मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 23 July 2022 Live: एकनाथ शिंदे हेच आमचे नेते; फडणवीसांंचा खुलासा
Devendra Fadnavis

Marathi News 23 July 2022 Live: एकनाथ शिंदे हेच आमचे नेते; फडणवीसांंचा खुलासा

Jul 24, 2022, 12:13 AMIST

Daily News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Jul 24, 2022, 12:13 AMIST

पैसे परत देण्यास नकार दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत न दिल्याने चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना भेकराईनगर येथील आयबीएम कंपनीजवळ मंगळवारी (दि १९) रात्री घडली. याप्रकरणी अभिषेक विजय पवार (वय २२, रा. अंजना अपार्टमेंट, भेकराईनगर, फुरसुंगी) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर हेगडे (रा. फुरसुंगी), मयुर पडवळ (रा. चाकण), पंकज पांचाळ (रा. भेकराईनगर) आणि अमित अवचरे (रा. फुरसुंगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jul 23, 2022, 11:23 PMIST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मोफत बससेवा पुन्हा सुरू

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कामकाज नियमित सुरू झाल्याने विद्यापीठात विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सामाजिक उत्तरदायित्त्वाअंतर्गत विद्यापीठाला सीएनजीवर धावणाऱ्या दोन बस उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर २०१९मध्ये या बसेसद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बससेवा थांबवावी लागली.

Jul 23, 2022, 07:28 PMIST

कोंढव्यात अटट्टल दरोडेखोर गजाआड; पाच गुन्हे उघडकीस

पुणे : कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या अटट्टल दरोडेखोराला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्याने पाच गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमीर अजमाईन खान (वय २०, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक कोंढवा परिसरात गस्त घालत असताना अमीर याच्याकडे चोरीचे सोने असल्याची माहिती मिळाली.

Pune Crime News

Pune Crime News (HT)

Jul 23, 2022, 06:03 PMIST

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हेच आपल्या सगळ्यांचे नेते आहेत - देवेंद्र फडणवीस

आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. चंद्रकांतदादांनी केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. आपलंच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असंच सर्वांना वाटत होतं. अचानक हा निर्णय आल्यामुळं धक्का बसला, एवढंच त्यांना म्हणायचं होतं. याचा अर्थ एकनाथ शिंदे आम्हाला मान्य नाहीत. आमचं वेगळं मत आहे असं अजिबात नाही.  - देवेंद्र फडणवीस

Jul 23, 2022, 05:00 PMIST

Maharashtra BJP Executive Meet: आपलं सरकार यावं ही तर १२ कोटी जनतेची इच्छा - फडणवीस

राज्यात भाजपचं सरकार यावं ही तर श्रींची इच्छा होती. राज्यातील १२ कोटी जनता हीच आपल्यासाठी देवासमान आहे. त्यांनाच हे सरकार हवं होतं. आपण गेल्या अडीच वर्षांत संघर्ष केला. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू होती. आता आपण मोकळा श्वास घेत आहोत. - देवेंद्र फडणवीस

Jul 23, 2022, 04:48 PMIST

Shiv Sena: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चिदानंद बुगडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे , तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार, अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Jul 23, 2022, 04:18 PMIST

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा निधी रोखणं दुर्दैवी : संभाजी ब्रिगेड

पुणे जिल्ह्यातील वढू-तुळापूरमध्ये नियोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला स्थगिती दिल्यामुळं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजी ब्रिगेडनंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde (HT_PRINT)

Jul 23, 2022, 02:58 PMIST

Nitesh Rane: दुसऱ्याच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवलं ते चांगलं होतं का?; नीतेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांना सवाल

उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर केला आहे. त्यावरून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी निशाणा साधला आहे. 'आपल्या वडिलांच्या आजारपणाचं सांगता, दुसऱ्याच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवताना तुम्हाला कुठला आनंद झाला होता, असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे.

Jul 23, 2022, 01:21 PMIST

Uddhav Thackeray: संजय राऊत घेणार उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत

शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत पक्षाचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार आहेत.

Jul 23, 2022, 10:42 AMIST

BJP Meeting: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज पनवेलमध्ये बैठक

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये होत आहे. पक्षाचे ८०० पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

Jul 23, 2022, 10:07 AMIST

Coronavirus: मागील २४ तासांत ६७ करोना रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासात २१ हजार ४११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २० हजार ७२६ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात दीड लाख कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ४.४६ टक्के इतका आहे.

Jul 23, 2022, 10:03 AMIST

Sanjay Raut: शिवसेना कुणाची याचे पुरावे द्यावं लागणं हे दुर्दैव - संजय राऊत

खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याची वेळ ज्यांनी आणली आहे, त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. काय पुरावे हवेत तुम्हाला? सीमाप्रश्नावर ६९ हुतात्मे, ९२-९३ च्या दंगली शहीद झाले, मराठी माणसांसाठी लढा दिला, किती म्हणून पुरावे द्यायचे? महाराष्ट्रद्वेष्टे शिंदे गटाकडून हवं ते करून घेत आहेत. आज तुम्ही घोड्यावर बसला आहात, उद्या लोक तुमची गाढवावर धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत - संजय राऊत

Jul 23, 2022, 09:19 AMIST

ईडीकडून सोनिया गांधींची पुन्हा होणार चौकशी; २६ जुलैला हजर राहण्याचे आदेश

Sonia Gandhi ED Interrogation : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीनं दोन दिवसांपूर्वी चौकशी केल्यानंतर आता पुन्हा गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या २६ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून सोनिया गांधींना देण्यात आले आहे.

Sonia Gandhi ED Interrogation

Sonia Gandhi ED Interrogation (Hindustan Times)

Jul 23, 2022, 08:07 AMIST

विदर्भ आणि मराठवाड्यात होणार जोरदार पाऊस; IMD ने दिला इशारा

Maharashtra Rain Update Today : गेले दोन तीन दिवस शांत असणारा वरुणराजा आता पुन्हा बरसण्याची शक्यता आहे. कारण विदर्भासह मराठवाड्यात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Maharashtra Rain Update Today

Maharashtra Rain Update Today (Yatish Lavania)

Jul 23, 2022, 07:56 AMIST

Athletics Championships: अन्नु राणी अंतिम फेरीत सातव्या स्थानी

महिलांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत भारताच्या अन्नु राणीला चार प्रयत्नात आतापर्यंत ६१.१२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकता आला आहे. यामुळे ती सध्या सातव्या स्थानावर घसरली आहे. केलसी ली बार्बर हिने ६६.९१ मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले आहे.

Jul 23, 2022, 07:48 AMIST

Uttar Pradesh: हाथरसमध्ये भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात हाथरस सादाबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. गंगाजल घेऊन जाणाऱ्या ७ कावडियांना एका डंपररने चिरडलं असून यात जागीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

शेअर करा