मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 19 July 2022 Live: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

Marathi News 19 July 2022 Live: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

Jul 19, 2022, 08:32 PMIST

Daily Live News Updates

Jul 19, 2022, 08:31 PMIST

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 

Jul 19, 2022, 06:35 PMIST

उद्धव ठाकरे यांनाही युती करायची होती; त्या संदर्भात मोदी यांच्याशी ४ वेळा चर्चा: राहुल शेवाळे यांचा खुलासा

 उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत युती करायची होती. त्या संदर्भात आम्हाला ते बोलले होते. या संदर्भात त्यांनी ४ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बैठकाही घेतल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा शिंदे गटात सामिल झालेले खासदार राहूल शेवाळे यांनी केला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिल्ली येथे पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्यांनी हा गोप्य स्पोट केला.

Jul 19, 2022, 05:19 PMIST

आमचं मरण आम्हाला माहिती.. धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचे कार्यकर्त्यासोबतचे फोनवरील संभाषणा तुफान व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की, प्रवाहाबरोबरच गेले पाहिजे. शिंदे साहेबांनी गुवाहाटीतून इचलकरंजीसाठीच्या विकासकामांवर सही केली आहे. आमचे मरण आम्हाला माहिती आहे. आमदारांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार आहे. खासदारांना तर निधीच मिळत नाही. आमदारांपेक्षा अधिक नाराजी खासदारांमध्ये आहे.

Jul 19, 2022, 03:27 PMIST

शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे १२ खासदार</p>
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे १२ खासदार

Jul 19, 2022, 02:44 PMIST

Monsoon Session: विरोधकांना सामान्य माणसांची चिंता नाही : केंद्रीय कृषीमंत्री

विरोधकांना शेतकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची चिंता नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप हे शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं.

Jul 19, 2022, 02:27 PMIST

अग्नीपथला विरोधामुळे आपचा खोटेपणा समोर आला - अनुराग ठाकूर

अग्नीपथ योजनेत बदल होणार नाही. लाखो तरुणांनी अग्नीवर होण्यासाठी अर्ज केले आहेत. विरोधकांचा, विशेषत: आपचा खोटेपणा देशासमोर आला असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.

Jul 19, 2022, 11:42 AMIST

Navi Mumbai: शिंदे गटाला धक्का, ३ नगरसेवकांचा भाजप प्रवेश

नवी मुंबईत शिंदे गटातील ३ नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवीन, अपर्णा आणि दीपा गवते यांनी भाजप प्रवेश केलाय. गणेश नाईक यांनी यामुळे एकनाथ शिंदेंना धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे.

Jul 19, 2022, 11:22 AMIST

Monsoon Session: महागाईवरून गोंधळ, कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज महागाईवरून मोठा गोंधळ झाला. विरोधकांनी घातलेल्या या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

Jul 19, 2022, 08:54 AMIST

Sanjay Raut: शिवसेना खासदार राऊतांचा ट्विटमधून शिंदे गटाला इशारा

शिंदे गटाने शिवसेनेची वेगळी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर हिंदीतून इशारा दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, "फन कुचलने का हूनर भी सिखिए.. सांप के खौफ से जंगल नहीं छोडा करते... जय महाराष्ट्र!!"

Jul 19, 2022, 07:43 AMIST

Rushi Sunak: ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तिसऱ्या फेरीतही ते आघाडीवर राहिले. आता या शर्यतीत तीन उमेदवार उरले आहेत. 

Jul 19, 2022, 07:42 AMIST

CM Eknath Shinde: आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार : मुख्यमंत्री शिंदे

शिवसेना खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हर्च्युअल बैठक झाली होती. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्याकडे फक्त १२ नव्हे तर १८ खासदार आहेत.

    शेअर करा