मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शिवसैनिकांनी तानाजी सांवतांचे कार्यालय फोडले; तर मराठा क्रांती ठोक मोर्चाने वाहिली फुले

शिवसैनिकांनी तानाजी सांवतांचे कार्यालय फोडले; तर मराठा क्रांती ठोक मोर्चाने वाहिली फुले

Jun 25, 2022, 05:25 PMIST

 एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी बंडखोर आमदार यांची कार्यालय लक्ष केली असून त्या ठिकाणी काळे फासून तोडफोड केली जात आहे. पुण्यातही शिवसैनिक आक्रमक होत त्यांनी आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले. तर मराठा क्रांती मोर्चाने सांवत यांचे समर्थन करत त्यांच्या तोडफोड झालेल्या कार्यालयात फुले वाहिली आहे.

  •  एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी बंडखोर आमदार यांची कार्यालय लक्ष केली असून त्या ठिकाणी काळे फासून तोडफोड केली जात आहे. पुण्यातही शिवसैनिक आक्रमक होत त्यांनी आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले. तर मराठा क्रांती मोर्चाने सांवत यांचे समर्थन करत त्यांच्या तोडफोड झालेल्या कार्यालयात फुले वाहिली आहे.
शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पाच दिवसांपासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. शिवसैनिक आता आक्रमक झाले असून पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड शिवसैनिकांनी शनिवारी सकाळी केली. 
(1 / 6)

पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे, या कार्यालयात जात शिवसैनिकांनी तोडफोड केली. सावंत यांच्या पोस्टरला काळे फासत गद्दार लिहिण्यात आले.  
(2 / 6)

यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमला होता. 
(3 / 6)
यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमला होता. 
“ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.
(4 / 6)

सावंत यांच्या कार्यालयाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केलेली नासधूस. 
(5 / 6)
सावंत यांच्या कार्यालयाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केलेली नासधूस. 
मराठा क्रांती ठोक मोर्चाने शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय, आज शिवसैनिकांकडून तानजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानंतर, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन फुले देखील वाहिली आहेत.. 
(6 / 6)

    शेअर करा