मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 30 December 2022 Live : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले!
Live Blog

Marathi News 30 December 2022 Live : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले!

Dec 30, 2022, 06:24 PMIST

Maharashtra Assembly Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे . सन २०२३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे होईल.

Dec 30, 2022, 06:23 PMIST

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले! २७ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे . सन २०२३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे होईल.

Dec 30, 2022, 03:46 PMIST

Devendra Fadnavis : मंत्रालयातील बोगस भरतीची सखोल चौकशी होणार; सरकारची ग्वाही

मंत्रालयातील बोगस भरती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मंत्रालयात 'क' संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरू असल्याचं खोटं सांगून शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखती घेतल्या. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली होती.

Dec 30, 2022, 09:55 AMIST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर  :  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. "श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही बाब पुत्र म्हणून पंतप्रधान  मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. पंतप्रधान  मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

Dec 30, 2022, 09:48 AMIST

heeraben Modi cremated : हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांंचं आज अहमदाबादेतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. आईच्या निधनानंतर तातडीनं पंतप्रधान अहमदाबादेत पोहोचले. अहमदाबादेतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. 

Dec 30, 2022, 08:16 AMIST

mulund Wall collapse: मुलुंड येथील हनुमानपाडा येथे भिंत कोसळून एक महिला ठार

मुलुंड येथील हनुमानपाडा येथे एका घराची जीर्ण झालेली भिंत काल रात्री कोसळली. या घटनेत १ महिला ठार तर दोघे जखमी झाले आहेत. जीर्ण झालेली घराची भिंत ही शेजारच्या घरावर कोसळली. या घटनेची माहिती मिळताच BMC आणि MFB, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचेळे असून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. लक्ष्मीबाई कातडे (वय ४०) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर रघुनाथ कातडे हे जखमी झाले आहेत.

Dec 30, 2022, 06:18 AMIST

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ जानेवारी रोजी

पुणे  : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे जानेवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

Dec 30, 2022, 06:17 AMIST

महाराष्ट्रात होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई: महाराष्ट्रात 2022-23 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभा विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Dec 30, 2022, 05:11 AMIST

Covid update: 'या' सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची, केंद्राचा निर्णय

चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

    शेअर करा