मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शुल्कवाढीविरोधात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक; मुख्य इमारतीसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी

शुल्कवाढीविरोधात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक; मुख्य इमारतीसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी

Oct 12, 2022, 12:35 PMIST

Protest Against Fee Hike In SPPU : शुल्कवाढीविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केलं आहे.

  • Protest Against Fee Hike In SPPU : शुल्कवाढीविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केलं आहे.
protest against fee hike in savitribai phule pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं प्रवेश आणि वसतीगृहाचं शूल्क वाढवल्यानंतर आता त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे.
(1 / 7)
protest against fee hike in savitribai phule pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं प्रवेश आणि वसतीगृहाचं शूल्क वाढवल्यानंतर आता त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे.(HT)
विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
(2 / 7)
विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.(HT)
महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असून त्याला युवक क्रांती दलानंही पाठिंबा दिला आहे.
(3 / 7)
महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असून त्याला युवक क्रांती दलानंही पाठिंबा दिला आहे.(HT)
विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला असून हे आंदोलन रात्रंदिवस सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आंदोलक विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरच स्वयंपाक करत जेवण केलं.
(4 / 7)
विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला असून हे आंदोलन रात्रंदिवस सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आंदोलक विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरच स्वयंपाक करत जेवण केलं.(HT)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं कला शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १३४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी १८९ टक्के आणि विज्ञान शाखेतील प्रवेशात ५७ टक्क्यांनी फी वाढ केली आहे.
(5 / 7)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं कला शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १३४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी १८९ टक्के आणि विज्ञान शाखेतील प्रवेशात ५७ टक्क्यांनी फी वाढ केली आहे.(HT)
याशिवाय वसतीगृहाची फी २४६० रुपयांवरून थेट ५८५० रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही वाढ तब्बल १३७ टक्क्यांची असल्यानं त्याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यापीठ प्रशासनां केलेली ही फी वाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.
(6 / 7)
याशिवाय वसतीगृहाची फी २४६० रुपयांवरून थेट ५८५० रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही वाढ तब्बल १३७ टक्क्यांची असल्यानं त्याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यापीठ प्रशासनां केलेली ही फी वाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.(HT)
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी विद्यापीठात आंदोलनस्थळी विद्यार्थांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच विभागातील प्राध्यापक व प्रसिद्ध लेखक डॉ. शरद बाविस्कर यांनीही फेसबुक पोस्टद्वारे विद्यार्थ्यांच्या मागण्याचं समर्थन करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
(7 / 7)
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी विद्यापीठात आंदोलनस्थळी विद्यार्थांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच विभागातील प्राध्यापक व प्रसिद्ध लेखक डॉ. शरद बाविस्कर यांनीही फेसबुक पोस्टद्वारे विद्यार्थ्यांच्या मागण्याचं समर्थन करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.(HT)

    शेअर करा