मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 13 June 2023 : मुंबईत मालाडजवळ केबल वायर तुटली; लोकल ट्रेन उशिराने
Live News Updates 12 June 2023

Live News Updates 13 June 2023 : मुंबईत मालाडजवळ केबल वायर तुटली; लोकल ट्रेन उशिराने

Jun 14, 2023, 04:29 PMIST

Local Train: मुंबईत मालाडजवळ केबल वायर तुटली. लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रेन उशिराने धावत आहेत. केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्याची रेल्वेची माहिती.

Jun 14, 2023, 04:29 PMIST

गोवंश तस्करीच्या संशयातून तरुणाची हत्या; ६ जणांना अटक

नाशिकच्या इगतपुरी येथे गोवंश तस्करीच्या संशयातून गोरक्षकांनी एकाa तरुणाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी राष्ट्रीय बजरंग दलाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 14, 2023, 04:16 PMIST

Closing bell :  निर्देशांक तेजीसह बंद, टाटा समुहाच्या स्टाॅक्समधे तेजी 

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ८५.३५ अंकांनी म्हणजेच ०.१४% च्या वाढीसह ६३,२२८.५१ वर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ३९.७५ अंकांच्या म्हणजेच ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह १८,७५५.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला. टाटा कंझ्युमरचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक ५.१७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Jun 14, 2023, 10:00 AMIST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात सपाट

देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी शेअ बाजाराची सुरुवात सपाट पद्धतीने झाली. सध्या सेन्सेक्स ६३,१४२.२८ वर आणि निफ्टी १८,७२१.६० च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. व्होडा-आयडियाचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले आहेत तर टाटा केमिकल्सचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात तीन टक्क्यांनी खाली आले आहेत. हिंदाल्को आणि जेएसडब्ल्यू हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स म्हणून व्यवहार करत आहेत, तर स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या टॉप लूसर म्हणून व्यवहार करत आहेत. याआधी मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ४१८ अंकांनी वाढून ६३,१४३ अंकांवर बंद झाला.

Jun 13, 2023, 09:41 PMIST

सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी संचारबंदी जारी

सोलापूरच्या विमानसेवेला कथित अडथळा ठरलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे अनधिकृत ठरविण्यात बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने कारखान्या एक किलोमीटर परिसरात फौजदारी दंड संहिता कलम १४४ नुसार संचारबंदी पुकारली आहे.

Jun 13, 2023, 03:35 PMIST

दिल्ली-NCR सह उत्तर भारतात ५.५ तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानमध्येही हादरली धरती 

दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जवळपास १० सेकंदापर्यंत हे धक्के जाणवत होते. हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, पंजाब, हरियाणा सह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधून ३० किमी दूर नैऋत्य दिशेला होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.४ नोंदवली गेली. दरम्यान या भूकंपामुळे कुठूही जिवीत व वित्त हानीचे वृत्त नाही. हे धक्के दुपारी १.३३ वाजता जाणवले. 

Jun 13, 2023, 03:14 PMIST

Bajaj Housing Finance : बजाज हाऊसिंग फायनान्सने होम लोनची मुदत 40 वर्षांपर्यंत वाढवली

बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फायनान्सची उपकंपनी आहे आणि बजाज फिन्सर्वचा एक भाग आहे. जो भारतातील सर्वात मोठ्यांपैकी एक विविधिकृत फायनान्शिअल ग्रुप आहे. ज्यांनी आज जाहीर केले आहे की नवीन घर घेणाऱ्या पगारदार अर्जदारांसाठी कर्जाची कमाल मुदत ३० पासून ४० वर्षे केली आहे. उद्योगातील ह्या पहिल्या पावलामुळे, घर घेणाऱ्यांना अतिशय सुलभ, लवचिक परतफेडीची मुदत मिळत आहे. मुदतीत बदल केल्यामुळे बजाज हाऊसिंग फायनान्स मार्केटमध्ये अत्यंत स्पर्धात्मक होम लोन्स सादर करत आहे.

