मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 27 July 2023 : दिल्लीच्या डाबरी परिसरात महिलेची गोळ्या झाडून हत्या
Live Blog

Live News Updates 27 July 2023 : दिल्लीच्या डाबरी परिसरात महिलेची गोळ्या झाडून हत्या

Jul 27, 2023, 10:12 PMIST

Delhi Crime: डाबरी परिसरात एका ४२ वर्षीय महिलेची तिच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत: दिल्ली पोलिस

Jul 27, 2023, 10:12 PMIST

Delhi Crime: दिल्लीच्या डाबरी परिसरात महिलेची गोळ्या झाडून हत्या

डाबरी परिसरात एका ४२ वर्षीय महिलेची तिच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत: दिल्ली पोलिस

Jul 27, 2023, 09:04 PMIST

Thane Rains: ठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

ठाण्यात सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jul 27, 2023, 06:18 PMIST

ठाण्यात घोडबंदर रोडवर पाणी साचलं

ठाणे शहरात संततधार पाऊस पडत असून शहरातील घोडबंदर रस्त्यावर असं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. परिणामी रसत्यावरची वाहतूक बंद आहे.

Jul 27, 2023, 05:14 PMIST

मुंबईत पावसाची संततधार; लोकल सेवेवर परिणाम नाही

मुंबईत आज, गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार. चर्चगेट- मरिन लाइन्सदरम्यान ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरूवात. परंतु लोकल रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही.

Jul 27, 2023, 04:58 PMIST

Mumbai Rains: चर्चगेट-मरीन लाइन्स रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले

चर्चगेट-मरीन लाइन्स रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. मात्र, रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याची माहिती समोर आली.

Jul 27, 2023, 04:54 PMIST

Maharashtra Assembly Monsoon Session : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज दिवसभराचे कामकाज संपले असून पुढील बैठक बुधवारी होईल. अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या मतदारांपर्यंत आमदारांना मदत पोहचवता यावी यासाठी सोमवार आणि मंगळवारी कामकाजाला सुटी देण्यात आली आहे. शनिवार ते मंगळवार सलग चार दिवस आमदार मतदारसंघात उपलब्ध राहून मदतकार्यात प्रत्यक्ष सहभागी होतील, असा हेतू यामागे आहे.

Jul 27, 2023, 04:40 PMIST

Maxvision : क्वाड्रिया कॅपिटलची मॅक्स व्हिजनमध्ये १३०० कोटींची गुंतवणूक 

आशियातील आघाडीच्या आरोग्यसेवा - केंद्रित खाजगी इक्विटी कंपन्यांपैकी एक क्वाड्रिया कॅपिटलने भारताच्या आघाडीचे वेगाने वाढणाऱ्या डोळ्यांची काळजी घेणाऱ्या खासगी क्लिनिकपैकी एक असलेल्या मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल मध्ये १,३०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सुरुवातीला क्वाड्रिया भागभांडवलासाठी अंदाजे ६०० कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करेल आणि अतिरिक्त भागभांडवलासाठी ७०० कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करेल. विशेषतः टियर -२ आणि टियर -३ शहरे, जी भारतीय डोळ्यांच्या देखभालीच्या बाजारपेठेत मागे आहेत. एकूणच, व्यापक नेत्र देखभाल उद्योगाला गेल्या वर्षी ७,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळाली आहे. १९९६ मध्ये स्थापन झालेली मॅक्सिव्हिजन दक्षिण आणि पश्चिम भारतातील सहा राज्यांमध्ये ४२ केंद्रे चालवते आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आघाडीवर आहे.

Jul 27, 2023, 03:47 PMIST

Vinsys IPO :  विन्सिस आयटी सर्व्हिसेसचा आयपीओ १ आँगस्टला येणार

पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या विन्सिस आयटी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या जागतिक आयटी व सॉफ्टवेअर सेवा आणि सॉफ्टवेअर कंपनीचा आयपीओ येत्या १ ऑगस्ट रोजी खुला होणार असल्याची घोषणा कंपनी तर्फे करण्यात आली,त्यांच्या आगामी पब्लिक ऑफरिंगसाठी रु.१२१/- ते रु.१२८/- निश्चित केली आहे.

Jul 27, 2023, 02:48 PMIST

मुंबई शहरात गेल्या २४ तासात २२३ मीमी पावसाची नोंद

महाराष्ट्र सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबई शहरात गेल्या २४ तासात तब्बल २२३ मीमी पावसाची नोंद. हवामान खात्याने दिला इशारा. विदर्भासाठी 'येलो' तर मराठवाड्यासाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी. मुंबईस्थित हवामान खात्याचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली माहिती.

