मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 10 April 2023 : विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विजया श्रीधर तावडे

Live News Updates 10 April 2023 : विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Apr 10, 2023, 11:55 PMIST

Vinod Tawade Mother Passed Away:भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे.

Apr 10, 2023, 11:55 PMIST

विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे. विजया श्रीधर तावडे असं विनोद तावडे यांच्या आईचं नाव असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. उद्या सकाळी ९ वाजता अमृत एन्क्लेव्ह, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.

Apr 10, 2023, 11:29 PMIST

आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर; २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करा

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाणे जिल्ह्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले.

Apr 10, 2023, 10:10 PMIST

ग्राहकांचा ऑनलाइन बीजबिल भरण्याकडे वाढता कल.. साडेतीन लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन

वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात औरंगाबाद परिमंडलातील ३ लाख ५१ हजार ९५७ ग्राहकांनी ८४ कोटी ४ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला.

Apr 10, 2023, 08:19 PMIST

AAP : आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (भाकप) या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतानाच निवडणूक आयोगानं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. आम आदमी पक्षाची पंजाब व दिल्लीत सत्ता आहे. तर, गुजरातसह काही राज्यांत आमदार आहेत. राष्ट्रीय पक्षासाठी लागणारा मतांची टक्केवारी देखील 'आप'नं निवडणुकांमध्ये मिळवली आहे.

Apr 10, 2023, 07:54 PMIST

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

NCP National Party Status Cancelled : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.

Apr 10, 2023, 07:48 PMIST

Eknath Shinde : मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.

Apr 10, 2023, 06:01 PMIST

अमरावतीः श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमीत्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, श्वेता महाले, प्रा. अशोक उईके उपस्थित होते.

Apr 10, 2023, 05:58 PMIST

Nana Patole : भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प - नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पार पडली. राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकारनं राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू होते, पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेलं नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार आहे यासाठी भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प आजच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलेला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Apr 10, 2023, 05:53 PMIST

unclaimed money in LIC : एलआयसीमध्ये २१५०० हजार कोटी धूळखात

रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांमध्ये दावा न केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या हक्काच्या मालकाची ओळख पटवण्यासाठी एक नवीन केंद्रीकृत पोर्टल तयार करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, दावा न केलेल्या रकमेच्या बाबतीत, सरकारी विमा कंपनी एलआयसी देखील मागे नाही. भारतीय जीवन विमा निगमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे अंदाजे २१५०० कोटी रुपये विनादावेदार पडून आहेत. एलआयसीने जेंव्हा आपला आयपीओ आणला होता तेंव्हा ही माहिती देण्यात आली होती

Apr 10, 2023, 05:01 PMIST

Masks Compulsory In Mumbai : राज्यात पुन्हा मास्कसक्ती, मुंबई मनपाच्या सर्व रुग्णालयात मास्क घालणं बंधनकारक

Masks Compulsory In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत केंद्रिय आरोग्यमंत्रालयानं नियमावली जारी केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतील सर्व रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे.

Apr 10, 2023, 11:30 AMIST

Akola News: अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत सात भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत.

Apr 10, 2023, 09:19 AMIST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टीची वाढीसह सुरुवात

 

एका दीर्घ विश्रांतीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. जागतिक बाजारपेठांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स २६ अंश वधारुन ५९८५८.९८ अंश पातळीवर खुला झाला, निफ्टीदेखील ३३ अंश वाढीसह १७,६२३.१५ अंश पातळीवर खुला झाला. आशियाई बाजारपेठेतून संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. टाटा मोटर्स, ओएनजीसी हे स्टाॅक्स आज फोकसमध्ये राहतील.

Apr 10, 2023, 06:25 AMIST

Sadanand kadam : मुंबई सत्र न्यायालयात सदानंद कदम याच्या जामीन अर्जावर सुनावणी

 मुंबई सत्र न्यायालयात सदानंद कदम याच्या जामीन अर्जावर सुनावणी. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम याना ईडीनं केली आहे अटक. मात्र कदम सध्या न्यायालयीन कोठडीत. मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी दाखल केलाय जामिनासाठी अर्ज. सदानंद कदम हे आमदार माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय.

Apr 10, 2023, 06:25 AMIST

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी

 खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  

Apr 10, 2023, 06:24 AMIST

Godhra : गोधरा हत्याकांडीतील दोषींच्या जामिनावर सुप्रिम कोर्टात सुनावणी

गोधरा हत्याकांडीतील दोषींच्या जामिनावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने गुजरात सरकारला दोषी प्रत्येक व्यक्तीची गुन्ह्यातील भुमिका स्पष्ट करायला सांगितली आहे.

Apr 10, 2023, 06:23 AMIST

Wardha News : कर भरा मोफत दळण दळून मिळवा; वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर गावातील अनोखी योजना 

वर्धा : जिल्ह्यातील अल्लीपूर नजीकच्या मनसावली या गावात एका पीठ गिरणीने गावातील नागरिकांसाठी अनोखी योजना सुरू केलीये. ही पीठ गिरणी ग्राम पंचायतच्या मालकीची आहे. येथे ग्राम पंचायतीचा कर भरणाऱ्यास मोफत दळण दिले जाते. १००  टक्के कर भरा आणि दळण मोफत मिळवा.

Apr 10, 2023, 06:22 AMIST

NCP News : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

 राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलंल तूर्तास अंतरिम संरक्षण आहे कायम. मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, साजिद, आबीद आणि नाविद या तिघांनी केलाय अटकपूर्व जामीन अर्ज.

Apr 10, 2023, 06:21 AMIST

NCP News  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विमुक्त जाती भटक्या जमातीचे आज सकाळी ११  वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विमुक्त जाती भटक्या जमातीचे आज सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भटक्या जाती विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्षांना बोलवलं आहे. 

Apr 10, 2023, 06:20 AMIST

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे आज अमरावती दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी १०.३०  वाजता, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८  व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतील.  

Apr 10, 2023, 06:19 AMIST

Thane News :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची आज बैठक

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधीच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. 

Apr 10, 2023, 06:18 AMIST

Mumbai News : ठाकरे गटाकडून लवकरच राज्यात होणार अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागाचे दौरे 

मुंबई :  एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ठाकरे गटाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.  

Apr 10, 2023, 06:17 AMIST

Akola News : नितीन देशमुख आंदोलनाच्या पवित्र्यात

बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपासून २१  एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार आहेत.  

 

Apr 10, 2023, 06:15 AMIST

Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज कोर्टाच्या कामकाजात ३९ नंबर वर प्रकरण आहे.गेल्या आठ महिने या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत पण प्रत्यक्ष सुनावणी होणार का याबद्दल पुन्हा चर्चा.

Apr 10, 2023, 06:14 AMIST

Covid Mock Dril : करोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशभारत आज मॉक ड्रिल

Covid Mock Dril : कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे.

Apr 10, 2023, 06:07 AMIST

unseasonal rain in the State : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; शेतमालाचे मोठे नुकसान

unseasonal rain in the State : राज्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गारपीट आणि झाडपडीच्या देखील घटना झाल्या. अकोल्यात एका मंदिरावर पावसामुळे झाड कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला,

    शेअर करा