसह १८,८२६ अंकांवर बंद झाला. कल्याण ज्वेलर्सचा शेअर्स आज १५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Jun 15, 2023, 07:31 PMIST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका केंद्रीय निमलष्करी दलाच्या देखरेखीखाली

पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व २३ जिल्ह्यांमध्ये केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश आज कोलकाता उच्च न्यायालायने दिले.

Jun 15, 2023, 07:27 PMIST

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल; सोसाट्याचा वारा, झाडे उन्मळून पडली

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झाले आहे. सौराष्ट्र किनारपट्टीवर लँडफॉल सुरू झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, रात्रीपर्यंत लँडफॉल प्रक्रिया सुरू राहील. त्याचबरोबर किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले आहेत. एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. साबरमती रिवर फ्रंट आणि द्वारकाधीश मंदिर बंद करण्यात आले आहे. हे वादळ कच्छ आणि पाकिस्तानमधील सिंध किनारपट्टीला धडकणार आहे. मागील ६० वर्षातील हे तिसरे चक्रीवादळ आहे जे पश्चिम किनारपट्टीला धडकले आहे.

 

Jun 15, 2023, 05:02 PMIST

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीसांकडून तडीपार गुंड सोन्या शेलार याला अटक केली आहे.

Jun 15, 2023, 04:25 PMIST

Closing bell :  नफावसूली पडली भारी, दिवसअखेर सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद 

गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३१०.८८ अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घसरून ६२,९१७.६३ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी ७५.०५ अंकांनी म्हणजेच ०.४ टक्क्यांच्या घसरणीसह १८,६८०.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. हिरो मोटोकॉर्पचा समभाग निफ्टीमध्ये ३.५८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे झील मध्ये ४% पेक्षा जास्त घसरण झाली.

Jun 15, 2023, 02:12 PMIST

'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी उंचच्या उंच लाटा निर्माण होत आहेत.

Jun 15, 2023, 12:06 PMIST

Supriya Sule : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बलात्कार, सुप्रिया सुळेंचा गृहखात्याच्या निष्क्रियेतवर निशाणा

धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीनं तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यामुळं पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढं आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणं गरजेचं आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

Jun 15, 2023, 12:03 PMIST

Shaktikant Das :  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्कार 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंगने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' ही पदवी प्रदान केली. सेंट्रल बँकिंग हे आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन जर्नल आहे.

Jun 15, 2023, 10:30 AMIST

Monsoon news : मॉन्सून लांबल्याने खरीप पेरण्यांवर संकट; राज्यात केवळ १ टक्का क्षेत्रावर झाल्या पेरण्या

Rain worries in Maharashtra Kharif Sowing Halted : राज्यात मॉन्सून लांबल्याने खरीप हंगामावर संकट ओढवले आहे. खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात आता पेरणत केळव काही हजार हेक्कर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

Jun 15, 2023, 08:49 AMIST

malegaon bomb spot : मालेगाव २००८ च्या बॉम्बस्फ़ोट खटल्यातील सगळ्यात महत्वाची साक्ष आज नोंदवण्यात येणार

मालेगाव  २००८ च्या  बॉम्बस्फ़ोट खटल्यातील सगळ्यात महत्वाची साक्ष आज नोंदवण्यात येणार. या केसच्या तपास अधिका-याची कोर्टात साक्ष घेतली जाईल. आजच्या सुनावणीत काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

Jun 15, 2023, 08:47 AMIST

DMK : तामिळनाडूमध्ये CBI ला 'नो एन्ट्री'; सरकारच्या परवानगीशिवाय करता येणार नाही तपास

ED Arrested DMK Minister: एका मंत्र्यावरील ईडीच्या कारवाई नंतर आता डीएमके सरकार अॅक्शन मोड मध्ये आले आहे. त्यांनी सरकारच्या परवानगी शिवाय केंद्रीय तपास यंत्रणेला राज्यातील कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी तामिळनाडू सरकारची परवानगी घ्यावी लागणार असे आदेश दीले आहेत.

Jun 15, 2023, 07:16 AMIST

Sant sopan kaka : संत श्री सोपानकाका समाधी - पालखी प्रस्थान सोहळा 

 खासदार सुप्रिया सुळे पुरंदर येथे संत श्री सोपानकाका समाधी - पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती राहतील.

Jun 15, 2023, 07:16 AMIST

Sant tukaram maharaj palkhi sohala : संत तुकाराम महाराज पालखी- लोणी काळभोरहून पहाटे यवतकडे प्रस्थान ठेवणार

संत तुकाराम महाराज पालखी- लोणी काळभोरहून पहाटे यवतकडे प्रस्थान ठेवणार आहे.

Jun 15, 2023, 07:14 AMIST

Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala :  संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा सासवडमध्येच विसावा

 संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा सासवडमध्येच विसावा असणार आहे. त्यांचे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीचे दुपारी सासवडमधून प्रस्थान होणार आहे. 

Jun 15, 2023, 07:12 AMIST

State school : 'स्कूल चले हम' राज्यातील शाळा आज पासून होणार सुरू; विद्यार्थ्यांचे होणार जंगी स्वागत

State School Start From today : राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज पासून सुरू होणार आहेत. आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. दरम्यान शालेली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Jun 15, 2023, 06:10 AMIST

Killer Drone deal : दहशतवाद्यांची आता काही खैर नाही; अमेरिका भारताला देणार किलर ड्रोन

Killer Drone deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक लष्करी करार होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका भारताला किलर ड्रोन देण्याच्या तयारीत आहे. यामुळे शत्रू हद्दीत न घुसता दहशतवाद्यांचा यमसदनी धाडता येणार आहे.

    शेअर करा