मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 10 June 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान
Live News Updates (HT)

Live News Updates 10 June 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान

Jun 10, 2023, 09:48 PMIST

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.

Jun 10, 2023, 09:48 PMIST

महावितरणचा १८ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

महावितरणचा १८ वा वर्धापन दिन नुकताच विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महावितरण अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली

Jun 10, 2023, 07:27 PMIST

डोंगरी परिसरातून ५० कोटींचे एमटी ड्रग्जसह सव्वा कोटींची रोकड जप्त

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपये किंमतीचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी रुपये असून, या कारवाईत एक कोटी १० लाख रुपयांची रोकड व १८६ ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. 

Jun 10, 2023, 05:25 PMIST

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक लागू

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मुंबई ते कोकण दरम्यानची मेल-एक्सप्रेसची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे ६७३ जवान गस्त घालणार आहेत. पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.

Jun 10, 2023, 03:43 PMIST

अजित पवारांकडून सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांचे अभिनंदन, म्हणाले.. 

राष्ट्रवादीच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली असून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांच्याकडे कोणतीही नवी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून  सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांचे अभिनंदन केले आहे. 

Jun 10, 2023, 12:01 PMIST

Pune : कर्वेनगर - दुधाने लॉन्स जवळ गॅरेजला लागली भीषण आग  

कर्वेनगर - दुधाने लॉन्स जवळ गॅरेजला आग लागल्याची घटना घडली आहे. धुराचे लोळ हवेत मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली

 कर्वेनगर - दुधाने लॉन्स जवळ गॅरेजला लागली भीषण आग
कर्वेनगर - दुधाने लॉन्स जवळ गॅरेजला लागली भीषण आग

Jun 10, 2023, 11:57 AMIST

Ashadhi wari : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक; मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश

Dagdusheth Ganpati : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले.

Jun 10, 2023, 10:16 AMIST

giriraj singh : 'गोडसे हा भारताचा सुपुत्र'; भाजप नेते गिरिराज सिंह यांचा ओवेसींवर हल्ला, फडणीसांचे केले समर्थन

Giriraj Sing On Nathuram Godse : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम भारताचा सुपुत्र होता असं वक्तव्य केलं आहे. एनआयएशी बोलतांना त्यांनी हे व्यक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jun 10, 2023, 09:09 AMIST

Xiaomi Technology : चीनच्या शाओमी टेक्नॉलॉजी कंपनीला ईडीकडून कारणे दाखवा नोटीस, ५५११  कोटींची मालमत्ता जप्त

 ईडीच्या  निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी  या चीनच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शाओमी कंपनीचे अधिकारी आणि तीन मोठ्या बँकांनाही ईडीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत याआधी तब्बल ५  हजार ५५१  कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.   

Jun 10, 2023, 08:40 AMIST

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ येत्या ३६ तासात धडकणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना बसणार फटका

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ येत्या ३६ तासात तीव्र होणार आहे. राज्याच्या कोकण किनारपट्टीवर तसेच मुंबईच्या किनारपट्टीवर याचा फटका बसणार आहे. या सोबतच चार राज्यावर याचा परिणाम होणार आहे. पुढील दोन दिवसांत हे वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल, असे हवामान विभागाने सांगितले.

Jun 10, 2023, 08:02 AMIST

Mumbai : सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम सहआरोपी आहे.

Jun 10, 2023, 07:25 AMIST

Chandrakant Patil :   नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील पत्रकार परिषद

 नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीबाबत या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.

Jun 10, 2023, 07:24 AMIST

Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नांदेड दौरा 

नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी जाहीर सभा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत.   

 

Jun 10, 2023, 06:57 AMIST

NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस 

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोनिया गांधी  यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी मतभेद वाढले. याची परिणिती शेवटी काँग्रेसच्या फुटीमध्ये झाली. शरद पवार पीए संगमा  आणि तारिक अन्वर या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून १०  जून १९९९  रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना  केली.  शरद पवार हे स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

Jun 10, 2023, 06:55 AMIST

Sambhaji Nagar :  संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

 मानाच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होईल. सकाळी ११  वाजता पालखी नाथांच्या जुन्या वाड्यातून समाधी मंदिराकडे जाईल आणि सूर्यास्ताच्या वेळी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.  

Jun 10, 2023, 06:52 AMIST

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आज प्रस्थान होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.

Jun 10, 2023, 05:56 AMIST

former us president Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांच्या अडचणी वाढल्या, सरकारी कागदपत्रे चोरीचा नवा आरोप

former us president Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यावर त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर आता सरकारी कागदपत्रे चोरीचे नवे आरोप लावण्यात आले असून या प्रकरणात त्यांना अटक देखल होऊ शकते असे बोलल्या जात आहे.

    शेअर करा