Jun 13, 2023, 11:10 AMIST

लेखक आनंद विंगकर यांच्या ‘दस्तावेज’ कादंबरीचे १५ जून रोजी मुंबईत प्रकाशन 

लोकवाङमय गृह प्रकाशित, कार्यकर्ता लेखक आनंद विंगकर यांच्या ‘दस्तावेज’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवार १५ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता भुपेश गुप्ता भवन सभागृह, सयानी रोड, रविंद्र नाट्य मंदिर सिग्नल जवळ, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. उदय नारकर आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रतिमा जोशी, डॉ रणधीर शिंदे व प्रा. रमेश कांबळे असतील.

Jun 13, 2023, 10:49 AMIST

Pune oil tanker Accident: चंदननगर बीआरटी मार्गावर सरसो तेलाचा टँकर पलटी; ३० हजार लीटर तेल रस्त्यावर; नागरिकांची झुंबड

Pune oil tanker Accident: चंदननगर येथील बीआरटी मार्गावर सकाळच्या सुमारास अपघात होऊन एक सरसो तेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तेल सांडले असून हे तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

Jun 13, 2023, 09:44 AMIST

Opening Bell :  सलग दुसऱ्या दिवशी झेपावला निर्देशांक, सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात धडाकेबाज

आज म्हणजेच मंगळवारी (१३ जून) शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 45 अंकांनी वाढून 62,779 वर उघडला. त्याच वेळी, निफ्टी देखील 30 अंकांनी वाढला, तो 18,631 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान, सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 28 शेअर्समध्ये वाढ आणि 2 मध्ये घट होत आहे.

Jun 13, 2023, 08:39 AMIST

Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे 

राज्यात पुढील ३ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

Jun 13, 2023, 08:39 AMIST

Pune : पुण्यामध्ये विसावला पालखी सोहळा 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे मुक्कामी. पुणेकर, अनेक राजकीय नेते दर्शन घेणार आहे. 

Jun 13, 2023, 08:38 AMIST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर

शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत. संध्याकाळी ४  वाजता मुख्यमंत्री हे कोल्हापूर विमानतळावर येथील त्या ठिकाणाहून करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील आणि त्यानंतर तपोवन इथल्या मैदानावर कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.  

Jun 13, 2023, 08:37 AMIST

Mumbai : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची सकाळी ११  वाजता सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी बैठक आहे. या बैठकीत आयत्या वेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

Jun 13, 2023, 08:36 AMIST

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 67 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना

 बिपरजॉय चक्रीवादळामुळं  अरबी समुद्राला उधाण आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे.  या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७  रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे.  

Jun 13, 2023, 07:33 AMIST

Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्डमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, हॉटेलला लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळे, दोन ठार

Pune Marketyard hotel Reven fire news : पुण्यात मार्केटयार्ड येथील एका हॉटेलला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेल मधील तीन कामगार होरपळले असून यातील दोन कामगार ठार झाले आहेत.

Jun 13, 2023, 06:32 AMIST

Mumbai : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांचा आजपासून दोन दिवसीय मुंबई दौरा आहे. दुपारी ४   वाजता गरवारे क्लबला कोर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसने घेतलेल्या जिल्हा निहाय लोकसभेचा आढावा याची चर्चा केली जाईल.  

Jun 13, 2023, 06:31 AMIST

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मुंबई: कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडी प्रकरणामध्ये दीपक गवळी पीए नाही तर कृषी अधिकारी असल्याचा म्हटलं होतं. परंतु अब्दुल सत्तार यांचंच एक डॉक्युमेंट सध्या व्हायरल झालं असून याच्यामध्ये दीपक गवळी पीए असल्याचा उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्या विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत प्रकरणाचा प्रयत्न केला आहे.  

Jun 13, 2023, 06:02 AMIST

Cyclone Biparjoy : अरबी समुद्राला उधाण; बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

Cyclone Biparjoy : बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

    शेअर करा