मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 4 August 2022 Live: महागाईविरुद्ध काँग्रेसचा उद्या राजभवनला घेराव
Nana Patole

Marathi News 4 August 2022 Live: महागाईविरुद्ध काँग्रेसचा उद्या राजभवनला घेराव

Aug 04, 2022, 10:42 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 04, 2022, 10:42 PMIST

ED जमीन घोटाळ्या प्रकरणी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले वर गुन्हा 

ईडीने जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात तब्बल ६ हजार पानांची चार्जशिट दाखल केली आहे. त्यांच्या एआरए प्रॉपर्टीज आणि आणखी प्रकरणात जमीन घोटाळा केला आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.

Aug 04, 2022, 09:04 PMIST

NCP :आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार

पुणे; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार गेली साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे समजू शकते. परंतु भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांची बदनामी करीत असून त्यांचे वारंवार प्रतिमा हनन करीत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे असा आरोप पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करत पडळकर यांच्या विरोधात विश्राम बाग पोलीस ठाणे आणि पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून गुरवारी केली आहे.

<p>पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांना निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी&nbsp;</p>
पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांना निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी&nbsp;

Aug 04, 2022, 06:44 PMIST

Nana Patole: मोदी सरकारच्या धोरणांविरोधात उद्या काँग्रेसचा मोर्चा, राजभवनला घेराव घालणार

केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळं महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणं कारणीभूत आहेत. या धोरणांचा निषेध म्हणून उद्या, शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Aug 04, 2022, 06:10 PMIST

Eknath Shinde: 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झळकली

राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार आल्यानंतर जवळपास महिनाभराने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झळकली आहे.

Aug 04, 2022, 05:59 PMIST

CWG 2022 Boxing: अमित पांघल सेमी फायनलमध्ये, भारताचे पदक निश्चित

बॉक्सिंग ५१ किलो (फ्लाय वेट) वजनीगटात भारताच्या अमित पांघलने स्कॉटलंडच्या लेनॉन मुलिगॅनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयासह अमित पांघलने कमीत कमी कांस्य पदक निश्चित केले आहे.

<p>amit pamghal</p>
amit pamghal

Aug 04, 2022, 05:36 PMIST

Pune Crime : पुण्यात घरफोड्या वाढल्या; तीन सदनिकांत चोरी

पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी हडपसर, लोणीकंद भागात या परिसरातील दोन सदनिका फोडत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केले. बुधवार पेठेत इलेक्ट्रीक दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी केबल वायर चोरून नेली. याबाबत कृष्णा लिंगय्या आंबेती (वय ५५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आंबेती ससाणेनगरमधील चेतन हाईट्स या इमारतीत राहतात. आंबेती कुटुंबीय दुपारीसदनिका बंद करुन बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचे सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील चार लाख ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. आंबेती कुटुंबीय रात्री घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

<p><strong>Maharashtra Crime News</strong></p>
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Aug 04, 2022, 04:42 PMIST

NCP: मोदी सरकारच्या धोरणांमुळं आयात-निर्यातीमधील तूट १०० अब्ज डॉलरवर; राष्ट्रवादीचा आरोप

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं आयात - निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळं आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशा प्रकारची भीती नागरीक आणि तज्ज्ञांना वाटू लागली आहे, असंही महेश तपासे म्हणाले.

Aug 04, 2022, 04:19 PMIST

CWG Hammer throw: हॅमर थ्रोमध्ये भारताची मंजू बाला फायनलमध्ये

भारताची मंजू बालाने हॅमर थ्रोमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने ५९.६८ मीटरचा थ्रो केला. मंजूने पात्रता फेरीत ११ वे स्थान पटकावले. तसेच, भारताची दुसरी अॅथलीट सरिताने ५७.४८ मीटर थ्रो केला. ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. तिने १३ वे स्थान पटकावले. अव्वल १२ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली आहे.

<p>manju bala</p>
manju bala

Aug 04, 2022, 04:01 PMIST

Congress : कॉंग्रेसला धक्का; दोन मोठ्या नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Aurangabad Congress : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबादेतील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नेते रामू शेळके आणि त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके यांनी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप्रवेश केला आहे. त्यामुळं आता औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Aug 04, 2022, 03:23 PMIST

Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Accident On Mumbai-Goa HighWay : मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दोन जणांचा गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

Aug 04, 2022, 02:20 PMIST

Sunil Raut attacks BJP: संजय राऊत यांच्यावरील सर्व आरोप खोटे - सुनील राऊत

संजय राऊत यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. भारतीय जनता पक्ष संजय राऊत यांना घाबरतो. राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यापासून तोडायचं आहे म्हणून त्यांना अडकवलं जातंय, असा आरोप त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. आम्ही ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करतोय आणि करू, असंही सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं.

Aug 04, 2022, 01:56 PMIST

Sanjay Raut Custody: संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीनं केली होती.

