मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 23 October 2022 Live: उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर
उद्धव ठाकरे (PTI)

Marathi News 23 October 2022 Live: उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर

Oct 23, 2022, 09:45 AMIST

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

Oct 23, 2022, 09:44 AMIST

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्या दौऱ्यावर

PM Narendra Modi Ayodhya Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता ते भगवान राम यांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते भगवान राम यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.

Oct 23, 2022, 09:41 AMIST

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आज तेलंगणात पोहचणार

Bharat Jodo Yatra In Telangana : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकानंतर आता तेलंगणात पोहचणार आहे. ही पदयात्रा सकाळी तेलंगणाच्या गुडेबेलूरमध्ये दाखल होईल.

Oct 23, 2022, 07:53 AMIST

इस्रोची दिवाळी! सर्वात वजनदार रॉकेटचं पहिलं व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास सर्वात वजनदार अशा रॉकेटचं पहिलं व्यावसायिक प्रक्षेपण केलं. इस्रोचे एलव्हीएम-३ रॉकोट आकाशाकडे झेपावल्यानंतर भारताने ग्लोबल कमर्शियल लाँच मार्केटमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे.

Oct 23, 2022, 07:49 AMIST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

    शेअर करा