मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune ZP Health Ride : पुण्यात थेट बांधावर जाऊन आरोग्य सेवा; जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम, पाहा फोटो

Pune ZP Health Ride : पुण्यात थेट बांधावर जाऊन आरोग्य सेवा; जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम, पाहा फोटो

Nov 23, 2022, 02:19 PMIST

Pune ZP Health Ride program : पुणे जिल्ह्यात जे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, असा गरीब, सामान्य नागरिकांना थेट बांधावर जाऊन आरोग्य सेवा देण्याचा स्तुत्य उपक्रम पुणे जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. यात जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी गावोगावी जाऊन, तपासणी करणार आहेत. यात ऊसतोडणी कामगार, विटभट्टी कामगार, तसेच शेतमजूर या सारखे नागरिक जे दवाखान्यात जाऊ शकत नाही, अशांवर उपचार केले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिंदुस्तान टाईम्स मराठीला दिली.

  • Pune ZP Health Ride program : पुणे जिल्ह्यात जे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, असा गरीब, सामान्य नागरिकांना थेट बांधावर जाऊन आरोग्य सेवा देण्याचा स्तुत्य उपक्रम पुणे जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. यात जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी गावोगावी जाऊन, तपासणी करणार आहेत. यात ऊसतोडणी कामगार, विटभट्टी कामगार, तसेच शेतमजूर या सारखे नागरिक जे दवाखान्यात जाऊ शकत नाही, अशांवर उपचार केले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिंदुस्तान टाईम्स मराठीला दिली.
पुणे जिल्हा परिषद राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. आरोग्याच्या दृष्टीकोणातून लसीकरण मोहीम असो वा तपासणी शिबिरे हे एका ठराविक कालावधीत सुरू असतात.
(1 / 7)

कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था अबाधित राहावी म्हणून देखील गावपातळीवर अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
(2 / 7)

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी आरोग्य तपासणी यापूर्वी करण्यात आली आहे. यात आजारी असलेल्या आणि शस्त्रक्रिया योग्य असणाऱ्या बालकांवर उपचार करण्यात आले आहे.
(3 / 7)

आता पुन्हा एक नवी मोहीम पुणे जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत जे नागरिक आरोग्य केंद्रात येऊ शकत नाही, त्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन किंवा बांधावर जाऊन त्यांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
(4 / 7)

या मोहिमेत विशेषत: ऊस तोडणारे आणि स्थलांतरित लोकांसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
(5 / 7)

या मोहिमेत आज ४२ ठिकाणी शिबरे आयोजित करण्यात आली होती. यात एकूण १२७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ८३ गरोदर माता, ४०३ लहान बालके, १८ वर्षापेक्षा ७९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
(6 / 7)

ही मोहीम राज्यात पथदर्शी ठरेन. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील वंचित नागरिकांना देखील आरोग्य सुविधा मिळेल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
(7 / 7)

    शेअर करा