मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 14 June 2023 : 'बिपरजॉय'चा कोकणाला तडाखा; झाडं जमीनदोस्त, कासवांचं संवर्धन केंद्रही पाण्यात
Live News Updates

Live News Updates 14 June 2023 : 'बिपरजॉय'चा कोकणाला तडाखा; झाडं जमीनदोस्त, कासवांचं संवर्धन केंद्रही पाण्यात

Jun 14, 2023, 08:41 PMIST

cyclone biparjoy : कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झाली आहे.

Jun 14, 2023, 08:41 PMIST

कामशेतला कंटेनर पलटी झाला असुन प्रचंड ट्राफिक झाली आहे.

पुण्याजवळील कामशेत येथ एक कंटेनर पलटी झाल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Jun 14, 2023, 06:25 PMIST

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला १४ दिवसांची कोठडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर बर्वे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सागर बर्वे या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Jun 14, 2023, 06:25 PMIST

Cyclone Biparjoy: गुजरातमध्ये ५० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले  

Cyclone Biparjoy: गुजरातमध्ये ५० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सौराष्ट्र, कच्छमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस.

Jun 14, 2023, 04:37 PMIST

'बिपरजॉय'चा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा; झाडं जमीनदोस्त, कासवांचं संवर्धन केंद्रही पाण्याखाली

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकलं असलं तरी  महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीवर त्याचा परिणाम कायम असल्याचं दिसत आहे. कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झाली आहे. याठिकाणी असलेली सुरुची अनेक झाडे लाटांच्या दणक्यानं जमीनदोस्त झाली आहेत.

Jun 14, 2023, 11:58 AMIST

Monsoon Update : मॉन्सूनबाबत 'स्कायमेट'नं दिली महत्त्वाची अपडेट; शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अहवाल आला पुढे

Skymet Weather Prediction : मॉन्सून बाबत एक महत्वाची माहिती आली आहे. पुढील चार आठवडे पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेनं दिला आहे. याचा परिणाम पेरण्यांवर होण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2023, 08:56 AMIST

Mumbai News : ध्वनि प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून आज नो हॉर्निंग डे

शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांची श्रवणशक्ती देखील कमी होत आहे. त्यामुळे आता ध्वनि प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून  आज बुधवारी  नो हॉर्निंग डे साजरा केला जाणार आहे. 

Jun 14, 2023, 08:39 AMIST

Mumbai : एसटी महामंडळाचा वर्धापन सोहळा आज वाय बी चव्हाण सेंटरला पडणार पार 

एसटी महामंडळाचा वर्धापन सोहळा आज वाय बी चव्हाण सेंटरला पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.

Jun 14, 2023, 08:38 AMIST

Sharad Pawar : विदर्भातील चार लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांनी बोलावली बैठक 

विदर्भातील चार लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांनी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. यात वर्धा, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि अमरावती या लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत.

Jun 14, 2023, 07:59 AMIST

Shrikant Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर

शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार शिंदे कोणाची भेट घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Jun 14, 2023, 07:59 AMIST

Delhi :  आज सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक

आज सकाळी 10.30  वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. यावेळी पीएम प्रणाम योजनेला मान्यता मिळू शकते. शेतीत फर्टिलायजर कमी प्रमाणात वापरण्यासंदर्भातली ही योजना आहे. फर्टिलायजर कमी वापरणाऱ्या राज्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

Jun 14, 2023, 07:21 AMIST

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर शहरात मुक्कामी येणार

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर शहरात मुक्कामी येणार आहे. संध्याकाळी ६   वाजता दिंडी नगरच्या बाजार समितीत दाखल होणार आहे.  

Jun 14, 2023, 07:20 AMIST

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची मनाची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार

 पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची मनाची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखीत जिल्ह्यातील जवळपास २० हजाराहून अधिक वारकरी असतात. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दरवर्षी पूजा संपन्न होते, जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे देखील दिंडी प्रस्थानावेळी उपस्थित रहाणार आहेत.

Jun 14, 2023, 06:38 AMIST

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे पालखीत होणार सहभागी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आज दुपारी १  वाजता वडकी नाला ते दिवेघाट माथा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे वारकऱ्यांसोबत काही पावले चालणार आहेत.

Jun 14, 2023, 06:36 AMIST

Ashadhi Wari : पालखी सोहळण्याचे पुण्यातून आज होणार प्रस्थान

आषाढीच्या निमित्ताने वारी सुरू आहेत. दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरीच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. तुकोबांची पालखी पुणे मुक्कानंतर आज पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

Jun 14, 2023, 06:00 AMIST

Donald Trump under arrest : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; होऊ शकते ही शिक्षा

Donald Trump under arrest : सरकारी गोपनीय कागदपत्रे अयोग्य पद्धतीने हातळल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. कागदपत्रे अयोग्य पद्धतीने हाताळण्याप्रकरणी कोर्टात हजर होत आपल्यावरील सर्व आरोप त्यांनी फेटाळले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले.

    शेअर करा