मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 11 June 2023 : अलंकापुरीतून आज माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे होणार प्रस्थान
Live News Updates (HT)

Live News Updates 11 June 2023 : अलंकापुरीतून आज माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे होणार प्रस्थान

Jun 11, 2023, 10:32 PMIST

Palkhi Sohala : तीर्थक्षेत्र अळंदीतून आज माऊलींचा वैभवी पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी लाखों वारकरी आणि दिंड्या अलंकापुरीत दाखल झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Jun 11, 2023, 10:32 PMIST

गणपतीपुळे येथे समुद्राला अचानक उधाण, किनाऱ्यावरील दुकानात शिरले पाणी

रत्नागिरी जवळील गणपतीपुळे येथे समुद्राला अचानक उधाण आलेले पाहायला मिळाले. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले. यावेळी पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवले साहित्य वाहून गेले. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते.

Jun 11, 2023, 04:23 PMIST

सोलापूरहून अजमेरला जाणं झालं सोपं, मध्य रेल्वेकडून विशेष गाडी सुरू

आता सोलापूर परिसरातील भाविकांना थेट अजमेरला जाणं सोपं झालंय. भारतीय रेल्वेने सोलापूरहून अजमेरसाठी खास गाडी सुरू केली होती. भाविकांचा प्रतिसाद पाहता आता या गाडीला विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jun 11, 2023, 01:07 PMIST

Pune-Satara road accident : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; एसटी-कंटेनरच्या धडकेत चार प्रवासी ठार

Pune-Satara road accident : पुणे सातारा मार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात झाला असून एक एसटी बस कंटेनरला धडकली आहे. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Jun 11, 2023, 11:23 AMIST

Pune : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भारत सरकारच्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन

  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे येथील केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयच्यावतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Jun 11, 2023, 07:37 AMIST

Pune : कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण-पालकमंत्री

 यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल आणि त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस आहे. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

Jun 11, 2023, 07:24 AMIST

Bhingar : सकल हिंदू समाजाने दिली भिंगार बंदची हाक

  औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाने भिंगार बंदची हाक दिली आहे.  

Jun 11, 2023, 07:23 AMIST

Pune : पुण्यात दशनाम गोसावी समाजाच्या अधिवेशन

  दशनाम गोसावी समाजाच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमास अजित पवार आणि माजी खासदार संभाजी राजे उपस्थित राहतील. 

Jun 11, 2023, 07:22 AMIST

लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेले बृजभूषण आज दाखवणार आपली राजकीय ताकद

 लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेले बृजभूषण आज दाखवणार आपली राजकीय ताकद. गोंडा येथे एका जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या महासंपर्क अभियानांतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहेत.

Jun 11, 2023, 07:21 AMIST

PM Modi : पंतप्रधान आज पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार

 पंतप्रधान आज पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Jun 11, 2023, 07:20 AMIST

Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघेल

 संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघेल आणि देहूतच मुक्कामी असेल.

Jun 11, 2023, 06:02 AMIST

Palkhi Sohala : अलंकापुरीतून आज माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे होणार प्रस्थान

Palkhi Sohala : तीर्थक्षेत्र अळंदीतून आज माऊलींचा वैभवी पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी लाखों वारकरी आणि दिंड्या अलंकापुरीत दाखल झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवला आहे.

    शेअर करा