Aug 04, 2022, 01:22 PMIST

Sanjay Raut ED : संजय राऊतांची ईडी अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची

Sanjay Raut : संजय राऊतांना न्यायलयानं सुनावलेली ईडी कोठडी आज संपलेली आहे. त्यामुळं आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. परंतु न्यायालयात नेत असताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा राऊत गाडीत बसण्याआधी त्यांचे बंधू सुनिल राऊतांशी हस्तांदोलन करत होते, त्यामुळं त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोखलं आणि त्यानंतर त्याच्यात बाचाबाची झाली.

Aug 04, 2022, 01:13 PMIST

Sanjay Raut: ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नाही, PMLA कोर्टात संजय राऊत यांची तक्रार

मला जिथं ठेवलंय तिथं व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही. मला हृदयविकाराचा त्रास असल्यानं श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं संजय राऊत यांनी पीएमएलए कोर्टात सांगितलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथे एसी असल्याचं म्हटलं.

Aug 04, 2022, 12:58 PMIST

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर आज सुनावणी

पत्रा चाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. ईडीकडून त्यांच्या कोठडीची मुदत वाढवून मागितली जाण्याची शक्यता आहे.

Aug 04, 2022, 12:56 PMIST

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ५० कोटींचे ड्रग्ज जप्त

Mumbai Police Raid : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी सेलनं मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात ५० कोटी रुपये इतकी किंमत असून या कारवाईमुळं देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे.

Aug 04, 2022, 12:45 PMIST

Monsoon Session: ससंदेचं कामकाज सुरू असताना तिकडे मला ईडीने बोलावलंय : मल्लिकार्जून खर्गे

संसदेत आजही केंद्रीय तपास संस्थांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं की, इथं संसदेत कामकाज सुरु असताना मला ईडीची नोटीस आलीय. साडेबारा वाजता मला जायचं आहे, मला कायद्याचं पालन करायचं आहे पण संसदेचं काम सुरु असताना असे समन्स पाठवणं योग्य आहे का?

Aug 04, 2022, 12:37 PMIST

Share Market News: सकाळच्या सत्रातील तेजीनंतर शेअर बाजार गडगडला

सकाळच्या सत्रातील तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा गडगडला आहे. सेन्सेक्स ३३६ अंकांनी तर निफ्टी ९० अंकांनी घसरला आहे. 

Aug 04, 2022, 09:28 AMIST

Share Market News: शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स ३०० अंकांनी उसळला

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसत असून आजही सेन्सेक्स ३०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला आहे. निफ्टी ८७ अंकांनी वधारून १७४७५ वर ट्रेड करत आहे.

Aug 04, 2022, 08:45 AMIST

Monkeypox: दिल्लीत मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण, देशात एकूण ९ जणांना लागण

दिल्लीत मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला असून देशातील एकूण रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. दिल्लीतील एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली असून ती देशातील पहिलीच महिला रुग्ण आहे. सध्या तिच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Aug 04, 2022, 08:38 AMIST

Flood Situation in Chandrapur : पूरस्थितीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक चंद्रपूरात दाखल

Central Team Inspection in Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळं लाखो लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळं शेती, शाळा आणि गावांची पाहणी करण्यासाठी केंद्रातील पथक काल चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालं असून त्यांनी नऊ गावांची पाहणी केली आहे. या गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही पथकानं जाणून घेतल्या.

Aug 04, 2022, 08:31 AMIST

TET Scam Pune : टीईटी घोटाळ्यातील दोषींवर मोठी कारवाई

TET Exam : राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु आता या घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या ७८७४ उमेदवारांची यादी जाहिर करत सर्वांच्या टीईटी परिक्षेचं प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आयोगानं केली आहे. याशिवाय दोषी उमेदवारांवर टीईटी परिक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

Aug 04, 2022, 08:23 AMIST

High Court : अस्वच्छ शौचालयांमुळं विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांची पायामल्ली- हायकोर्ट

Mumbai High Court : सरकारी शाळेत शिकताना अल्पवयीन विद्यार्थीनींना आरोग्याशी निगडीत सुविधा न देणं चुकीचं असल्याचं सांगत शाळेतील स्वच्छता हा त्यांच्या सन्मानाचा विषय असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयानं शाळेत अस्वच्छ शौचालयं असतील तर ती विद्यार्थींनींच्या मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.

Aug 04, 2022, 08:18 AMIST

West Bangal : बंगालमध्ये गॅस गळती; दोन कामगारांचा मृत्यू

Gas Leak In West Bangal : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात झालेल्या गॅसगळतीमुळं दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एकाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. इलेक्ट्रो स्टील कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Aug 04, 2022, 08:13 AMIST

MP Crime News : शिवलिंगाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Madhya Pradesh : मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

Aug 04, 2022, 08:00 AMIST

Sanjay Raut : संजय राऊत यांना पुन्हा कोठडी की जामीन? आज फैसला

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी यावर न्यायालयात सुनावणी होणार असून त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल.

Aug 04, 2022, 07:56 AMIST

SC Hearing On Shinde vs Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज सुनावणी

महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर काल युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

    शेअर करा