मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 20 June 2022 live: आमदारांना गुजरातमध्ये अडकवून ठेवलंय - संजय राऊत
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत (फाइल फोटो) (पीटीआय)

Marathi News 20 June 2022 live: आमदारांना गुजरातमध्ये अडकवून ठेवलंय - संजय राऊत

Jun 21, 2022, 11:03 AMIST

Daily News Updates

Jun 21, 2022, 11:03 AMIST

आमदारांना गुजरातमध्ये अडकवून ठेवलंय - संजय राऊत

मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण सर्व ठीक होईल. जे स्वत:ला किंगमेकर समजून जे लोक काम करतायत ते यशस्वी होणार नाहीत. आमचे सर्व आमदार परत येतील. त्यांना गुजरातमध्ये अडकवून ठेवलं आहे. मात्र ते सर्व शिवसैनिक आहेत आणि निष्ठावान आहेत. शिवसेनेच्या वाईट काळातही ते सोबत राहिले, ते परत येतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

Jun 21, 2022, 10:43 AMIST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले असून केंद्रातील वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीचीही चर्चा रंगली आहे.

<p>देवेंद्र फडणवीस</p>
देवेंद्र फडणवीस (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Jun 21, 2022, 09:48 AMIST

एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद

सध्या गुजरातमध्ये असलेले एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समजते. याबाबत अधिकृतपणे कुणीही सांगितलेलं नाहीय. ते नेमके कुठे आहेत, त्यांची नाराजी आहे का? कशाबद्दल नाराजी आहे? हे समोर आलेलं नाही.

Jun 21, 2022, 09:40 AMIST

संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीनिमित्त शिवसेना नेते संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते. मात्र राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार नॉट रिचेबल असल्यानं राऊतांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. 

Jun 21, 2022, 08:46 AMIST

शिवसेनेची १२ मते फुटली, माफिया सरकारचे १२ वाजणार - सोमय्या

शिवसेनेची १२ मते फुटली आहेत. माफीया सरकारचे १२ वाजणार आहेत. महाराष्ट्रातली जनता ठाकरे सरकारचा अंत करणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर दिली.

Jun 21, 2022, 08:16 AMIST

अफवा पसरवण्याचा हितशत्रूंचा डाव - निलम गोऱ्हे

एकनाथ शिंदे कधीपासून नॉट रिचेबल याची माहिती नाही. सध्या एकनाथ शिंदे नॉटरिचेबल असल्याची वातवरण निर्माण करण्याची गरज नाही. सगळ्या विधायक, चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवण्याचा आणि अफवा पसरवण्याचा आमच्या हितशत्रूंचा डाव असतो. प्रत्येक आमदार गेल्या दोन तीन दिवसात आम्हाला भेटले आहेत. अत्यंत पक्षनिष्ठ असे आमचे प्रत्येक आमदार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटलं

Jun 21, 2022, 08:14 AMIST

मग नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ : नारायण राणे

एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न विचारला असता असं सांगायचं नसतं, मग नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे असं म्हणत नारायण राणे यांनी प्रश्नाला बगल दिली.

    शेअर करा