मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 3 July 2023 : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला
Live Updates

Live News Updates 3 July 2023 : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला

Jul 04, 2023, 05:36 PMIST

Share Market Updates : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम आहे. आज सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून निफ्टी ११५ अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Jul 04, 2023, 05:36 PMIST

Closing bell :  पुन्हा एका विक्रमी पातळी, बॅक स्टाॅक्स वधारले 

भारतीय शेअर बाजार मंगळवारी पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर बंद झाला. भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी विक्रमी उच्चांकावर बंद झाला. मंगळवारी पहिल्यांदाच सेन्सेक्स ६५४७९.०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीही प्रथमच  १९,३४९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. यादरम्यान निफ्टी बँकही प्रथमच ४५३०१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बँकिंग, वित्तीय क्षेत्र आणि आयटी समभागांनी बाजारातील तेजीला हातभार लावला. विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेतील रस वाढल्याने आणि बजाज समूहाच्या दोन्ही शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला बळ मिळाले. आकडेवारीनुसार, बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Jul 04, 2023, 05:09 PMIST

Malabar gold : एनटीआर ज्युनियर मलाबार गोल्डचा नवा ब्रँड अॅम्बेसिडर 

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या ११ देशांमध्ये ३२० हून अधिक शोरूम्स असलेल्या जगातील ६व्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या ज्वेलरी रिटेलरने सुपरस्टार नंदमुरी तारक रामा राव ज्युनियर अर्थात एनटीआर ज्युनियरशी आपला नवीनतम ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून करार केला आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या आगामी ग्राहक अभियानांमध्ये एनटीआर ज्युनियरचा समावेश असेल. विपुल अभिनय करणारा अभिनेता तसेच भारतभरातील जनतेला आकर्षून घेणारा सुपरस्टार असलेल्या एनटीआर ज्युनियरमध्ये विश्वास, पारदर्शकत्व आणि उत्कृष्टता या समूहाच्या सर्व गाभ्याच्या मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. त्याचे व्यक्तिमत्व सौहार्दपूर्ण आणि नम्र आहे.

Jul 04, 2023, 04:11 PMIST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

Jul 04, 2023, 01:07 PMIST

Tina Ambani : टीना अंबानी यांनाही फेमाअंतर्गत समन्स 

रिलायन्स एडीए समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांना फेमा प्रकरणी मुंबईतील सक्तवसुली संचालनालया(ईडी)च्या कार्यालयात दाखल झाल्या. याआधी अनिल अंबानी यांचीही सोमवारी चौकशी करण्यात आली होती.

Jul 04, 2023, 09:27 AMIST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात धडाकेबाज, ३०० अंशांची उसळी

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या शेअर्सच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात धडाकेबाज झाली. सेन्सेक्समध्ये ३०० अंशांच्या वाढीसह तो ६५ हजार ५३२ अंशांवर खुला झाला. तर निफ्टी ६०.७५ अंशांच्या वाढीसह १९,३८० अंशांवर खुला झाला.

Jul 04, 2023, 07:53 AMIST

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ  दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी ७  वाजता नागपुरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Jul 04, 2023, 06:59 AMIST

बृजभूषण सिंह विरोधात सुनावणी

बृजभूषण प्रकरणी पॉस्को केस संदर्भात पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे.त्यामुळे या सुनावणीमध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Jul 04, 2023, 06:59 AMIST

Mumbai news : ठाकरे गटाची आज महत्वाची बैठक

अजित पवारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनात ही बैठक दुपारी १२.३० वाजता पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

Jul 04, 2023, 06:58 AMIST

AJit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच मुंबईत उदघाटन होणार आहे.मंत्रालयासमोरील A/5 बंगला येथे अजित पवारांचं नवं कार्यालय असणार आहे.

Jul 04, 2023, 06:57 AMIST

Congress meeting : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदाराची तातडीची बैठक होणार आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि इतर सर्व आमदार राहणार उपस्थित आहेत.

Jul 04, 2023, 06:56 AMIST

Mumbai news :  अजित पवारांना बोलावली राष्ट्रवादी कॉँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ५  जुलै रोजी पार पडणार आहे. त्याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. बोलवण्यात आली आहे.

Jul 03, 2023, 10:46 PMIST

छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेलवर बिल घ्या आणि वर्षाला १२० रुपये सवलत मिळवा!

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या औरंगाबाद परिमंडलातील पर्यावरणस्नेही १८ हजार ४८२ ग्राहकांकडून २२ लाख १७ हजार ८४० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

'गो-ग्रीन' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

Jul 03, 2023, 08:39 PMIST

उमेश पाटील यांचीसोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावरून उचलबांगडी

महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी उमेश पाटील उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.

Jul 03, 2023, 02:02 PMIST

राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणारः शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणारः शरद पवार

Jul 03, 2023, 10:04 AMIST

Sensex Nifty updates : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला

Share Market Updates : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम आहे. आज सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून निफ्टी ११५ अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Jul 03, 2023, 09:51 AMIST

Sharad Pawar : कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शरद पवार रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत. आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण,पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar

Jul 03, 2023, 09:11 AMIST

Sudhir Mungantivar : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन्यप्राणी उपचार केंद्राचे लोकार्पण

 जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Jul 03, 2023, 06:58 AMIST

yawatmal : यवतमाळमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

राज्यात ५५  हजार शिक्षकांची भरती घेण्यात यावी या मागणीसाठी टीइटी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा जनआक्रोश मोर्चा होणार आहे. हा मोर्चा शिवाजी मैदानातून जिल्हा परिषदेवर धडकणार आहे.

Jul 03, 2023, 06:58 AMIST

MNS : राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक

अजित पवारांनी शिवसेना भाजप बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक सकाळी दहा वाजता बोलावली आहे.

Jul 03, 2023, 06:57 AMIST

 Sharad Pawar : शरद पवार यांचा आज कराड दौरा

पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन कराडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते दर्शन घेणार आहेत. तर कराडमध्ये शरद पवार हे सभा देखील घेणार आहेत.

Jul 03, 2023, 06:20 AMIST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षेतेखील बाळासाहेब भवन येथे शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली बाळासाहेब भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार दुपारी चार वाजता पार पडणार आहे. या बैठकीच्या आधी दोन वाजता मुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या सर्व नेत्यांची, आमदारांची, खासदारांची आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे.

    शेअर करा