मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 22 November 2022 Live: शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देणारच - पटोले
Nana Patole

Marathi News 22 November 2022 Live: शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देणारच - पटोले

Nov 22, 2022, 05:27 PMIST

Marathi News Live Updates : मोदी सरकारच्या आशीर्वादानं विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nov 22, 2022, 05:27 PMIST

Nana Patole: शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढणार - नाना पटोले

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झालं आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते भरले आहेत, पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशीर्वादानं विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nov 22, 2022, 11:35 AMIST

Stock Market: शेअर बाजार सावरला; सेन्सेक्सची सकारात्मक वाटचाल

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी ५०० अंकांनी आपटी खाल्लेला सेन्सेक्स आज सावरताना दिसत आहे. सेन्सेक्स सध्या १४० अंकांनी वाढला आहे, तर निफ्टीही किंचितसा वाढून ट्रेड करत आहे. 

Nov 22, 2022, 07:16 AMIST

IND vs NZ T20 : आज भारत-न्यूझीलंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामना; निर्णायक लढतीत विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

IND vs NZ Live Streaming : भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील अखेरचा सामना आज होणार आहे. याआधी पहिला टी-ट्वेंटी सामना भारतानं मोठ्या फरकानं जिंकला होता. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची मोठी संधी कर्णधार हार्दिक पांड्याकडे असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

Nov 22, 2022, 07:15 AMIST

Jharkhand : पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त

Jharkhand Police : उग्रवादी संघटना असलेली झारखंड जनमुक्ती परिषद आणि झारखंड पोलिसांत झालेल्या चकमकीत पोलिसांना तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. यावेळी पोलिसांनी अतिरेक्यांकडून मोठा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Nov 22, 2022, 07:15 AMIST

Anil Parab : साई रिसॉर्ट आज जमीनदोस्त होण्याची शक्यता; दापोलीत हालचालींना वेग

Sai Resort In Dapoli : दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई आज होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच शासनानं साई रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदा काढली होती. त्यानंतर आता हे रिसॉर्ट पाडण्यासाठी शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट हे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचा असल्याचा दावा केला होता.

    शेअर करा