Jul 27, 2023, 01:35 PMIST

Nagpur rain: नागपूरला मुसळधार पावसाने झोडपले; वर्धा जिल्ह्यात शाळांना सुट्टी

vidarbha rain: विदर्भात बुधवारी रात्री पासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात रात्री पासून सलग पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर नदी नाल्यांना पूर आले आहे. वर्धा जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Jul 27, 2023, 01:23 PMIST

Pune : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने दुपारी १.०० वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ४२८ क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Jul 27, 2023, 12:33 PMIST

ठाणेः तरुण धबधब्यात पडला

ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्यावरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात एका धबधब्यात तरुण बुडाल्याचे वृत्त.

Jul 27, 2023, 11:43 AMIST

Chandrashekhar bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

शिवसेनेच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. 'उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत मोदींच्या कर्तृत्वावर त्यांनी शेकडो भाषणं केली आणि जिंकून आले. त्यांनी चांगल्या न्यूरो सर्जनची भेट घेऊन उपचार करावेत, असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला आहे.

Jul 27, 2023, 11:41 AMIST

Ashok layland :  अशोक लेलँडचा ७५ वा वर्धापन दिन साजरा 

अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाच्या प्रमुख कंपनी आणि देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक असून कंपनीने आज कन्याकुमारी ते लेह अशा ‘मंजिल का सफर’ स्टॅलिन ड्राइव्हची सुरुवात केली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरू झालेली ही सफर कंपनीच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.

Jul 27, 2023, 11:30 AMIST

Pune kasarsarai dam : कासारसाई धरण ८७ टक्के क्षमतेने भरले

कासारसाई धरण ८७ टक्के क्षमतेने भरले आहे. पाऊस सुरू राहिल्यास व पाण्याचा येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नाला पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आवाहन  सहाय्यक अभियंता -श्रेणी १, खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक २,पुणे यांनी केले आहे. 

Jul 27, 2023, 11:22 AMIST

Pune : खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण ९७ टक्के भरले

खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण ९७ टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आज संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजेदरम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Jul 27, 2023, 09:33 AMIST

Opening bell :  सेन्सेक्समध्ये उसळी, डाॅलर्सच्या तुलनेत रुपया मजबूत 

आज, गुरुवारी २७ जुलै शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स १२७ अंकांनी वाढून ६६,८३४ वर उघडला. त्याचवेळी निफ्टीही ७२ अंकांनी वधारला. तो १९,८५० च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २२ शेअर्समध्ये वाढ झाली आणि ८ मध्ये घसरण झाली. पहिल्या तिमाहीत अत्यंत कमकुवत निकालानंतर, टेक महिंद्राच्या स्टॉकमध्ये आज ५% पेक्षा जास्त घसरण होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी मजबूत होऊन ८१.९३ वर उघडला. २६ जुलै रोजी रुपया प्रति डॉलर ८२ वर बंद झाला होता.

Jul 27, 2023, 09:31 AMIST

ajit pawar : आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी, निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजीत पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पुरपरिस्थितीचा, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी, युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून  आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी, निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली. 

Jul 27, 2023, 07:46 AMIST

PM Kisan Yojana : PM किसानचा  १४  वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या  खात्यात वितरीत केला जाणार आहे.   राजस्थानमधील   सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे हा  हप्ता वितरीत केला जाणार आहे.

Jul 27, 2023, 07:10 AMIST

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित; विविध विकासकामांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Jul 27, 2023, 07:02 AMIST

Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट...मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर

ज्यातील विविध जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Jul 27, 2023, 07:01 AMIST

Rajkot Greenfield Airport: आज राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज गुरुवारी गुजरातमधील  राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं  उद्घाटन करणार आहेत. एएनआय न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Jul 27, 2023, 06:08 AMIST

Mumbai Pune express way : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग आज १२ ते २ दरम्यान वाहतुकीसाठी बंद

Mumbai Pune express way : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आज २७ जुलैला रोजी दोन तासांसाठी वाहतुकीसाठ बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत सैल झालेल्या दरडी काढल्या जाणार आहेत. या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. तर अवजड वाहतूक किवळे पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल.

    शेअर करा