मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Dasara : तब्बल दोन वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त दसरा; पुण्यात बाजारपेठा सजल्या

Pune Dasara : तब्बल दोन वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त दसरा; पुण्यात बाजारपेठा सजल्या

Oct 04, 2022, 01:48 PMIST

Pune Dasara News : पुण्यात तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दसरा साजरा केला जाणार आहे. रावण दहन करण्यासाठी रावणाचे मुखवटे तयार करण्याच्या कामात कारागीर व्यस्त आहेत. पुण्यातील बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत. फुले आणि आपट्याची पाने विक्रीसाठी व्यापारी दुकाने मांडून बसले आहेत.

  • Pune Dasara News : पुण्यात तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दसरा साजरा केला जाणार आहे. रावण दहन करण्यासाठी रावणाचे मुखवटे तयार करण्याच्या कामात कारागीर व्यस्त आहेत. पुण्यातील बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत. फुले आणि आपट्याची पाने विक्रीसाठी व्यापारी दुकाने मांडून बसले आहेत.
पुण्यात तब्बल दोन वर्षांनी दसरा साजरा केला आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते. या साठी रावणाचे मुखवटे तयार करण्याचे काम सुरू आहे. या मुखवट्याचे रंगकाम सुरू असून त्यावर अखेरचा हात फिरवण्याच्या कामात मग्न असलेले कारागीर. (छायाचित्र : प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
(1 / 6)

पुण्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा केला जातो. त्यातील रावण दहन हा एक महत्वाचा भाग आहे. शेखर मोगलू (आर) आणि त्यांचे सहकारी हे दरवर्षी रावणाचे मुखवटे तयार करत असतात. भगवान राम यांनी रावणाचा पराभव केला होता. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. भारतीय उपखंडातील विविध भागांमध्ये हा सण जल्लोषात साजरा केला जातो. (छायाचित्र : प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
(2 / 6)

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना महत्व असते. पुण्यातील शास्त्री मार्गावर या पानांची विक्री करताना एक व्यावसायीक. (छायाचित्र : प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
(3 / 6)

दासऱ्यानिमित्त पुणे मार्केट यार्ड येथे मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. अनेक व्यावसायिक हे फुलांच्या विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसले आहेत. (छायाचित्र: हिंदुस्थान टाईम्स मराठी)
(4 / 6)

या वर्षी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. या फुलांना चांगला भाव देखील मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (छायाचित्र: हिंदुस्थान टाईम्स मराठी)
(5 / 6)

दासऱ्यानिमित विविध खेळण्यांची दुकाने देखील सजली असून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेला एक व्यावसायिक. (छायाचित्र: हिंदुस्थान टाईम्स मराठी)
(6 / 6)

    शेअर करा